वाझोली ता.पाटण येथील जि .प शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार आढावा बैठक घेण्यात आली.या सहविचार बैठकीमध्ये येणाऱ्या काळात शाळेसाठी शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाव्यात या साठी गावातील आजी माजी विध्यार्थी एकत्र येत गेल्या महिन्यामध्ये संघाची स्थापना करण्यात आली होती.व या सहविचार बैठकीत नुतून नवनिर्वाचित सदस्य यांची निवड करण्यात आली.
शाळा अनेक विद्यार्थी घडवते आणि त्यातून अनेक पिढ्या पण घडतात. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो आणि त्याच्या क्षेत्रात कार्यरत होतो. पण मुख्याध्यापक पासून सेवक वर्गापर्यन्त सर्वांचाच हातभार त्याच्या आयुष्याला लागलेला असतो. ती आठवण पुन्हा जागवणे आणि ती जाणीव पुन्हा पुन्हा रुजविणे याच दृष्टिकोनातून वाझोली जि प च्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची कल्पना म्हणजे माजी विद्यार्थी संघाची स्थापना. असे शाळेचे माजी विध्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी वक्तव्य केले
माजी विद्यार्थी यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे,व शाळेसाठी भौतिक सोई उपलब्ध करून पुढील पिढीसाठी अधिकाधिक सोई उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संघाच्या वतीने केला जाईल असे आव्हान संघाचे जेष्ठ सल्लागार पांडुरंग लोहार यांनी केले.
शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आनंदा मोरे यांनी गावातील तरुण वर्गाणी एकत्र आल्यास उत्तम रित्या शाळेच्या विकासाठी मार्ग तयार होतो याचे उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून दिसून आले ,व भविष्यात ही या प्रकारे नियोजन करून गावची शाळा जिल्ह्यात व राज्यात चांगल्या प्रकारे प्रदर्शन करेल असे संभोधले
या सहविचार बैठकीत शाळेच्या माजी विध्यार्थी संघाचे उपाध्यक्ष जयवंत मोरे,,गावातील फौजी जयवंत पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर व उपशिक्षक सतीश कोकाटे यांनी आपाआपले मनोगत व्यक्त करत शाळेविषयी आत्मीयता दाखवली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप वीर व आभार सतीश कोकाटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील विजय सुतार,संगाचे सदस्य संदीप पाटील, शाळा समिती उपाध्यक्ष जयवंत सुतार,सूर्यकांत मोरे,राहुल पाटील,तानाजी मोरे,विकास मोरे,सचिन सुतार,अमोल पाटील सुनील पाटील,वैभव मोरे सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा