रविवार, १२ जुलै, २०२०

अजित चव्हाण यांच्या फोनमुळे संदीप डाकवे भारावले

अजित चव्हाण यांच्या फोनमुळे संदीप डाकवे भारावले
तळमावले/वार्ताहर
इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी सुप्रसिध्द न्यूज अॅंकर अजित चव्हाण यांचे सुंदर रेखाचित्र रेखाटून त्यांना व्हाॅटसअप केले. हे चित्र पाहिल्यानंतर अजित चव्हाण यांनी संदीप डाकवे यांच्याशी फोनवरुन मनमोकळपणाने संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘डाॅक्टरसाहेब नमस्कार...! अजित चव्हाण बोलतोय, कसे आहात? थॅंक्यू सो मच..!, तुम्ही एकदम छान माझं चित्र काढून दिलंत. खूप खूप आभारी आहे. पाटणला येत असतो नेहमी...मी सध्या पुण्यामध्ये आहे, माझं आॅफीस पुण्यामध्ये आहे. अॅंकरिंग आणि पत्रकारिता हे माझं पॅशन आहे. मी शेतकÚयाचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय, खूप आनंद वाटला बोलून. काही माझ्या लायक काम असेल तर सांगत चला, माझे मित्र महाराष्ट्रभर आहेत, त्यात आणखी एका मित्राची भर पडली. भेटू आपण. पाटणला बÚयापैकी येणं जाणं होतं. आपण मात्र भेटू एकदा नक्की..!  
झी 24 तासचे पुणे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे यांच्या माध्यमातून हा संवाद घडून आला. या सवंादामुळे डाकवे मात्र भारावून गेले.
संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची मोहिनी अनेकांना पडली आहेत्र अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते इ.नी त्यांचे जाहीर कौतुकदेखील केले आहे. कला आणि पत्रकारिता यात आपला वेगळा ठसा उमटवणारे डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. विविध छंदाबरोबर पत्रमैत्री हा छंद त्यांनी मोठ्या कौशल्यपूर्वक जपला आहे.
इलेक्ट्राॅनिक मिडीयावर पाहिलेला चेहरा आणि ऐकलेला आवाज, त्याच आवाजाच्या लकबीतून डाकवे यांच्याशी अजित चव्हाण यांनी फोनवरुन संवाद साधला. या आपुलकीच्या संवादामुळे नवनवीन उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन मिळेल असे डाकवे यांनी म्हटले आहे. सुप्रसिध्द न्यूज अॅंकर अजित चव्हाण यांनी फोनवरुन साधलेल्या या दिलखुलास संवादामुळे डाॅ.संदीप डाकवे हे खुश झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...