सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

मा.सतिष वाघ यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

मा.सतिष वाघ यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील धरणीमाता फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतिष वाघ यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श समाजसेवक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून रविवार दि.28 नोव्हेंबर, 2021 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी संविधान दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण केले जाते. या वर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. धरणीमाता फौंडेशनच्या माध्यमातून सतिष वाघ यांनी पक्षीमित्र, वृक्षमित्र, पर्यावरण स्नेही अशी ओळख निर्माण करणारे तसेच सामाजिक,शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले आहे असे नाविन्यपूर्ण  विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत त्याची दखल घेवून सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल सतिष वाघ यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...