गुरुवार, २ जुलै, २०२०

तळमावले; महावितरणकडून जनतेला वीजबील दरवाढीचा ‘शाॅक’

तळमावले; महावितरणकडून जनतेला वीजबील दरवाढीचा ‘शाॅक’

तळमावले/डाॅ.संदीप डाकवे 
महावितरणकडून नुकत्याच दिलेल्या वाढत्या वीजबीलामुळे जनतेला चांगलाच ‘शाॅक’ बसला आहे. 23 मार्च, 2020 रोजी संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला आणि सर्वांचेच कंबरडे मोडले. सर्व घटकांवर त्याचा दूरगामी परिणाम झाला. सर्व जनजीवनच ठप्प झाले. अशा काळात एकमेकाला माणूसकीच्या नात्याने मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा संकटाच्या काळात मात्र महावितरणाकडून लोकांना राजरोसपणे लुटण्याचे काम सुरु आहे की काय याची शंका येते. लाॅकडाऊनमुळे मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्याची बीले देता आली नाहीत. यात महावितरण कार्यालयाचा दोष नाही हे आपण समजू शकतो. परंतू या चार महिन्यांच्या कालावधीतील एकत्रीत बिलाची रक्कम पाहिली तर जनतेला दिलासा मिळण्याऐवजी ‘440 चा करंट’ बसला आहे असेच वाटते.
वीजबीलाच्या पाठीमागे असलेला युनिट व वीज आकार तक्ता पाहिला तर आपल्या हे सहज लक्षात येवू शकते. एमटीआर आॅर्डर 322/2019 च्या आदेशानुसार विद्युत नियामक आयोगाने दि.1 /04/2020 या नवीन आर्थिक वर्षापासून युनिटप्रमाणे दर काही पैशात वाढवले आहेत. 0-100 या युनिटमध्ये 0.41 पैसे, 101-300 या युनिटमध्ये 0.48 पैसे, 301-500 या युनिटमध्ये 0.42 पैसे, 501 ते 1000 या युनिटमध्ये 0.41 पैसे प्रति युनिट वाढवले आहेत. तर 1000 पर्यंत 0.81 पैसे कमी केले आहेत.
उदाहरणादाखल पाहिले असता महिन्याला सरासरी रु.350 बील येणाÚया ग्राहकाला सध्याच्या चार महिन्याचे बील सर्वसाधारणपणे रु.1400/- च्या पटीत यायला काहीच हरकत नाही. परंतू अशा ग्राहकाला हेच बील रु.2,160/- इतके भरमसाठ आले आहे. म्हणजे चार महिन्याच्या बीलावर अजून दोन महिने ज्यादा बील द्यावे लागत आहे. आता हे बील ज्यादा कसे आले आहे हे पाहायचे असेल तर पाठीमागे युनिट आणि त्यावर आकारलेला दर हे पाहावे लागेल.
सध्या ग्रामीण भागात चार बल्ब, दोन पंखे, टीव्ही, फ्रीज, इस्त्री, मिक्सर, मोबाईल चार्जींग व अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे वापरली तरी त्यांचे सरासरी वापरलेले युनिट हे 100 युनिटच्या आतच येते. महावितरणाच्या निकषानुसार 100 च्या आत युनिटवर प्रति युनिट 3.46 इतका दर आहे. परंतू 100 युनिट च्या वर गेल्यामुळे हा दर 7.43 इतका गेला आहे. साहजिकच सदर बील हे डबल आले आहे. याचा अर्थ गेली 4 महिने महावितरणने ग्राहकांना बील न देवून दिलासा दिला की एकदम चार महिन्याचे बील देवून पध्दतशीरपणे लुटले याचा शोध घ्यावा लागेल.
सध्य परिस्थितीत सर्वसाधारणपणे एका ग्राहकाचे 4 महिन्याचे एकूण युनिट 270 इतके झाले आहे. हे युनिट अर्थातच 100 च्या आत नाही त्यामुळे त्या ग्राहकाला 7.43 ने पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अशा ग्राहकाचे बील 2,006 इतके होत आहे. परंतू त्याला बील हे रु.2,180/- इतके आले आहे. 270 युनिटचे 4 महिन्यात, भागात विभाजन केले तर प्रति महिना 67.5 इतके युनिट होत आहे. हे युनिट 100 पेक्षा कमी असल्यामुळे प्रति युनिट 3.46 ने ते मोजले असता बीलाची रक्कम प्रति महिना रु.233.55 इतकी होत आहे. 233.55 प्रमाणे 4 महिन्याचे बील केले असता रु.934.2 इतकी रक्कम होते. आणि सध्या दिलेल्या बीलाची रक्कम रु.2,180/- इतकी आहे म्हणजे ग्राहकाला तब्बल दीडपट बील जास्त येत आहे. असे म्हणणे रास्त ठरते. याला जबाबदार कोणाला धरायचे ?
अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वजण हतबल झाले आहेत त्यात महावितरणने सध्या दिलेल्या बीलातील रक्कम पाहून लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यामुळे शासनाकडून या गंभीर बाबीची दखल घेवून सर्व ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा ही माफक अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.

चैकटीत:
सध्या बिकट परिस्थिती असतानाही लोक वीज बील भरण्यास सहकार्य करत आहेत. परंतू ते बील नेहमीच्या सरासरीएवढे यावे अशी माफक अपेक्षा आहे. किंवा प्रत्येक महिन्याचे वापरलेले वीजेचे युनिट आणि त्याप्रमाणे पैसे हे वेगवेगळे द्यावे त्यामुळे महावितरणचे देखील नुकसान होणार नाही आणि ग्राहकांना देखील त्याची झळ बसणार नाही.
- शिवाजीराव पवार, सामाजिक कार्यकर्ते, काळगांव

सध्या महावितरणकडून डिजिटल माध्यमांचा वापर योग्य रितीने केला जात आहे. प्रत्येक ग्राहकाचा नंबर महावितरणच्या कार्यालयाला जोडला गेला आहे. त्यामुळे एक तर प्रत्येक महिन्याचे बील स्वतंत्र देण्यात यावे किंवा प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईल महिन्याचे नाव आणि त्याने वापरलेले युनिट व त्या महिन्याची बीलाची होणारी रक्कम पाठवावी त्यामुळे ग्राहकाला काही प्रमाणात दिलासा मिळेल.
-एक ग्राहक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...