बुधवार, २२ जुलै, २०२०

पारनेर : कोरठण खंडोबा मंदिर परिसरातुन चांदीच्या पादुका चोरी

पिंपळगावरोठा (ता.पारनेर )कोरठण खंडोबा मंदिर परिसरात पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसा यांच्या घोड्यावर स्वार असलेल्या मूर्तीसमोरील ४०० ग्रॅमच्या चांदीच्या पादुकांची सोमवारी पहाटे चोरी झाली.

मूळ मंदिरातील मूर्ती, पादुका व इतर वस्तू मात्र सुरक्षित आहेत. सोमवती अमावास्येनिमित्त कोरठण गडावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे भाविकांची गर्दी नव्हती.

शासनाच्या आदेशानुसार गेल्या १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. पुजारी देविदास एकनाथ क्षीरसागर व दत्तात्रय सुभाष क्षीरसागर तीन वेळा नित्य पूजाअर्चा करतात.

२० जुलैला सायंकाळी पाचला भाऊसाहेब यशवंत पुंडे हे परिसरात फिरत असताना भक्तनिवासाच्या तीन खोल्यांचे कोयंडे तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांना ही माहिती दिली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड यांनी यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...