सोमवार, १९ एप्रिल, २०२१

*कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबाला धोका* *- पालकमंत्री बाळासाहेब पाटील**कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा ;*


 *कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबाला धोका*
      *- पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
*कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा ;* 
सातारा दि. 19 :  कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे.  तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार  करण्यास अडचणी येत आहेत, तरी नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असून काही जण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबर मास्कचा, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित आहे त्या कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. शासनाने व प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करुन सर्वांनी संघटीत होवून कोरोना संसर्गावर मात करु या, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...