सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

शिवाजी मस्कर यांच्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर

शिवाजी मस्कर यांच्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी दिनी दिनानिमित्त श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि स्वदेशी भारत बचत गट सकुंडे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित पुस्तक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवाजी मस्कर यांच्या ‘डोंगरापासून सीमेपर्यंत’ या पुस्तकाला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रमाणपत्र व झाडाचे रोप असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 जिल्हा परिषद शाळा आसू, ता.फलटण, जि.सातारा या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शिवाजी मस्कर यांचे हे पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक स्पंदन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. ग्रामीण भागातील युवकाचा ‘फौजी ते सुभेदार’ असा प्रवास या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. या पुस्तकातील भाषा काळजाला भिडणारी आहे. शिवाजी मस्कर हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. ग्रामीण भाषेत कथा लिहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक दिवाळी अंक, विषेश अंकातून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या आहेत. त्यांचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सुभेदार जगन्नाथ शिद्रुक, विजयराव पाचुपते, प्रा.ए.बी.कणसे सर, प्रा.दादाराम साळुंखे, डाॅ.संदीप डाकवे, किसन मस्कर, शिवशक्ती उत्कर्ष मंडळातील पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...