'काव्य स्पर्धा 2020' या स्पर्धेत प्रा. सुरेश यादव यांना द्वितीय क्रमांक
: सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सर्वच जण घरी असल्याने काव्यरसिकांना काव्यलेखनास प्रोत्साहन व नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी तर्फे कोरोना काळातील ऑनलाईन 'काव्य स्पर्धा 2020' या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील ज्युनिअर विभागातील प्रा. सुरेश यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुभाष शेळके, उपप्राचार्य एम. व्हि. पाटील तसेच ज्युनियर व सिनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. प्रथम क्रमांक प्रा. सुवर्णा महादेव कदम चिंचणी (तासगाव) व तृतीय क्रमांक प्रा सुरेश रामचंद्र पाटील तासगाव( सांगली)यांनी पटकावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा