शुक्रवार, ३० जुलै, २०२१

महावितरणचे कर्मचारी : तुमच्या धाडसला आमचा सलाम...!!

महावितरणचे कर्मचारी : तुमच्या धाडसला आमचा सलाम...!!
सातारा : दि २२,२३ व २४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना नदीला महापूर आला होता .त्यामुळे ३३केव्ही ची मारळी उपकेंद्र कडे जाणाऱ्या लाईनच्या तारा नदी च्या पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. पाण्याची पातळी कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले, परंतु पूरामुळे  वाहून आलेल्या झाडांच्या फांद्या मुळे तारांना पीळ पडला व तारा एकमेकांत अडकल्याने वीजपुरवठा सुरळीत करता येत नव्हता. दोन दिवस प्रयत्न करून ही यश येत नव्हते. एका कर्मचारी धाडस करून, ताराला झूला बांधून लोंबकळत गेला आणि तारांना अडकलेल्या झाडांच्या फांद्या काढून तारा एकमेकां पासून वेगळ्या केल्या.  आणि वीजपुरवठा सुरळीत केला गेला.
असे प्रसंग जिवावर बेतणारे असतात, पूर्ण काळजी घेऊनही असं धाडस करायला जिगर लागते... ती जिगर दाखवून हे केंद्र सुरु करून शेकडो घरात प्रकाश पेरायला कारणीभूत झालेल्या या कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि विद्युत कार्यकारी अभियंता यांनी कौतुक केले आहे.
त्यांच्या धैर्याला, धाडसाला, मेहनतीला सलाम....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...