शुक्रवार, १० जुलै, २०२०

तळमावले ; सुप्रसिध्द पाश्र्वगायिका कविता राम. यांच्या समर्पण फाऊंडेशनची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी

समर्पण फाऊंडेशनची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी

तळमावले/वार्ताहर
मराठी चित्रपटसृष्टीत गायनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख करणारे एक नांव म्हणजे सुप्रसिध्द पाश्र्वगायिका कविता राम. पाटण तालुक्यातील कुंभारगांव येथील चिचांबा माटेकरवाडी हे त्यांच गाव. चंदेरी दुनियेत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतानाच त्यांनी आपल्या गावाशी असणारे नाते जपले आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. सामाजिक क्षेत्रात आपल्याला भरीव काम करता यावे यासाठी त्यांनी समर्पण फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा येथे निरीक्षक पी.आर. येवले, निरीक्षक आर.एच. देवरे, ज्युनिअर क्लार्क एम.एम.ढगे, ज्योत्सना बाविस्कर यांच्या हस्ते कविता राम यांनी स्वीकारले. या नोंदणी बद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
समर्पण फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम करता यावे यासाठी या संस्थेची नोंदणी केली असल्याचे मत या फाऊंडेशनच्या संस्थापक/अध्यक्षा सुप्रसिध्द पाश्र्वगायिका कविता राम यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण वन विभागातील भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरोधात 5 ऑक्टोबर ला आमरण उपोषण*

पाटण/प्रतिनिधी         पाटण वन क्षेत्रपाल (प्रा.) कार्यालयामध्ये चाललेला भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि दडपशाहीच्या विरोधात  विदय...