शुक्रवार, ९ जुलै, २०२१

कुंभारगावात प्रवेश बंदी :उद्यापासून जनता कर्फ्यू

कुंभारगावात प्रवेश बंदी :उद्यापासून जनता कर्फ्यू

कुंभारगाव : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीच्यावतीने दि. 10 जुलैपासून सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे,' असे आवाहन कुंभारगाव ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.1 जून पासून आजपर्यंत गावात एकुण 38 रुग्ण बाधित झाले असून त्यातील 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे 22 जण बरे झाले आहेत तर 12 जणांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत

अलीकडील दिवसात कुंभारगावात सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असून काही जणांचा बळीही गेला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूमध्ये दवाखाने, मेडिकल वगळता गावातील सर्व प्रकारची दुकाने दि. 17 जुलैपर्यंत बंद राहतील. गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे तसेच या जनता कर्फ्यूमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सदरचा आदेश फक्त कुंभारगाव साठी आहे वाडीवस्त्यावरील सर्व व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार चालू राहतील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं! मोरेवाडीच्या डोंगरात म्हशीने बिबट्याला दिली जोरदार लाथ, शेतकऱ्यांत भीतीचं वातावरण*

*पाटण, चिखलेवाडी:*   मोरेवाडीच्या डोंगरात दिवसाढवल्या बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ...