बुधवार, १७ जून, २०२०

पवारवाडीतील शिवस्वराज्य प्रतिष्ठानकडून कोकणवासियांना मदत

पवारवाडीतील शिवस्वराज्य प्रतिष्ठानकडून कोकणवासियांना मदत

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील पवारवाडी (कुठरे) येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान पवारवाडी यांच्यावतीने नुकत्याच कोकणात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटूंबियांना मदतीचा हात दिला आहे. सुमारे 70 कुटूंबियांना ज्वारी, तांदूळ, गहू, मीठ, तेल, व इतर गृहोपयोगी जीवनावश्यक वस्तू असलेली कीट देण्यात आली आहेत. एक टेम्पो भरुन सदर साहित्य कोकणात वाटप केले आहे. काही दिवसापूर्वी ‘निसर्ग’ या वादळाने कोकणमधील अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. अनेक कुटूंबे यामध्ये उध्वस्त झाली आहेत. अशा कुटूंबाना मदत पोहोचवणे गरजेचे होते. पवारवाडीतील संवेदनशील असलेल्या तरुणांनी फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने कोकणात मदत करुन आपल्या सामजिक जाणिवेच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे.
राहूल लोहार, सुनील लोहार, दत्तप्रसाद कदम, सुरज कदम, संदीप लोहार, दीपक लोहार, संजय पवार, प्रतिक पवार, अनिकेत शेजवळ, अक्षय कदम, अभिजित कदम, वसंत मुंढेकर, संदीप देसाई आदी तरुणांनी याकामी विशेष मेहनत घेतली आहे.
यापूर्वी शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने  न्यू इंग्लिश स्कूल कुठरे येथील सुमारे 40 विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी एकदम भरुन विद्याथ्र्यांची अडचण दूर केली होती. तसेच जि.प.प्राथमिक शाळा पवारवाडी ला संगणक दिला आहे. तसेच वेळोवेळी शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप, स्कूल बॅग इ. देवून शैक्षणिक कार्याला हातभार लावला आहे.
शिवस्वराज्य प्रतिष्ठान पवारवाडी यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...