शनिवार, ३१ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 842 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  16 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.31 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार    842  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 11  (9342), कराड 170  (34820), खंडाळा 32   (13093), खटाव 73 (21647), कोरेगांव 72 (19042), माण 83  (14806), महाबळेश्वर 6 (4509) पाटण 19 (9572), फलटण 108 (30883), सातारा 204 (45322), वाई  51(14323) व इतर 13  (1650) असे आज अखेर एकूण 219009 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (199), कराड 2 (1032), खंडाळा  2(165), खटाव 2(517), कोरेगांव  1 (408), माण   1 (301), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2  (333), फलटण 3 (530), सातारा 3  (1328), वाई  0 (325) व इतर 0 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5297 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

अखेर कुंभारगाव झाले कोरोनामुक्त ....

अखेर कुंभारगाव झाले कोरोनामुक्त गाव ....
कुंभारगाव ग्रामपंचायतीने जाहीर केलंल्या जनता कर्फ्यूला गावातील काही समाजकंटकानीं  विरोध करून बंद केलेले रस्ते पुन्हा चालू केले होते .त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते त्यावरही मात करून कोरोना कमिटीने कोरोना मुक्तीचे काम संयमाने आणि व्यवस्थित पणे करून गाव कोरोना मुक्त केले या कामात सरपंच सौ.सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण,ग्रामसेवक जाधव,तलाठी ,पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांचे मोलाचे सहकार्य होते
कोरोनामुक्तीसाठी पंचसूत्री कुंभारगाव ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सौ.पाटणकर यांनी ग्रामस्थांना केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू शकतो, असेही सौ.पाटणकर म्हणाल्या.

कुंभारगावात मे 2021 ते जुलै 2021 पर्यंत एकूण 80 नागरिकांना कोरोना झाला होता त्यातील 75 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर 10 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण

प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण
तळमावले : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक  शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या वृक्षसंवर्धन प्रेरणेतून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात आज मा.प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांचा वाढदिवस महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
काकासाहेब चव्हाण महाविद्यालय परिसरात  काही वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रमामुळे  वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन मोठ्या संख्येने झाले आहे.महाविद्यालय परिसर हिरवाईने नटला आहे.मोठं मोठे डेरेदार वृक्ष,हजारो पक्षी त्यांचा किलबिलाट,कडक उन्हाळ्यात देखील गार सावली असल्याने उन्हाळा जाणवत नाही. परिसरात मनमोहक व प्रसन्न वातावरण असून दरवर्षी शेकडो नवीन वृक्षरोपण व संवर्धन होत आहे.आज मा.प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांच्या वाढदिवसानिमित्त मा.एस.के.कुंभार सर - माजी सहसचिव (अर्थ ) व विद्यमान व्यवस्थापन मंडळ सदस्य (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर )यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
 यावेळी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.अरूण गाडे साहेब , मा श्री ए.बी.माने सर  (मुख्याध्यापक श्री वा वि तळमावले ) ,श्री प्रदिप माने (संपादक ,साप्ताहिक कुमजाई पर्व ) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक - प्रा सचिन पुजारी यांनी केले ते शुभेच्छा देताना म्हणाले मँडमना  वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा....उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हिच बापूजींच्या चरणीं मी प्रार्थना करतो...

*सातारा जिल्ह्यातील 861 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 861  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41  बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.30 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 24 (9331), कराड 152 (34650), खंडाळा 58  (13061), खटाव 127 (21574), कोरेगांव 84 (18970), माण 78 (14723), महाबळेश्वर 3 (4503) पाटण 18 (9553), फलटण 115 (30775), सातारा 149 (45118), वाई 42 (14272) व इतर 11 (1637) असे आज अखेर एकूण 218167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(199), कराड 9 (1030), खंडाळा 0 (163), खटाव 5(515), कोरेगांव 2 (407), माण 2 (300), महाबळेश्वर 0 (86), पाटण 3 (331), फलटण 11 (527), सातारा 2 (1325), वाई 4 (325) व इतर 1 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5281 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

महावितरणचे कर्मचारी : तुमच्या धाडसला आमचा सलाम...!!

महावितरणचे कर्मचारी : तुमच्या धाडसला आमचा सलाम...!!
सातारा : दि २२,२३ व २४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना नदीला महापूर आला होता .त्यामुळे ३३केव्ही ची मारळी उपकेंद्र कडे जाणाऱ्या लाईनच्या तारा नदी च्या पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. पाण्याची पातळी कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले, परंतु पूरामुळे  वाहून आलेल्या झाडांच्या फांद्या मुळे तारांना पीळ पडला व तारा एकमेकांत अडकल्याने वीजपुरवठा सुरळीत करता येत नव्हता. दोन दिवस प्रयत्न करून ही यश येत नव्हते. एका कर्मचारी धाडस करून, ताराला झूला बांधून लोंबकळत गेला आणि तारांना अडकलेल्या झाडांच्या फांद्या काढून तारा एकमेकां पासून वेगळ्या केल्या.  आणि वीजपुरवठा सुरळीत केला गेला.
असे प्रसंग जिवावर बेतणारे असतात, पूर्ण काळजी घेऊनही असं धाडस करायला जिगर लागते... ती जिगर दाखवून हे केंद्र सुरु करून शेकडो घरात प्रकाश पेरायला कारणीभूत झालेल्या या कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि विद्युत कार्यकारी अभियंता यांनी कौतुक केले आहे.
त्यांच्या धैर्याला, धाडसाला, मेहनतीला सलाम....

गुरुवार, २९ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11  बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.29 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1073 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 21 (9307), कराड 300 (34498), खंडाळा 83  (13003), खटाव 50 (21447), कोरेगांव 99 (18886), माण 84 (14645), महाबळेश्वर 10 (4500) पाटण 36 (9535), फलटण 142 (30660), सातारा 170(44969), वाई 68 (14230) व इतर 10(1626) असे आज अखेर एकूण 217306 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(197), कराड 5 (1021), खंडाळा 0 (163), खटाव 0(510), कोरेगांव 3 (405), माण 0 (298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1 (328), फलटण 0 (516), सातारा 0 (1323), वाई 1 (321) व इतर 1 (72), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5240 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) दौरा*

 *आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) दौरा* 

कराड, प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम आहे. प्रशासनाने लोकांना अधिकाधिक मदत पोहचवावी, असे सांगून कराड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या बाधितांना भरपाई देण्यास अग्रक्रम ठेवावा. नदीवरील काले नांदगाव, टाळगावच्या पुलांच्या आवशक्य दुरुस्त्या करण्याच्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी प्राधान्यक्रम ठेवावा. असे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवारी) कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) भागात दौरा केला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उपअभियंता संजय दाभोळे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता आर. जे. पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, जलसंपदा विभागाचे संजय धोत्रे, जलसंधारणाचे श्रीकांत आढाव, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. राख, महसूल विभागाचे मंडलाधिकारी नागेश निकम, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नरेंद्र नांगरे - पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, उदयआबा पाटील - उंडाळकर, पैलवान तानाजी चवरे, देवदास माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. चव्हाण यांनी काले येथील मांड नदीवरील पुलाची पाहणी केली. या पुलाची उंची वाढवता येईल का? यासंबंधी प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे उपस्थितांना सांगितले. नांदगाव येथील पुलाची पाहणी करताना त्यांनी सरपंच हंबीरराव पाटील, उपसरपंच अधिकराव पाटील व ग्रामस्थांशी संवाद साधला. व संबंधित अधिकाऱ्यांना नांदगाव पुलाच्या कठड्यांची तात्पुरती दुरुस्ती करावी, असे सांगून योग्य ती खबरदारी घेवून हा पूल वाहतुकीस खुला करावा असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पुलावरील वाढती प्रवाशी व ऊस वाहतूक विचाराधीन घेवून या उंची वाढवावी. तसेच दुहेरी वाहतूक व उंच पूल व्हावा, अशी मागणी केली. यावर आ. चव्हाण शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, माजी सरपंच टी. के. पाटील, डॉ. नरेंद्र माळी, सागर कुंभार, सयाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, प्रशांत सुकरे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. चव्हाण यांनी उंडाळे येथील जिंती रोडवरील पूल व तुळसण फाट्यावरील पुलाची पाहणी केली. जिंती रोडवरील पुलाचा भराव व जवळच्या बंधाऱ्याच्या सांडवा दुरुस्तीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर तुळसण फाट्यावरील पुलावरील रस्ता उखडला आहे. हे काम लवकर होईल. तोपर्यंत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याची सूचना दिली. यावेळी उपसरपंच बापूराव पाटील, उदय पाटील, शैलेश पाटील, व्ही. टी. पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाळगाव येथील गावाजवळच्या पुलाची व खचलेल्या भरावाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शालन मोहिते, जयवंत जाधव, गणेश काळे, उत्तमराव साळुंखे, धनाजी देशमुख, सुभाष पाटील, विकास देशमुख, प्रगतशील शेतकरी संजय जाधव - उंडाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सवादे येथील बांदेकरवाडी येथील साकव पुलाचा पडलेला भराव व तेथील नुकसानीची पाहणी केली. व पूल दुरुस्तीच्या कामात गती देण्यास सांगितले. यावेळी नितीन थोरात, सरपंच लक्ष्मी सुतार, उपसरपंच पुजाराणी थोरात - पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव थोरात, माजी चेअरमन निवास थोरात, उदय थोरात, माजी उपसरपंच सचिन थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------- 
आ. चव्हाण यांनी बांदेकरवाडी येथे साकव पुलाच्या पाहणीवेळी ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये बसून प्रवास केला.  बांदेकरवाडी येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावातील श्री हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या समवेत जेवण केले. यावेळी पृथ्वीराज बाबांचा साधेपणा पहायला मिळाला.

बुधवार, २८ जुलै, २०२१

कुंभारगाव : चाळकेवाडीला जाणारा रस्ता गेला वाहून

कुंभारगाव : चाळकेवाडीला जाणारा रस्ता गेला वाहून
कुंभारगाव : पाटण तालुक्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने कुंभारगाव भागातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. मान्याचीवाडी येथील गलमेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पारशी पुलाजवळ रस्ता वाहून गेल्याने गुडघाबर खड्डा पडला असून रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे.स्थानिक युवकांनी तात्पुरता भराव टाकून खड्डा भरून वाहतूक सुरू राहील याचा प्रयत्न केला 


मण्याचीवाडी ते चाळकेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर असलेला साकव पुलाचा भराव वाहून गेल्याने चाळकेवाडीला जाणारी वाहतूक बंद झाली आहे दुसऱ्या बाजूला पण तीच आवस्था झाली आहे मान्याच्यावाडीतून चाळकेवाडीला जाणारा रास्ता सुद्धा पुराच्या पाण्याने उध्वस्त झाल्यामुळे चाळकेवाडीची वाहतूक ठप्प झाली आहे तेथे असणारा विधुत पोल सुध्दा धोकादायक झाला आहे तेथून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
संबंधित रस्त्याची सरकारी अधिकारी पाहणी करून गेले आहेत त्यावर कारवाई कधी होते हे पाहावे लागेल . प्रशासनाने ताबडतोब संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी चाळकेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

*७२ तासांत रस्ते पूल वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी खुले करा* *गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई*

*७२ तासांत रस्ते पूल वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी खुले करा*
*गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना* 
सातारा दि.28:-पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विस्कळीत  झाला असल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता कामे पूर्ण होणे गरजेचे असून येत्या ७२ तासांत तालुक्यातील रस्ते पूल वाहतुकीसाठी खुले करा तसेच आपतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीने उभारणी करा, अशा स्पष्ट सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री  शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.
              पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता खलाटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खैरमोडे, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, कोयना धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता पोतदार,लघुसिंचन जलसंधारण प्रभारी कार्यकारी अभियंता पवार, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,व्ही.डी.शिंदे तसेच विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
           याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलन यामुळे फार मोठी आपत्ती उद्भवली असल्याने तालुक्यातील रस्ते,पूल,विद्युत पुरवठा,आणि शेतीचे  अतोनात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले असून  नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेकडो एकर शेतीचे,पीकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. तर भूस्खलनामुळे तालुक्यातील आंबेघर,मिरगाव ढोकावळे या ठिकाणी घरच्या घरे जमिनीत गाडली गेल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी   झाली आहे.   संपर्कहिन गावांचे तातडीने दळण-वळण सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम,प्रधानमंत्री सडक योजना व जलसंपदा विभाग या सर्व विभागांनी समन्वयातून काम करुन संपर्कहिन गावांचे रस्ते,साकव पूल दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने तातडीने कोयनानगर येथील वसाहतींची दुरुस्ती करुन बाधित कुटुंबियांना निवासाची व्यवस्था होण्याच्यादृष्टीने उपाययोजना करावी. विज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद असलेल्या गावांना पुर्ववत वीज पुरवठा करण्याचे काम सुरु पुर्ण करा, अशाही सूचना गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

" शिवसमर्थ " कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

" शिवसमर्थ " कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा 
तळमावले / वार्ताहर:
पानमळेवाडी (ता.सातारा) येथील शिवसमर्थ कोरोना सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे. कोविड काळात अथक काम करणा-या आशा सेविकांचा आज झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले. कोव्हीड-19 सारख्या महामारीच्या काळात आशा वर्कर म्हणून ग्राउंड लेव्हलला काम करणाऱया 70 आशाताई यांचा पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौडा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   
दि शिवसमर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटी तळमावले ता. पाटण, शाखा मार्केट यार्ड सातारा यांच्यावतीने व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता संभाजी इंदलकर यांच्या सहकार्याने पानमळेवाडी येथे मोफत शिवसमर्थ कोरोना केअर सेंटर चालवले जाते. दोन महिन्यांत 110 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.   
या केंद्राला वैद्यकीय सहकार्य मेडीकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व श्वास मल्टीस्टेट हॉस्पिटल साताराचे प्रवीण पाटील, रयत शिक्षण संस्था इंजिनीअरिंग कॉलेज लिंबखिंडचे प्राचार्य शेख, स्वयम् सामाजिक संस्थेचे विभुते, प्रेरणा फाऊंडेशनचे चंदन जाधव, टॉप गिअर प्रा. लि. चे शशिकांत पवार, शिवसमर्थ अन्नछत्र समितीचे व लिंब कोंडवे भागातील सर्व सरपंच यांचे लोकसहभागातून सहकार्य लाभले आहे. या सेंटरची सुविधा, येथील कामकाज, जेवण - नाश्त्याचे नियोजन सुंदर आहे. सभापती सरिताताई यांचे काम कौतुकास्पद असून शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे काम समाजाला प्रेरणा देणारे आहे. यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे कौतुकोद्गार विनय गौडा यांनी काढले.  
 शिव समर्थ हॉस्पिटलसाठी हनुमंत पवार व शैलेश वैश्य मेडिकल हेल्थ प्लस प्रभादेवी मुंबई यांच्या वतीने सातारा तालुक्यातील शिव समर्थ कोरोना सेंटरसाठी एक लाख रुपयांची औषधे  देण्यात आली. याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आशा सेविका व दानशूर व्यक्तींचे काम गौरवास्पद आहे, असे सांगितले. शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी भविष्यात लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल निर्माण करण्याची तयारी दर्शविली. शिवसमर्थ सेंटरसाठी योगदान देणारे हेमंत तुपे, प्रवीण पाटील, शशिकांत पवार, चंदन जाधव, प्रेरणा फाउंडेशनचे कार्यकर्ते, डॉ. अलिफ इनामदार, डॉ. अंबाजी राजमाने, डॉ. मेहता, डॉ. रेणू, सरपंच विनोद शिंदे यांचा सत्कार विनय गौडा व पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य कविता मानकर, सैदापूरच्या सरपंच शितल पवार, सरपंच रूपाली कांबळे, सारखळ सरपंच बडदरे, राहुल काळे, अमोल गोगावले, नवनाथ ननावरे, हनुमंत जगताप, धर्मेंद्र सावंत, अविनाश सावंत, विशाल ननवरे, मंगेश पाटील, जहिर फरास, अमोल मेणकर आदी उपस्थित होते.  

दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन बोत्रे व उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांच्या मार्गदर्शनातून अनेक सामाजिक उपक्र राबविले जातात. मुख्यमंत्री सहाय्यता फंडात 1 लाख, पत्रकार, कोविड योद्धा, पोलिस पाटील, सर्व आरोग्य सेवा देणारे यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप, कोल्हापूर विभागात दररोज 100 हुन अधिक लोकांची जेवणाची सोय, ढेबेवाडी हॉस्पिटलमध्ये वॉटर आरओ, 24 तास रुग्णवाहिका, मास्क, सॅनिटाझर, वस्तूचे वाटप असे योगदान देणा-या शिवसमर्थ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचा विनय गौडा यांनी आपल्या भाषणात गौरवपुर्ण उल्लेख केला.

*सातारा जिल्ह्यातील 701 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 701  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 46 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.28 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  701 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 46 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33(9296), कराड 202 (34198), खंडाळा 19 (12920), खटाव 48 (21397), कोरेगांव 55 (18787), माण 73 (14561), महाबळेश्वर 1 (4490) पाटण 14(9499), फलटण 72 (30518), सातारा 144 (44799), वाई 34 (14162) व इतर 6 (1616) असे आज अखेर एकूण 216233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (197), कराड 6 (1016), खंडाळा 2 (163), खटाव 6 (510), कोरेगांव 1 (402), माण 3(298), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2 (327), फलटण 8 (516), सातारा 14 (1313), वाई 3 (320) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5229 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कुठरे (पवारवाडी) येथे शिवसंपर्क अभियानाला सुरवात

कुठरे (पवारवाडी) येथे शिवसंपर्क अभियानाला  सुरवात 
           प्रतिनिधी / मनोज सावंत
कुठरे ता.पाटण : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील कुठरे (पवारवाडी) गावात शिवसंपर्क अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.या अभियानाच्या माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्रात गाव तेथे शाखा झाली पाहिजे तर घर तेथे शिवसैनिक तयार झाला पाहिजे . असे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत .
  शिवसेना ठाणे उप शहरप्रमुख व भारतीय मराठा संघ ;प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा . अविनाशजी पवार दादा यांचे नेतृत्वात पाटण तालुक्यातील मौजे पवारवाडी कुठरे या ठिकाणी शिवसेना शाखेचा शुभारंभ शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आला .

   यावेळी शिवसेना पाटण तालुका संघटक श्री . सुनिल पवार म्हणाले ;संपूर्ण हिंदूस्थानमध्ये एका नामांकित संस्थेने देशातील संपूर्ण राज्यांचा सर्वे केला असता शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांचा आदर्श व नंबर एकचे मुख्यमंत्री म्हणून गौरव करण्यात आला आहे . अशा आदर्श  सर्वोतम मुख्यमंत्र्यांचे व शिवसेना पक्षाचे आपण शिवसैनिक आहोत याचा आपणाला सार्थ अभिमान असायला पाहिजे . त्यामुळे गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे . 
  याप्रसंगी पवारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री . महेश लोहार , ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटील , शिवस्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष  राहुल लोहार , प्रसाद देसाई , जेष्ठ शिवसैनिक शंकर लोहार , ऋषीकेश पवार , दिलीप सुतार , साहिल चौगुले , विशाल पवार , रविराज लोहार , दिपक लोहार , अनिकेत शेजवळ , युवराज कदम, सागर पवार , रोहित कदम , सुरेश साठे , उत्तम पवार , शंभुराज लोहार व इतर शिवसैनिक उपस्थित होते .

वाझोली परिसरात डोंगराला भगदाड पडण्यास सुरुवात :ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाझोली परिसरात डोंगराला भगदाड पडण्यास सुरुवात :ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  
वाझोली ता.पाटण येथील गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या पावसाने वाझोली मधील डोंगराला मोठया प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तरी तातडीने  प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
  काळगाव विभाग मधील वाझोली व त्यामध्ये असणाऱ्या सलतेवाडी व डाकेवाडी हा दुर्गम व डोंगरांनी असा व्याप्त आहे, व या विभागात  मोठया प्रमाणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा दरवर्षी सामना करावा लागतो, गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टी मुळे सर्वत्र पाणी झाले असून शेतामध्ये पाण्याचे उफाळे निघाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 वाझोली गावआंतर्ग असणाऱ्या डाकेवाडी व सलतेवाडी या दोन्ही वाड्यामधील व गावातील डोंगराळ भाग हा मोठ्या प्रमाणावर दरड  कोसळल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे,तसेच गावामध्ये गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गावातील नळ पुरवठा करणाऱ्या पाईप लाइन तसेच नदी लगत असणारी गाव विहीर तसेच शेतकरी वर्गाचे मोटारी व पाइप पुराचे पाण्याने वाहून गेल्याने नुकसान झाले आहे 
 या सर्वांची पाहणी करत गावचे सरपंच सौ. शितल लोहार,उपसरपंच सविता मोरे,मा. सरपंच अशोक मोरे, रामचंद्र चव्हाण ,विजया पाटील, सुशीला मोरे, या सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी ग्रामसेविका सौ .माळी मॅडम व पोलीस पाटील विजय सुतार यांनी शेतीचे नुकसान व डोंगराचे होणाऱ्या दरडीचे होणारे नुकसान या बाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे 


- वाझोली गावांमध्ये झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे,शेतकरी वर्ग हतबल झाला असून मोठया प्रमाणावर भात शेती व भुईमूग शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच  गावातील देवालयाच्या डोंगर वर अवाढव्य वाघधोंडी हा दगड गावातील घरावर केव्हाही कोसळेल या मुळे ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी 
:-किसन मोरे (आप्पा) नुकसान ग्रस्त शेतकरी

मंगळवार, २७ जुलै, २०२१

*सातारा : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन* लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फी संबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरण, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांचा समावेश आहे.

*सातारा : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन*
सातारा दि. 27 : रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा न्यायालय, सातारा व तालुका स्तरावरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
 सातारा जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्याशधिश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते होणार आहे. लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फी संबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरण, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांचा समावेश आहे. येत्या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश, सरकारी वकील इत्यादी तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने न्यायालयात सकाळी 10.15 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती तृप्ती जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ अरुण खोत यांनी केले आहे.
 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने सामा  या संस्थेची ई-लोकअदालत व त्यासाठी आवश्यक सर्व ई-सुविधा पुरवठयाकामी व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडसदृश्य पार्श्वभूमीवर पक्षकारांना सदरहू लोकन्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित राहता येणार नाही. तथापि या लोकन्यायालयामध्ये सहभागी होवून यशस्वी तडजोड करण्याची इच्छा असेल अशा पक्षकारांसाठी आभासी पध्दतीने सहभाग घेण्यासाठी ई-सुविधेचा उपयोग केला जाणार आहे. आभासी पध्दतीने ऑनलाईनद्वारे सहभागासाठी संबंधित पक्षकारांकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. कोविड कार्यकाळामध्ये सर्वतोपरी शासकीय नियम व आदेशांचा पालन करुन आयोजित केलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीध्ये आपण प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने सहभागी होवून या लोकअदालतीचा लाभ विधीज्ञ व पक्षकार यांनी घ्यावा.
               कोविडच्या या विपरीत काळात लोकांच्या मानसिकरित्या, आर्थिकदृष्ट्या इत्यादी अमुलाग्र बदल होवून अपापसात मतभेद असलेल्या लोकांनी एकमेकांस मदत केली आहे, याही लोकांचे वाद खटले प्रलंबित असतील तर त्यांनी बदलत्या मानसिकतेस अनुसरुन एकमेकांस मदत करत नियोजित लोकन्यायालयात आपापसातील मतभेद विसरुन तडजोडीने खटले मिटवून सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती तृप्ती जाधव यांनी केले आहे.

*सातारा : भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा;* *- उपमुख्यमंत्री अजित पवार*


*सातारा : भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा;*
*कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच जागेची निवड करा* 
*- उपमुख्यमंत्री अजित पवार*
सातारा दि.26 : सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेंचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पुरस्थितीसह भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण)  राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुटलेल्या गावांचा संपर्क पुर्ववत होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची कामे तात्काळ करा. त्यानंतर कायमस्वरुपी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील काही रस्त्यांवर ब्रिटीश कालीन मोऱ्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचारा होऊ शकला नाही. यापुढे अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी. 

या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. खंडीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी आज 100 कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहेत. त्यांना ज्या काही बाबी लागणार आहेत त्या उपलब्ध करुन द्या. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख, केंद्र शासनाकडून 2 लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाखाचाही लाभ देण्यात यावा. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यात किंवा खराब झाल्या आहेत अशा गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा. 

घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच शासकीय मालमत्तेचे पंचनामे लवकरात लवकर करा. ज्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे त्यांना अन्नधान्य, औषधे व इतर बाबी द्या. मदत करीत असताना कोणत्याही तांत्रिक बाबी अडचण येणार नाहीत असे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केल्या.

जिल्ह्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिवीत हानी, शेत जमिनीचे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूस्खलन झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. जिल्ह्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केली. 

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीत आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.

*एन.डी.आर.एफ.च्या पथकाचा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार*

*एन.डी.आर.एफ.च्या पथकाचा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार*
सातारा दि.26: पाटण तालुक्यात मिरगाव, आंबेघर, कोंढावळे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते. या गावांमध्ये वेगाने बचाव कार्य करुन गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम  एन.डी.आर.एफ.च्या पथकाने चांगले केले. याबद्दल गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी एन.डी.आर.एफ. च्या पथकाचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, एन.डी.आर.एफ.चे असिस्टंट कमांडर निखील मुधोलकर आदी उपस्थित होते.

सोमवार, २६ जुलै, २०२१

*आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली ग्वाही*

*आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या   गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली ग्वाही*

▪️ *तात्पुरत्या निवाऱ्याची सोय तात्काळ करणार*

▪️ *मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप*

सातारा दि.26 : पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये मोठया प्रमाणात जिवीत हानी झाली आहे. या बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून बाधितांचे चांगल्या पध्दतीने पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 
 कोयनानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत अतिवृष्टीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.
 पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या भूस्खलनातील जिवीत हानीबरोबर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मिरगाव येथे  बचाव कार्यासाठी रस्ते नव्हते कोयनेच्या बॅक वॉटरमधून  एनडीआरएफ च्या टीमने व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. आपत्तीग्रस्तांच्या भावना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडल्या जातील. भविष्यात भूस्खलनाची थोडीतरी कल्पना आली तरी त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये आजची परिस्थिती निर्माण झाली त्या सर्व गावांना भेटी दिल्या व तेथील नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. या सर्व भावना शासनाच्या दरबारी मांडणार आहे. राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठिशी असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे व तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगतिले.
 यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, विविध यंत्रणांच्या माध्यमातून वाड्यावस्त्यांवर पोहचून घरांचा, पशुधनांचा, शेतीचा शंभर टक्के पंचानामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
चार लाख रुपये राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निघीतून असे पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान या वेळी देण्यात आले.

*सातारा जिल्ह्यातील 586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.26: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  586 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 9(9214), कराड 105 (33783), खंडाळा 65 (12874), खटाव 30 (21274), कोरेगांव 85(18639), माण 20 (14410), महाबळेश्वर 2(4478) पाटण 16(9461), फलटण 103 (30330), सातारा 120(44504), वाई 29(14091) व इतर 2(1599) असे आज अखेर एकूण 214657 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(195), कराड 1 (1003), खंडाळा 1 (161), खटाव 0(504), कोरेगांव 2(400), माण 1 (294), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(323), फलटण 0(501), सातारा 1 (1304), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून साकारली अनोखी छबी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून साकारली अनोखी छबी
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील कलावंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून अनोखी छबी साकारत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी दिल्या आहेत. केवळ ठिपक्यांमधून साकारलेले हे अप्रतिम चित्र परिसरात कौतुकाचा विषय बनले आहे. ‘स्टिपलिंग’ मधून साकारलेल्या या पोर्ट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. अशा प्रकारची विविध माध्यमातून शेकडो चित्रे डाॅ.डाकवे यांनी तयार केली आहेत. चित्र रेखाटत असतानाच त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत देखील केली आहे.

यापूर्वी डाॅ. संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोर्ट्रेट तयार केले होते. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक  ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा तसेच ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये घेतली गेली आहे. ‘स्टिपलिंग’ मधून साकारलेले हे चित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला डाॅ.डाकवे यांचा प्रतिसाद :

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये देवून दिला होता. त्याची दखल सीएम कोविड फंड कार्यालयाकडून घेण्यात आली होती.

रविवार, २५ जुलै, २०२१

*वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये दुर्दैवाने मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे*

*वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये दुर्दैवाने मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे*

*वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलन, छत पडून, दरड कोसळून व पुराच्या पाण्यामुळे आतापर्यत 37  जणांचा मृत्यु झाला आहे.*

*मृत व्यक्तींची नावे व वय पुढीलप्रमाणे*-
*भूस्खलन*
*वाई तालुका* 
*कोंढावळे*
1) राहीबाई मारुती कोंढाळकर  75 वर्षे
2)  भिमाबाई सखाराम वशिवले 52 वर्षे
*पाटण तालुका*
*आंबेघर तर्फ मरळी* 
1)  मंदा रामचंद्र कोळेकर 50 
2) अनुसया लक्ष्मण कोळेकर 45 
3) सीमा धोंडीराम कोळेकर 23 
4) लक्ष्मी वसंत कोळेकर 54 वर्षे
5) सुनिता विनायक कोळेकर 24 
6) वेदीका विनायक कोळेकर 3 
7) रामचंद्र विठ्ठल कोळेकर 55 
8) विनायक वसंत कोळेकर 28 
9) विघ्नेश विनायक कोळेकर 6 
10) मारुती वसंत कोळेकर वय 21 
11) लक्ष्मण विठ्ठल कोळेकर 50 
*काहीर* 
1) उमा धोंडीबा शिंदे 14 

*रिसवड (ढोकावळे)* 
1) सुरेश भांबू कांबळे 53 
2) हरिबा रामचंद्र कांबळे 75 
3) पुर्वा गौतम कांबळे 3 
4) राहीबाई धोंडीबा कांबळे 50 

*मिरगाव* 
1) आनंदा रामचंद्र बाकाडे 50 
2) भूषण आनंदा बाकाडे 17 
3) यशोदा केशव बाकाडे 68 
4) वेदांत जयवंत बाकाडे 8 
5) मंगल आनंदा बाकाडे 45 
6) शितल आनंदा बाकाडे 14 
7) मुक्ता महेश बाकाडे 10 
8) विजया रामचंद्र देसाई 69  
 
*छत पडल्याने*
 *वाई तालुका*
 *कोंढावळे* 
1) वामन आबाजी जाधव 65 

*पुराच्या पाण्यामुळे*
 *जावली तालुका*
 *रेंगडी* 
1)  तानाबाई किसन कासुर्डे 50 
2) भागाबाई सहदेच कासुर्डे 50 
*वाटंबे* 
1) जयवंत केशव कांबळे 45 
 *मेढा* 
1) कोंडीराम बाबूराव मुकणे 45 
*पाटण तालुका*
 *बोंद्री* 
1) वैभव तायाप्पा भोळे 22 
*जळव*
1) तात्याबा रामचंद्र कदम 47 
*सातारा तालुका* 
*कुस बु* 
1) सुमन विठ्ठल लोटेकर 65 
*कोंडवे* 
1) अमन इलाही नालबंद 21 

*दरड कोसळल्यामुळे*
 *महाबळेश्वर तालुका*
 *घावरी* 
1) विजय (अंकुश) मारुती सपकाळ 29 
*पाटण तालुका*
*मंद्रुकोळे* 
1) सचिन बापूराव पाटील 42

*सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आता पर्यंत 37 जणांचा मृत्यु*

*सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आता पर्यंत 37 जणांचा मृत्यु*
*त्यात भूस्खलनामुळे 26, छत पडून 1, दरड कोसळून 2 तर 8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु*, 
*बेपत्ता, भूस्खलन व पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचे शोध घेण्याचे काम सुरु*
सातारा, दि.25 : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे 26 जण, छत पडून 1 जण, 2 जण दरड कोसळल्यामुळे  तर 8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे असे एकूण  37 जणांचा  दुर्दैवीपणे मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
वाई तालुक्यातील 3 जण, जावली तालुक्यातील 4 जण, पाटण तालुक्यातील 27 जण,  सातारा  तालुक्यातील 2 जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील 1 जणांचा मृत्यु झाला आहे.
 वाई तालुक्यातील कोंढावळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यु झाला आहे.
 जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर  मेढा येथील एका पुरुषाचा  पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे.
 पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा  पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यु झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. मिरगाव येथील 4 पुरुष व 4 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे.
 सातारा तालुक्यातील कुस बु येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. 
महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यु झाला आहे.
 पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरु असून अद्यापही अंदाजित एकूण 5 नागरिक बेपत्ता असून जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी; संवेदनशील चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी; संवेदनशील चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम
तळमावले/वार्ताहर
राज्याच्या विविध भागात विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्हयात अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीमध्ये आपला खारीचा वाटा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी’ असा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांर्तंगत आपण आपल्याला हवे असलेले व्यक्तिचित्र डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून रेखाटून घ्यायचे व त्या बदल्यात त्यांना रु.1,000/- किंवा त्यावर स्वइच्छेने कितीही मुल्य द्यायचे. या उपक्रमांतर्गत जमा होणारी सर्व रक्कम पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे. सदर उपक्रम सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वीही कलेच्या माध्यमातून पूरग्रस्त, नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी निधी संकलन करुन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्याला हवा असलेला व्यक्तीचा फोटो  sandeepdakve@gmail.com  या ईमेलवर अथवा व्हाटसअप वर पाठवल्यानंतर डाॅ.संदीप डाकवे त्याआधारे संबंधिताचे काळया रंगाच्या आऊटलाईन मधील आकर्षक रेखाचित्र करुन ईमेल किंवा व्हाॅटसअप करतील. तसेच मुळ चित्र संबंधिताना कुरियर अथवा पोस्टेज केले जाईल.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून आपले रेखाचित्र चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून काढून घेतल्यास आपली मदत थेट पुरग्रस्तांना मिळेल तसेच आपले रेखाचित्र आणि पुरग्रस्तांना स्वतः योगदान दिल्याचे आत्मिक समाधान मिळेल.
एक संवेदनशील कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून चित्ररुपी खारीचा वाटा देवू शकतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या कलेचा संकटाच्या कालावधीत उपयोग होवू षकतो यासारचे दुसरे समाधान नाही. अषी भावनिक प्रतिक्रिया इंडिया बुक ऑफ होल्डर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.
सदर चित्राचे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक,  शाखा - कुंभारगांव, खाते क्रमांक - 0625104000046844, आयएफएससी कोड-0000625 या खात्यावर  ऑनलाईन जमा करावे किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे करावे. तरी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

चौकटीत:
कलेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेली मदत:
नाम फाऊंडेशन ला रु.35,000/- ची मदत
केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- ची मदत
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साठी रु.6,000/- ची मदत
आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज ला रु.5,000/- ची मदत
माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5,000/- ची मदत
कु. ईशीता पाचुपते यांना रु.5,000/- ची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला रु.4,000/- ची मदत ची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी पुरग्रस्तांना रु.3,000/- ची मदत ची मदत
भारत के वीर या खात्यात रु.1,000/- चा निधी जमा

*सातारा जिल्ह्यातील 704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 704 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.24 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  704 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 23(9205), कराड 203 (33678), खंडाळा 20 (12809), खटाव 59 (21244), कोरेगांव 46(18554), माण 52 (14390), महाबळेश्वर 4(4476) पाटण 12(9445), फलटण 60 (30227), सातारा 172(44384), वाई 47(14062) व इतर 6(1597) असे आज अखेर एकूण 214071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(195), कराड 4 (1002), खंडाळा 0 (160), खटाव 0(504), कोरेगांव 1(398), माण 0 (293), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(322), फलटण 3(501), सातारा 4 (1303), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

शनिवार, २४ जुलै, २०२१

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्रआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

श्री. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच ५० टक्क्यांच्या वर गेलेली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ८ जून २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची ५० टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ५ जुलै २०२१ रोजी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेऊन सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

*खा.श्रीनिवास पाटील दिल्लीतून थेट साता-यात*लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टी ठिकाणची केली पाहणी

*खा.श्रीनिवास पाटील दिल्लीतून थेट साता-यात*
लोकसभेचे अधिवेशन सोडून अतिवृष्टी ठिकाणची केली पाहणी
कराड कुमजाई पर्व वृत्तसेवा 
 कराड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खा.श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठला. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी महाबळेश्वर, वाई, कराड तालुक्यातील बाधित ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
    अतिवृष्टी व पूरस्थितूमुळे सातारा जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेकजण दगावले आहेत. शेतीसह रस्ते, पूलांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढावलेल्या परिस्थितीचे गंभीर स्वरूप पहाता खा.श्रीनिवास पाटील हे दिल्लीहून थेट साता-यात आले आहेत. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खा.पाटील हे दिल्ली येथे उपस्थित राहिले होते. तेथून मुसळधार पावसामुळे साता-यातील परिस्थिती पाहून ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र नेहमीच नागरिकांच्या सानिध्यात राहणारे खा.पाटील हे नागरिकांवर ओढावलेल्या बिकट प्रसंगामुळे अस्वस्थ होते. त्यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून पुणे मार्गे सातारा गाठला. साता-यात आल्यानंतर महाबळेश्वर, वाई, कराड तालुक्यातील बाधित गांवाना भेटी दिल्या.
     महाबळेश्‍वर येथे आ.मकरंद पाटील यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित रहात तालुक्यातील जीवित हानी व मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत.  रस्ते दुरुस्त करावे, गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहचावे. वीजपुरवठा तातडीने सुरूळीत करावा. आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रेशनिंग व्यवस्था सुरळीत कराव्या अशा सूचना यावेळी प्रशासनातील अधिकारी वर्गाला त्यांनी केल्या. यावेळी आ.मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजूशेठ राजापूरे, प्रविण भिलारे, श्री किसन शिंदे, गट विकास अधिकारी घोलप आदी उपस्थित होते.
      त्यानंतर वाई तालुक्यातील कोंढावळे (देवरुखवाडी), मेणवली, आभिपुरी, जांभळी व कराड तालुक्यातील पाली येथे भेट देऊन नुकसान झालेल्या परिसराची पहाणी केली. संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन पिकांचे व घराच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन त्यांना दिले.

*सातारा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र व पिकाची माहिती**72 तासांच्या आत कळविण्याचे आवाहन*

*सातारा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र व पिकाची माहिती*
*72 तासांच्या आत कळविण्याचे आवाहन*

सातारा दि. 24 : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.
  माहे जुलै महिन्यामध्ये  काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवयक आहे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक  व बाधिता क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल.
 अधिक तपशिलासाठी तात्काळ नजिकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी सपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

कुठरे : मोळावडे वाडीत पुराच्या पाण्याने ऊस गेला वाहून

कुठरे : मोळावडे वाडीत पुराच्या पाण्याने ऊस गेला वाहून 
प्रतिनिधी / मनोज सावंत 
पाटण तालुक्यातील मोळावडेवाडी कुठरे येथे काल झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. यामधे इलेक्ट्रिक पोल 11 KV   पावसामुळे पडला असून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी विद्युत पुरवठा पाऊस आला नाही तर संध्याकाळपर्यंत पूर्ववत होईल. तसेच  हणमंत काशिनाथ मोळावडे, शांताराम मोरे व आनंद मोरे यांची ऊसाची शेती पूर्ण पावसाने वाहून गेली आहे. सुदैवाने  के टी  बंधारा व्यवस्थित आहे. तसेच सार्वजनिक विहिरी मध्ये पाणी गेले असून सदरची लाईट्स ची यंत्रणा नादुरुस्त झाली आहे . एकंदरीत पावसाने लोकांचे खूप नुकसान झाले आहे.या नुकसानीचे लवकर पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे

*सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश**जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*

*सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश*
*जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*
   
   सातारा दि. 24 : सध्यस्थितीत सातारा जिल्हयातील RT-PCR टेस्ट पॉझीटीव्हीटी रेट पाहता, सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असलेने शासन आदेश दि. 4 जून 2021 मधील सूचनेनुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शेखर सिंह  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 26 जुलै 2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केले आहे.

*आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत*
  सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करणेत येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करणेत येत आहे.
  सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.   अत्यावश्यक बाबीची दुकाने,आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र मेडिकल,औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल,औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास  परवानगी असेल.  
  अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील.  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास  परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास  परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजलेनंतर व शनिवार, रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल. परंतु, हॉटेल व रेस्टॉरंट मध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी लॉजिंगसाठी अगोदर बुकींग करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास  परवानगी असेल. शासकीय, निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.   खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक, धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल. सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02 मार्च 2021 आदेश मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाच्या दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईक, नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल. बैठका, निवडणुक - स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करण्यास आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास  परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास  परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल.मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.
 उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. 
  उत्पादन-जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल, पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास  परवानगी असेल. 
  उत्पादन -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास  परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.  शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास  परवानगी असेल
*सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना*
  ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास  परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.
*अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल*
   रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स. वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने. कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा सार्वजनिक वाहतूक - विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.   राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत.  दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा.शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी).अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने. गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस,आयटी सेवा.सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस/जीवनरक्षक औषधे, फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. 
  सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी, ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा
*सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)*
  केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये. विमा, वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन, वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ. सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था. न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.
*वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके* - वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असे.
*'आयसोलेशन बबल'* म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्यांहची हालचाल.
*दंड-* सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारण्यात यावा.  रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना बंद केली जाईल.
  अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर   रु  500/-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/-इतका दंड आकारला जाईल. या कारवाई नंतरही दुसऱ्यांदा सदर नियमांचे उल्लंघन झालेस पुढील एक महिन्यापर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतरही वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना, दुकान बंद केले जाईल. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंविरुध्द रक्कम रुपये 500/- दंड आकारण्यात यावा. 
CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
   सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय,  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बुधवार, २१ जुलै, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू* *176 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 1012संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू* *176 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.21: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1012 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 15(9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगांव 71(18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10(4446) पाटण 12(9351), फलटण 138 (29851), सातारा 188(43144), वाई 63(13800) व इतर 5 (1567) असे आज अखेर एकूण 210904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1(500), कोरेगांव 0(396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(316), फलटण 1(492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*176 जणांना दिला आज डिस्चार्ज*

: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 176 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


मंगळवार, २० जुलै, २०२१

*वीजतोडणी थांबवून यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पुर्ववत जोडा**-उपमुख्यमंत्री अजित पवार

वीजतोडणी थांबवून यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पुर्ववत जोडा*
*-उपमुख्यमंत्री अजित पवार 
*पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या* 
*थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पुर्ववत करा*

*-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय*

*वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन*
*१५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश*

मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवून, यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. 
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
  राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरीत रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम चार हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणकडून तदनंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करुन दि. १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. हा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण/स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवून तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

*सातारा जिल्ह्यातील 862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 862 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.20 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  862 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 26(9086), कराड 246 (32668), खंडाळा 28 (12556), खटाव 104 (20940), कोरेगांव 50(18241), माण 94 (14058), महाबळेश्वर 3 (4436) पाटण 18 (9339), फलटण 77 (29713), सातारा 124 (43556), वाई 75 (13737) व इतर 17 (1562) असे आज अखेर एकूण 209892 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (191), कराड 12 (990), खंडाळा 0 (158), खटाव 4(499), कोरेगांव 3(396), माण 1 (290), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1(316), फलटण 0(491), सातारा 9 (1290), वाई 1 (311) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5088 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

*पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे*

*पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे*
 पंढरपूर दि. 20 –  पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
             आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.
        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.    
 आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष  असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.      
मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा  (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला
      पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
महापुजेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले तर सुत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...