शुक्रवार, १३ मार्च, २०२०

बनपुरी :- नाईकबा यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात कलम 36 लागू

पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री. नाईकबाबा यात्रेच्या निमित्ताने मिरवणुकांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढवी किंवा काढु नये.
                                        AD
मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी, तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा.पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना 25 मार्च ते 7 एप्रिल  या कालावधीत त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून  सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...