बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

तळमावले ; सायकलवरून तो शोधतोय जगण्याची ‘वाट’

तळमावले ; सायकलवरून तो शोधतोय जगण्याची ‘वाट’
तळमावले/प्रतिनीधी
तळमावले ता.पाटण ; पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज 56 किमी.चा प्रवास सायकलवरुन करतोय.56 किमी.रपेट करत दिवसभर हमालीचे काम करत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न गणेश मराठे करतोय.23 मार्चला संपूर्ण देश लाॅकडाउन झाला.अनेकांची स्वप्ने धुळीला मिळाली.रोजगाराविना अनेक जणांचे संसार उघडयावर आले.अशा संकटात पाटण तालुक्यातील पाचुपतेवाडी गुढे येथील गणेश सापडला आहे.आपल्या कुटूंबाच्या उपजीवीकेसाठी शाळेनंतर मुंबईची वाट धरणारा गणेश लाॅकडाउन झाल्यानंतर गावी आला.आई-वडील,पत्नी,लहान मुलगी यांची जबाबदारी गणेशवर आली.लाॅकडाउनमुळे परिसरात कोणताही उद्योगधंदा नसल्यामुळे कराड सारख्या ठिकाणी त्याला कामधंदा स्विकारावा लागला.लाॅकडाउनमुळे सर्व प्रवासाची साधने बंद होती? काम तर करायला हवे? पण येण्या जाण्याचा प्रश्न होता? पण म्हणतात ना अडचणीतून मार्ग काढतो तोच जीवनात यशस्वी होतो.गणेशने देखील प्रवासाचा बाब न करता थेट सायकलवरच टांग मारली आणि कराड येथे कामावर हजर झाला.तब्बल 56 किमी.च्या सायकल प्रवासाने संपूर्ण शरीर थकून जाते तेवढयाच उत्साहाने आपले काम त्याने आजअखेर सुरू ठेवले आहे.
संकटातूनही जीवनाची वाट शोधणाऱ्या गणेशला या निमित्ताने सलाम ठोकावा वाटतो.गणेश हा कामाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी असतो.आपल्या ध्येयाच्या आड परिस्थिती,वय,शिक्षण आड येवू न देता कुटूंबाची जबाबदारी स्विकारणाऱ्या गणेशचे समाजातून व विभागातून कौतुक होत आहे.इतर अडचणी सांगून गप्प राहणाऱ्या तरूणांनी गणेषचा आदर्श डोळयासमोर घ्यायला हवा.  कोणतेही काम कमी नसते आणि प्रत्येक कामाविषयी प्रेम करण्यासही गणेश शिकवतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...