शुक्रवार, १२ जून, २०२०

LIC ; एकदाच भरा प्रीमियम आयुष्यभर मिळवा पेन्शन

दिल्ली :

आता तुम्हाला भविष्याची काळजी करत कुथायची गरज नाही. कारण भारतीय जीवन विमा महामंडळाची एक आर्थिक योजना तुमच्या चिंता मिटवण्यासाठी आहे. एलआयसी जीवन शांती योजना असे या योजनेचे नाव असून या पोलीसीमध्ये आर्थिक गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर स्वतःच्या मासिक पेन्शनची व्यवस्था करू शकता. याद्वारे, एखादी व्यक्ती निवृत्तीनंतरचा खर्च सहजपणे पूर्ण करू शकते. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे.

या एलआयसी जीवन शांती योजनेत तुम्ही निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत.

  • इमीडिएट अ‍ॅन्युइटी :- यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन मिळते.
  • डिफर्ड अ‍ॅन्युइटी :- यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर 5,10,15 किंवा 20 वर्षानंतर पेन्शनची सुविधा दिली जाते.

तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन कुठल्याही प्रकारे ही पॉलिसी खरेदी करू शकता.

ऑनलाईन खरेदी करताना एलआयसीची www.licindia.in ही वेबसाईट वापरावी. किंवा आपल्या विमा एजंटशी संपर्क साधावा. जीवन शांती योजनेत किमान 30 वर्षे ते जास्तीत जास्त 85 वर्षे वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. पॉलिसीवर 1.5 लाख रुपयांनी गुंतवणूक करता येते.

या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

हे आहेत या पॉलिसीचे फायदे :-

  • एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उत्पन्नाची हमी.
  • तुम्हाला आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार नऊ पद्धतीचे वेगवेगळे अ‍ॅन्युइटी पर्याय निवडू शकता.
  • पॉलिसीच्या सुरूवातीपासूनच अ‍ॅन्युइटी दरांची हमी दिली जाते.
  • ग्राहक त्वरित पेन्शन सुरू करण्यासाठी इमीडिएट अ‍ॅन्युइटी किंवा नंतर सुरू करण्यासाठी डिफर्ड अ‍ॅन्युइटीची निवड करू शकतात.
  • या पॉलिसीस स्वतःच्या जीवनासाठी किंवा पालक, मुले, नातू, नवरा/बायको किंवा भाऊ/बहीण यांच्याबरोबर एकत्रित जीवनासाठी देखील घेतले जाऊ शकते.
  • या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. परंतु पॉलिसीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कर्ज सुविधा तुम्हाला मिळेल.
  • जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या 'नियम व अटी' विषयी समाधानी नसेल, तर पॉलिसी १५ दिवसांच्या आत निगमकडे परत करता येऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...