संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु*
रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०
तळमावले ; शशिकांत भिंगारदेवेला खुणावतोय ‘टीव्ही’चा पडदा
*सातारा ; जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*
उरण : 1985 सालाचा व्यापारी जहाज वाहतूक कायदा रद्द नवीन कायद्यासाठी मागवल्या सूचना
व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा हा भारतीय नौवहन उद्योगात अमेरिका, जपान, यूके, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित राष्ट्रांमधील उत्तमोत्तम पद्धतींचा अवलंब करून सागरी व्यवसाय क्षेत्राचा विकास करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आला आहे. भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेचे सर्व आधुनिक संकेत आणि नियम या नव्या २०२० कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.जहाजांची सुरक्षितता आणि संरक्षण, समुद्रावर जीवनाचे संरक्षण, सागरी प्रदूषणाला आळा, सागरी प्रवासातील उत्तरदायित्व व भरपाई यांची तरतूद आणि आंतरराष्ट्रीय संकेत पाळून सर्वसमावेशक स्वीकाराची हमी यासाठी पुरेशा तरतुदीही केलेल्या आहेत.
या तरतुदींमुळे अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन-कायद्यानुसार भारतीय जहाजांना सर्वसामान्य व्यापार परवाना घेण्याची आवश्यकता भासणार नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार व नोंदणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धत, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक परवाने, प्रमाणपत्रे आणि पेमेंट यासोबतच इलेक्ट्रॉनिक करार, रेकॉर्डस् आणि लॉग बुक्सना वैधानिक अधिकृत मान्यता मिळणार आहे. माल नेण्याच्या क्षमतेत वाढ आणि जहाजाला व्यापारी मिळकत म्हणून मान्यता, जहाजाच्या मालकी हक्कासंबंधीच्या पात्रता निकषांना शिथिलता देऊन जहाजाची मालकी मूळ कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी (बेअरबोट चार्टर कम डिमाईस) नोंदणी या तरतुदींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अधिक संधी निर्माण होणार आहेत. भारतात बँकेबल शिपिंग कार्यक्षेत्र आणि अडचणींच्या परिस्थितीला अटकाव प्रस्तावित विधेयक हे सागरी घटनांसाठी तत्काळ प्रतिसाद निर्धारित करण्यासाठी हा नवा कायदा पहिल्यावहिल्या अधिकृत चौकटीला आकार देणारा ठरणार आहे. या तरतुदी प्रतिसाद यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीची सुविधा देत एखादी दुर्घटना वा इतर आपत्ती यापासून संरक्षण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा दावाही संबंधित मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
काम सोडून दिलेल्या जहाजावरील खलाश्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद या नव्या कायद्यात सुधारणा केली आहे. तसेच जहाजावरील खलाशांचे पुनर्वसन, जहाजांची सुरक्षा, निर्णय आणि दाव्यांच्या अंदाजाचे बळकटीकरण करणेही शक्य होणार आहे. समुद्रात जहाजाच्या टकरीच्या घटनांचा तपास आणि निवाडा यासंबंधीचे दाव्यांना बळकटी येण्यासाठी, उच्च न्यायालयाकडून मूल्यांकनकर्त्यांना प्रत्येक जहाजाच्या दोषाचे मापन करण्याची मुभा देण्याची सोय या नव्या कायद्याच्या मसुद्यात केली आहे.
मसुद्यावर जनतेकडून मागविल्या २४ डिसेंबरपर्यंत इमेलद्वारे सूचना
भारत हे सक्रिय अंमलबजावणी कार्यक्षेत्र बनणार आहे. त्यामुळे असुरक्षित तसेच समुद्रात जीविताला धोका उत्पन्न करणाऱ्या जहाजांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांना देण्याचे आणि ते ताब्यात घेण्याच्या आदेशावर अपील करण्याचे अधिकार कायद्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. व्यापारी जहाज वाहतूक कायदा १९८५ आणि १८३८ किनारी जहाज कायदा रद्द करून सार्वजनिक सल्लामसलतीसाठी व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा प्रसारित केला आहे. . नागरिकांना त्यांच्या सूचना msbill2020@gmail.com या इमेल आयडीवर २४ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवता येतील.
शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०
सातारा : जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिमलोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार
बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०
प्रार्थना, धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या गर्दीला तिथल्या व्यवस्थापणाने मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचा आग्रह करावा - जिल्हाधिकारी शेखर सिंहशाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे
तळमावले ; सायकलवरून तो शोधतोय जगण्याची ‘वाट’
सातारा ; जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 12 बाधितांचा मृत्यु
मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०
मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार -मुख्यमंत्री
मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार -मुख्यमंत्री
मुंबई, दि. २३ : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोरी येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.निर्मिती खर्च ३ ते ४ पैसे प्रतिलिटर इतका खर्च येणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.
सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०
निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा
खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शिवसमर्थ दिवाळी अंकाचे प्रकाशन
रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०
महाराष्ट्र पुन्हा होणार लॉकडाऊन ?
तळमावले ; पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट
*सातारा जिल्ह्यातील 166 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;3 बाधितांचा मृत्यु**20 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 19 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०
शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन घेणार निर्णय.- शिक्षणमंत्री
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०
सातारा ; कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा ; जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
सातारा - जिल्ह्यातील 246 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;6 बाधितांचा मृत्यु
मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा अर्ज
मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा अर्ज
मुंबई, दि. १८ : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
नवी दिल्लीतील सरकारी वकील अॅड. सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. राज्य सरकारने २० सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम आदेश स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करणारा पहिला अर्ज ७ ऑक्टोबर, दुसरा अर्ज २८ ऑक्टोबर, तिसरा अर्ज २ नोव्हेंबर तर चौथा अर्ज १८ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला.यापूर्वी २ नोव्हेंबरला मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विषद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सूचित करण्यात आले होते. परंतु, अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नसल्याने राज्य शासनाने चौथ्यांदा अर्ज सादर केला आहे.
बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 94 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;7 बाधितांचा मृत्यु
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1, लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,
कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1, .
पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1 .
फलटण तालुक्यातील साखरवाडी 2, .
खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1, .
माण तालुक्यातील राणंद 1, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, .
जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1, .
वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4, .
इतर नंदगाणे 3, .
3 बाधितांचा मृत्यु .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दिव्यनगरी ता.
"दिलखुलास" कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आज मुलाखत
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०
कुंभारगाव : सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी येथे आज केली घटस्थापना
कुंभारगाव : सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी येथे आज केली घटस्थापना
तळमावले / वार्ताहर
मोरेवाडी कुंभारगाव ता.पाटण येथील ग्रामदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी ता.पाटण आज (ता. 16) घटस्थापना करण्यात आली. आजपासून उपवासाला सुरुवात झाली उपवास काळातील 12 दिवस देवाला पोषाखाद्वारे वेगवेगळे रूप दिले जाते. बलिप्रतिपदा, दीपवाली पाडव्याला मंदिरामध्ये घटस्थापना करून उपवासाची सुरुवात होते व एकादशीला दि.26 नोव्हेंबर रोजी उपवासाची सांगता होणार आहे. अशी माहिती श्री.दिलीप घाडगे यांनी दिली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मंदिरे बंद आहेत; परंतु राज्य सरकारने आजपासून (साेमवार) मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे.योगायोगाने आज श्री.सिद्धनाथ मंदिरात घटस्थापना करण्यात आली. सात महिन्यांपासून बंद असणारे मंदिर आज दिवाळी पाडव्याला उघडून घटस्थापना झाल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
अखेर मुहूर्त भेटला राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे या दिवशी उघडणार !
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०
कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाट्सअप आणि ब्लॉगचा वापर - कृषिमंत्री दादाजी भुसे
कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाट्सअप आणि ब्लॉगचा वापर - कृषिमंत्री दादाजी भुसे
मुबई, : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.
राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे.मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.
मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत**जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर* *व्हिडीओग्राफी मध्ये कुंभारगावचे अनिल उत्तमराव देसाई यांच्या टीमने पटकवला द्वितीय क्रमांक*
तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. यंदा कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर ना.देसाई हे वाढदिवस साजरा करणार नाहीत. परंतू त्यांच्यावर प्रेम करणारे डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांची विविध भावमुद्रा रेखाटून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.
शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०
सातारा ;जिल्ह्यातील 149 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.13 : जिल्ह्यात काल गुरुवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 149 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 5, यादोगोपाळ पेठ 2, गोडोली 1, विलासपूर 1, विकासनगर 2, क्षेत्र माहुली 1, आसनगाव 1, शाहुपुरी 4, देगाव 1,वडगाव 1, बोते 1, मुळीकवाडी 1, पळशी 1, वेळेकामटी 1, मोळाचा ओढा सातारा 3, जिहे 1, सदरे खुर्द 1, वेण्णानगर 1, राजसपुरा पेठ सातारा 2, कृष्णानगर सातारा 1, वेतने 2, गोजेगाव 1, .
कराड तालुक्यातील कराड 4, आगाशिवनगर 2, इंदावली 1, बेलवडे 1, सुपने 2, .
पाटण तालुक्यातील बादेवाडी 2, हेळगाव 1,दिवशी 1, धामणी 1, .
फलटण तालुक्यातील नरसोबानगर 1, खुंटे 1, जाधववाडी 1, उपळे 1,मलटण 1, ब्राम्हण गल्ली 1, आसु 1, शेरेचीवाडी 1, होळ 1, सुरवडी 2, .
खटाव तालुक्यातील मायणी 2, खटाव 1, लांडेवाडी 1, पिंपरी 1, बुध 1, वडूज 6, सिंहगडवाडी 1, पुसेगाव 5, भुरकवाडी 1, .
माण तालुक्यातील म्हसवड 3, कुक्कुडवाड 1, निढळ 1, बिदाल 2, वडगाव 2, राणंद 2, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, लक्ष्मीनगर 1, वर्णे 1, चिलेवाडी 2,रहिमतपूर 11, .
जावली तालुक्यातील मेढा 1, बामणोली 1, .
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, सुरुर 1, वेळे 2, पाचवड 1, व्याजवाडी 1, धर्मपुरी 2, नव्याचीवाडी 1, बावधन 1, .
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, .
इतर 1, शिंदेघर 14, मामुर्डी 1, .
बाहेरी जिल्ह्यातील पुणे 2, पिंपरी 1, .
* 5 बाधितांचा मृत्यु* .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता.
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 12 : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.
कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्त्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अॅड.ठाकूर म्हणाल्या.
खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा -कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 12 : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
कृषी विभागातील विषयनिहाय आढावा बैठक नुकतीच कृषीमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह राज्यातील संचालक, सर्व विभागीय कृषी सहसंचालक उपस्थित होते.या बैठकीत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करणे याबाबतचा आढावा घेण्यात आला.राज्यात मोठ्या प्रमाणात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू असून त्यांचा तपशील विभागाकडे असणे आवश्यक आहे.
गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०
*अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी ना नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची पुनर्नियुक्ती करावी-पाटण तालुक्यातील मराठा समाज आक्रमक*
पाटण / वार्ताहर
दि.12 पाटण :राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी ना नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांची पुनर्नियुक्ती करावी यासाठी पाटण तालुक्यातील महामंडळाचे लाभार्थी तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाटण येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,
साहेबांची नियुक्ती रद्द केल्याने पाटण तालुक्यात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, साहेबांची मराठा समाजाविषयी असणारी तळमळ व त्यांची महामंडळाचे अध्यक्ष असताना केलेल्या प्रामाणिक कामाची पद्धत बघता या पदावर राज्य शासनाने त्यांची सन्मानाने नियुक्ती करावी यासंबंधीची मागणी पाटण तालुक्यातून होत आहे .
तळमावले ; काटेकर परिवाराचा आकाश कंदील करतोय जनजागृती
तळमावले/वार्ताहर
ता. पाटण : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिपावलीकडे पाहिले जाते. हा सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा होता. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात.उंच जागी आकाश कंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. घराघरात फराळाची रेलचेल पाहायला मिळते. पावसाळा संपून नवीन पीके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य व्दादशी ते कार्तिक शुध्द व्दितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे आॅक्टोंबर नोव्हेंबर दरम्यान येत असतो.
सातारा ; जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.12 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 1, लोहार गल्ली सातारा 1, सदरबझार 2, शाहुपुरी 4, कोडोली 2, संभाजीनगर 1, गोजेगाव 3, कळंबे 2, दिव्यनगरी सातारा 3, गोवे 1, कोंढवे 1, मोरेगाव 1, वर्णे 3, वेणेगाव 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1, चोराडे 1, .
कराड तालुक्यातील कराड 4, पोटले 2, कोर्टी 1, मलकापूर 2, कोयना वसाहत 2, उंब्रज 1, कोळे 6, सुरली 1, .
पाटण तालुक्यातील तारळे 6, .
फलटण तालुक्यातील महतपुरा पेठ 1, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 2, खामगाव 4, मुरुम 1, वेळोशी 1, काळज 1,सुरवडी 2,हिंगणगाव 2, .
खटाव तालुक्यातील गोरेगाव 1, मायणी 1, काटेवाडी 3, राजापुर 1, वडूज 10, गुरसाळे 1, औंध 2, पुसेगाव 2,दारुज 5, पुसेसावळी 1, म्हासुर्णे 4,मायणी 1, .
माण तालुक्यातील म्हसवड 8, दहिवडी 1,पळशी 1,गोंदवले खुर्द 1, बिदाल 2, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, हिवरे 1, रहिमतपूर 7, चिमणगाव 1,पिंपरी 1, आर्वी 2, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1, .
जावली तालुक्यातील कुडाळ 5, मेढा 3, बामणोली 2, रायगाव 3, .
वाई तालुक्यातील रविवार पेठ 3,वेळे 1, कनुर 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, विंग 1, झगलवाडी 1, .
*इतर*2, पिंपळवाडी 1, शिंदेघर 7,शिंगणवाडी 1, विठ्ठलवाडी 3, .
3 बाधितांचा मृत्यु .
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कर्वे ता.
राज्यात 19 नोव्हेंबरपासून ‘कौमी एकता सप्ताह’
राज्यात 19 नोव्हेंबरपासून ‘कौमी एकता सप्ताह’
सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सहभागी होण्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन
मुंबई, दि. 11 : राज्यात येत्या 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
या सप्ताहांतर्गत गुरूवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल.यामध्ये धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे आयोजन करण्यात येईल. शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शनिवार 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारशाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात येतील. रविवार 22 नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. यामध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनार आयोजित करण्यात येतील. सोमवार 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मतेसंबंधीची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मंगळवार 24 नोव्हेंबर हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. बुधवार 25 नोव्हेंबर हा जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतर ठेवून शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.
याबरोबरच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने कौमी एकता सप्ताहामध्ये ‘सांप्रदायिक सदभावना मोहीम निधी संकलन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी ‘ध्वजदिन साजरा’ करण्यात येणार आहे. ध्वजदिनाचा निधी संकलित करण्याकरिता व संकलित केलेला निधी राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्याकडे सुपूर्द करण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...