शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत**जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर* *व्हिडीओग्राफी मध्ये कुंभारगावचे अनिल उत्तमराव देसाई यांच्या टीमने पटकवला द्वितीय क्रमांक*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत*
*जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर* 

*व्हिडीओग्राफी मध्ये कुंभारगावचे अनिल उत्तमराव देसाई यांच्या टीमने पटकवला द्वितीय क्रमांक*


फोटो ; शाॅर्ट फिल्म मधील एक दृश्य

सातारा :  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये
कुंभारगांव (ता.पाटण) येथील श्री.अनिल उत्तमराव देसाई व त्यांचे सहकारी यांनी कोरोनाविषयी जनजागृती करणारी एक शाॅर्टफिल्म तयार केली होती. कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे, कोरोनाची अनाठायी भिती लोकांच्या मनातून काढण्याचे काम ही शाॅर्टफिल्म करत आहे. शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही शाॅर्टफिल्म तयार केली. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या शाॅर्टफिल्म मध्ये रोगाची काळजी न करता स्वतःची काळजी घेतल्यास काही होत नाही असे दर्शवण्यात आले आहे  
ही शॉर्टफिल्म  सातारा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या व्हिडीओग्राफी स्पर्धांत पाठवण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांक राकेश फासे, द्वितीय क्रमांक अनिल उत्तमराव देसाई, (कुंभारगाव )तृतीय क्रमांक वेदांतिका सपकाळ यांनी पटकवला आहे.
देसाई यांच्या या शाॅर्टफिल्म चे लेखन दिलीपराज चव्हाण(उंब्रज) यांनी केले आहे. तसेच अनिल देसाई, अशोक मोरे, महेश चाळके व पोपट चाळके यांनी कलावंत म्हणून काम केले आहे. तर कॅमेरामन म्हणून शंभूराज अनिल देसाई, युवराज लोटळे यांनी काम पाहिले आहे. या फिल्मसाठी ग्रामपंचायत कुंभारगांव, प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले मधील डाॅ.उमेश गोंजारी सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांचे तसेच दै.कृष्णाकाठचे संपादक श्री.चंद्रकांत चव्हाण, डाॅ.संदीप डाकवे,प्रा. रमेश गुरव,राजेंद्र पुजारी,यांचे सहकार्य लाभले आहे.अनिल देसाई हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. त्यांना कलावंताविषयी विशेष आदर आहे. त्यांनी विविध मालिकांच्या सेटवर जावून अनेक नामवंत कलावंतांना भेटी
घेतल्या आहेत. यामुळे आपणही काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात बरेच दिवस होती. ती इच्छा त्यांनी या शाॅर्टफिल्म च्या माध्यमातून पूर्ण केली या शाॅर्टफिल्मला सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व परिसरातून कौतुक होत आहे.

सर्व गटातील विजेते पुढीलप्रमाणे

वकृत्व स्पर्धा शालेय गट : प्रथम क्रमांक सानिका  बाबर चाफळ ता. पाटण, द्वितीय क्रमांक सिमरन   भोसले सायगाव ता. जावली तृतीय क्रमांक समीक्षा धायगुडे खंडाळा. महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक गौरी  शिंदे खंडाळा, द्वितीय क्रमांक सानिका घोळवे सातारा रोड ता. कोरेगाव, तृतीय क्रमांक श्रेया कणसे मायणी ता. खटाव. खुला प्रथक क्रमांक गट मनीष शिंदे वाई, द्वितीय क्रमांक अनुपमेय जाधव पाटण, तृतीय क्रमांक पुरुषोत्तम माने महाबळेश्वर.

 गीत गायन स्पर्धा : शालेय गट प्रथक क्रमांक सार्थक जाधव शिरवळ ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक ओंकार कांबळे कराड, तृतीय क्रमांक वैष्णवी माने लिंब ता. सातारा. महाविद्यालय गट प्रथक क्रमांक सलोनी चौगुले सातारा, आकांक्षा इंदलकर शिरवळ ता. खंडाळा, तृतीय क्रमांक स्नेहा आंधळकर खटाव. खुला गट प्रथम क्रमांक अनुपमना दाभाडे मेढा ता. जावली, द्वितीय क्रमांक भारती पेठकर लोहाटे ता. वाई, तृतीय क्रमांक मिलिंद कांबळे विहे - नं 2 ता. पाटण.

 नाटीका स्पर्धा : शालेय  गट प्रथक क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हई ता. कोरेगाव, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकाशी वस्ती ता. खंडाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकिव ता. जावली. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय खंडाळा. खुला गट प्रथक क्रमांक राजेंद्र खाडे व मित्रमंडळ माण.

 एकपात्री अभिनय स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक पूर्वा भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हई ता. कोरेगाव, द्वितीय क्रमांक चंदना देशमुख गुरुवर्य गणपतराव काळगे विद्यालय मोरमांजरवाडी ता. खटाव, तृतीय क्रमांक संचिता बेलोशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर ता. जावली. महाविद्यालयीन गट संचित भोसले महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातारा, द्वितीय क्रमांक सिद्धी ढमाळ परमपुज्य बापुजी साळुंखे विद्यालय आसवली ता. खंडाळा, तृतीय क्रमांक मुस्कान सय्यद चं.व. पाटील विद्यालय सातारा रोड ता. कोरेगाव. खुला गट प्रथक क्रमांक अमितकुमार शेलार, ज्ञा.प्रा. शाळा कृष्णानगर ता. सातारा, द्वितीय क्रमांक अतुल नानोटकर जिल्हा परिषद शाळा सायगाव ता. जावली, तृतीय क्रमांक प्रवीण शीलवंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळई ता. माण.

 निबंध स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक  साई फडतरे छ.शिवाजी हायस्कूल वडूज, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज रसाळ जिल्हा परिषद शाळा खर्शी ता. जावली, तृतीय क्रमांक आदिती चोरट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसगाव ता. सातारा. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक श्रुती बर्गे शिवाजी महाविद्यालय मसूर ता. कराड, द्वितीय क्रमांक स्वरांजली पुंडेकर कात्रेश्वर महाविद्यालय कातरखटाव ता. खटाव, तृतीय क्रमांक सुश्मिता कलाल क्रांती विद्यालय सावली ता. जावली.

 प्रश्न मंजुषा स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक चंदना देशमुख, गु,ग, काळंगे विद्यालय मोळ ता. खटाव, द्वितीय क्रमांक अभिषेक जाधव म.स. विद्यालय सातारा, तृतीय क्रमांक सिमरन भोसले लोहिया विद्यालय सायगाव ता. जावली. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक देवता पोतेकर म.स. विद्यालय व ज्यु . कॉ. सातारा, द्वितीय क्रमांक ऋतुजा साळुंखे हु.प. विद्या. व ज्यु कॉलेज वडूज ता. खटाव, तृतीय क्रमांक  मनीषा होवाळ न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज  अंदोरी ता. खंडाळा

 पोस्टर/रांगोळी स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक यशस्वी साळुंखे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार बु ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक साक्षी भोसले नवचैतन्य हायस्कूल गोंदवले ता. माण, तृतीय क्रमांक पायल भोसले म. गांधी विद्यालय उंब्रज ता. कराड.

 भित्तीचित्रे व घोषवाक्य स्पर्धा : शालेय गट भाग्यश्री कोळीक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुखेड ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक निरज जाधव मेरु विद्यामंदिर वाघेश्वर ता. जावली, तृतीय क्रमांक अथर्व पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरफळ ता. सातारा.
 फोटो स्पर्धा : प्रथक क्रमांक जावेद खान, द्वितीय क्रमांक मंगेश चिकणे तृतीय क्रमांक गणेश गुरव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...