मुंबई प्रतिनिधी :-
कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शाळांना 31 मार्च पर्य़ंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढील सूचना मिळेपर्य़ंत सर्व शाळा बंद राहतील, असे परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्यातील सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्यातरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या आहेत म्हणून बाहेर फिरू नये. असे आवाहन आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केले आहे. दरम्यान राज्यातील कोरोना व्हारसच्या रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. नागपूरमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आल्याने नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 4 झाली आहे. पुण्यातील 10 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा