वाझोली ता.पाटण येथील गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या पावसाने वाझोली मधील डोंगराला मोठया प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तरी तातडीने प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काळगाव विभाग मधील वाझोली व त्यामध्ये असणाऱ्या सलतेवाडी व डाकेवाडी हा दुर्गम व डोंगरांनी असा व्याप्त आहे, व या विभागात मोठया प्रमाणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा दरवर्षी सामना करावा लागतो, गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टी मुळे सर्वत्र पाणी झाले असून शेतामध्ये पाण्याचे उफाळे निघाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वाझोली गावआंतर्ग असणाऱ्या डाकेवाडी व सलतेवाडी या दोन्ही वाड्यामधील व गावातील डोंगराळ भाग हा मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे,तसेच गावामध्ये गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गावातील नळ पुरवठा करणाऱ्या पाईप लाइन तसेच नदी लगत असणारी गाव विहीर तसेच शेतकरी वर्गाचे मोटारी व पाइप पुराचे पाण्याने वाहून गेल्याने नुकसान झाले आहे
या सर्वांची पाहणी करत गावचे सरपंच सौ. शितल लोहार,उपसरपंच सविता मोरे,मा. सरपंच अशोक मोरे, रामचंद्र चव्हाण ,विजया पाटील, सुशीला मोरे, या सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी ग्रामसेविका सौ .माळी मॅडम व पोलीस पाटील विजय सुतार यांनी शेतीचे नुकसान व डोंगराचे होणाऱ्या दरडीचे होणारे नुकसान या बाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे
- वाझोली गावांमध्ये झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे,शेतकरी वर्ग हतबल झाला असून मोठया प्रमाणावर भात शेती व भुईमूग शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच गावातील देवालयाच्या डोंगर वर अवाढव्य वाघधोंडी हा दगड गावातील घरावर केव्हाही कोसळेल या मुळे ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी
:-किसन मोरे (आप्पा) नुकसान ग्रस्त शेतकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा