बुधवार, १४ एप्रिल, २०२१

जुल्म ओ बिमारी है जिसका इलाज मैं हु !......गुढे येथील घटनेचा थरार ; स.पो.नी संतोष पवार

जुल्म ओ बिमारी है जिसका इलाज मैं हु !......गुढे येथील घटनेचा थरार ; स.पो.नी संतोष पवार 

  गुढे (ता. पाटण) येथे सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास गाडी आडवी मारण्याच्या कारणावरुन दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही घटणा कराड- ढेबेवाडी मार्गावर गुढे गांवाजवळ भर रस्त्यात सुरु असतानाच सपोनी संतोष पवार पोलीसांसह घटनास्थळी अचानक दाखल होतात  एका युवकाच्या हातामध्ये पिस्तुल असताना देखील जिवाची परवा न करता झडप घालून  गावठी  पिस्तूल काढुन घेऊन त्या दोघा युवकांना ताब्यात घेतात...
एखाद्या चित्रपटातील प्रसंगा प्रमाणे हा प्रसंग होता मात्र या सगळ्या प्रसंगातील रियल हिरो होते स.पो.नी संतोष पवार
 जुल्म ओ बिमारी है जिसका इलाज मैं हु... 

हे संतोष पवार यांनी पुन्हा आपल्या कारवाई तुन सिध्द करून दाखविले आहे
प्रसिद्ध अभिनेता सनि देवल यांच्या फर्ज चित्रपटातील  थरार आणी डायलाॅग या घटनेमुळे आठवण होते. ढेबेवाडी- कराड मार्गावरील गुढे  बस थांब्याजवळ चित्तथरारक घटना घडली. एकमेकांना गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून सचिन जनार्दन सुतार वय 36 आणि रोहित सुनील माने वय 24 या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच  ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी तळमावलेकडून ढेबेवाडीकडे वाहनातून निघाले होते. मारामारी करणाऱ्या  एकाच्या हातात लोखंडी पाईप तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल सापडले.  घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनी संतोष पवार आणि समवेत असणाऱ्या पोलीसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मात्र तत्पूर्वीच यातील एकाच्या डोक्यात घाव घातल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.तो जखमी युवक खाली पडला त्यावेळी त्याचा जवळ गावठी पिस्तुल असलेचे सपोनि संतोष पवार यांचे लक्षात येताच त्यांनी झडप घालून त्याला पकडले व पिस्तुल तसेच जमीनीला दाबुन धरून ठेवून पोलीस हवालदार नवनाथ कुंभार यांस ते काढून घेण्यास सांगितले यामुळे मोठा अनर्थ टळला . दरम्यान जखमी युवकाला तात्काळ ताब्यात घेवून  ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्याची प्रकृती स्थिर असून सध्या दोघेही पोलीसांच्या ताब्यात आहेत . ढेबेवाडी पोलीसांकडून   पिस्तूलधारी युवकाची कसुन चौकशी सुरू आहे. त्याला पिस्तूल कोणाचे,कुठून आणले आहे  मारामारीचे नेमके कारण काय  याची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी  गुन्हा  दाखल झाला नव्हता.घटनास्थळी कार्यवाहीत सपोनि संतोष पवार यांचेसह, सहाय्यक पोलिस फौजदार आर.एल.अंकुशे,पोलिस हवालदार संदेश लादे,राजू घाडगे,शशिकांत खराडे,बाजीराव शेवाळे,नवनाथ कुंभार सहभागी होते
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पोलीसांमुळे अनर्थ टळला...


 वर्दळीच्या रस्त्यावर गुढे बसथांब्याजवळ  दोन युवकांत तुंबळ हाणामारी सुरू असतानाच पोलीस हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला.अगदीच चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच हा प्रसंग होता.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.  युवकाच्या हातात पिस्तूल असतानासुद्धा पुढे जाण्याचे धाडस ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी केल्याने  मोठा अनर्थ टळला.त्यांच्या धाडसाचे उपस्थितांतून मोठे  कौतुक होत होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...