तळमावले : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या वृक्षसंवर्धन प्रेरणेतून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात आज मा.प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांचा वाढदिवस महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
काकासाहेब चव्हाण महाविद्यालय परिसरात काही वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रमामुळे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन मोठ्या संख्येने झाले आहे.महाविद्यालय परिसर हिरवाईने नटला आहे.मोठं मोठे डेरेदार वृक्ष,हजारो पक्षी त्यांचा किलबिलाट,कडक उन्हाळ्यात देखील गार सावली असल्याने उन्हाळा जाणवत नाही. परिसरात मनमोहक व प्रसन्न वातावरण असून दरवर्षी शेकडो नवीन वृक्षरोपण व संवर्धन होत आहे.आज मा.प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांच्या वाढदिवसानिमित्त मा.एस.के.कुंभार सर - माजी सहसचिव (अर्थ ) व विद्यमान व्यवस्थापन मंडळ सदस्य (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर )यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.अरूण गाडे साहेब , मा श्री ए.बी.माने सर (मुख्याध्यापक श्री वा वि तळमावले ) ,श्री प्रदिप माने (संपादक ,साप्ताहिक कुमजाई पर्व ) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक - प्रा सचिन पुजारी यांनी केले ते शुभेच्छा देताना म्हणाले मँडमना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा....उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हिच बापूजींच्या चरणीं मी प्रार्थना करतो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा