बुधवार, ७ जुलै, २०२१

*स्व. प्रेमिलाकाकी व आनंदराव चव्हाण यांचा 8 जुलै रोजीचा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी कोरोना साथीच्या अनुषंगाने रद्द*

 *स्व. प्रेमिलाकाकी व आनंदराव चव्हाण यांचा 8 जुलै रोजीचा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी कोरोना साथीच्या अनुषंगाने रद्द करण्यात आला आहे* 
कराड :माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आई - वडील तसेच कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री स्व आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन 8 जुलै रोजी विविध उपक्रमांनी दरवर्षी साजरा केला जातो. 
व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे दरवर्षी या कार्यक्रमाचे स्वरूप असते. स्व प्रेमिलाकाकी व स्व आनंदराव चव्हाण यांच्या विचारांना उजाळा मिळावा या उद्देशाने दरवर्षी राज्य व देशपातळीवरील व्याख्यात्यांचे व्याख्यान कराड येथे आयोजित केले जाते तसेच 10 व 12 विद्यार्थ्यांना शाबासकी ची थाप मिळावी या उद्देशाने सुद्धा दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला जातो. 
यावर्षी सुद्धा अश्याच स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व प्रशासनाने लागू केलेल्या नियमांच्या अनुषंगाने यावर्षी स्व आनंदराव चव्हाण व स्व प्रेमीलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 8 जुलै २०२१ रोजी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याची कृपया सर्व कार्यकर्त्यांनी तसेच स्व. प्रेमिलाकाकी व स्व.आनंदराव चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...