मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आणि औरंगाबाद मनपाच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्या पुढे ढकलण्याची मागणी विविध स्तरातून केली जातेय.. या निवडणुका पुढे ढकलणार की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. याबाबत निवडणूक आयोगाशी सरकार चर्चा करणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत निवडणूक प्रचार योग्य नाही. म्हणून सरकार निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे.यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असं असलं तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा