गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान
●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद
●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार
सातारा / प्रतिनिधी
सातारा ; कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे  पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मधील सर्व सदस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या "पोलिसमॅन ऑफ द मंथ" या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार काढले.
फोटो:पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना पोलिसांचा सन्मान करण्याचे पत्र देताना रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे,संतोष पवार, परवेझ लाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...