तळमावले/वार्ताहर
मान्याचीवाडी (डोंगरावरील) गुढे ता.पाटण येथील रामचंद्र कोंडिबा बोत्रे-साळुंखे यांचे रविवार दि. 12 जुुलै 2020 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. परिसरात ते तात्या या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी 2 मुले, सुना, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांचे ते चुलते होत. कराड फार्मसी काॅलेजच्या पहिल्या बॅचचे टाॅपर विद्यार्थी होते. समाजशील, धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा