मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून साकारली अनोखी छबी
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील कलावंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ‘स्टिपलिंग’ मधून अनोखी छबी साकारत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी दिल्या आहेत. केवळ ठिपक्यांमधून साकारलेले हे अप्रतिम चित्र परिसरात कौतुकाचा विषय बनले आहे. ‘स्टिपलिंग’ मधून साकारलेल्या या पोर्ट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. अशा प्रकारची विविध माध्यमातून शेकडो चित्रे डाॅ.डाकवे यांनी तयार केली आहेत. चित्र रेखाटत असतानाच त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत देखील केली आहे.
यापूर्वी डाॅ. संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोर्ट्रेट तयार केले होते. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा तसेच ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये घेतली गेली आहे. ‘स्टिपलिंग’ मधून साकारलेले हे चित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला डाॅ.डाकवे यांचा प्रतिसाद :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये देवून दिला होता. त्याची दखल सीएम कोविड फंड कार्यालयाकडून घेण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा