शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

तळमावळे : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले ; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन वितरण सोहळा संपन्न

तळमावळे : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले ; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन वितरण सोहळा संपन्न
तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तळमावले यांच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर आज तळमावले  येथे राजेंद्र मोरे , विश्वनाथ कदम ,व अमृत पवार याना दोन चार चाकी व एक दोन चाकी अशी वाहने वितरण करण्यात आली. 
      यावेळी संस्थेचे चेअरमन श्री अनिल शिंदे साहेब व्हा.चेअरमन राजेश करपे, व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर, उपव्यवस्थापक शरद शिंदे दत्तात्रय गणेशकर ,रोहित मोरे,शत्रुग्न पवार,राजु ताईगडे,सुनील असळकर,सतीश तवर,सुनील पाटील,तुकाराम जाधव,लक्ष्मण पवार,संदीप पाटील,ओंकार शिंदे, आदी मान्यवरउपस्थित होते.

संस्थेच्या प्रगतीबाबत तळमावले शाखेने 14 वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून कारभार केला. यामुळे लोकांचा संस्थेवर विश्वास वाढत चालला आहे. तळमावले शाखेने 14 वर्षात 15 कोटी सत्तर लाख  ठेवी जमा केल्या आहेत,तर अकरा  कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे. तसेच ही संस्था शेतकरी व समाजातील तळागाळातील लोकांच्यासाठी  विश्वासास पात्र ठरली आहे. संस्थेचे चेअरमन  श्री अनिल शिंदे साहेब  यांच्या नेतृत्वाखालील  मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे.

1 टिप्पणी:

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...