निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन भाजप या ४० प्रभागांतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचवेळी भाजपचे या प्रभागातील कार्यकर्ते नाराज होणार आहेत. गणेश नाईकांबरोबर राष्ट्रवादीचे मोठय़ा प्रमाणात खच्चीकरण झालेले आहे. पन्नास प्रभागात राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या २० ते २५ प्रभागांतच राष्ट्रवादी उमेदवारी घेणार आहे. काँग्रेसची उमेदवारी घ्यायला कार्यकर्ते असणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य बंडखोरीची महाविकास आघाडीला भीती आहे. याच वेळी नवी मुंबईतील भाजपा एकसंध नाही.
नाईकांच्या पालिकेतील सत्ता उलथून लावण्याचे म्हात्रे यांचे गेली अनेक वर्षांचे स्वप्न आहे. ते या वेळच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण होणार होते, पण याचवेळी नाईकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने म्हात्रे यांची पंचाईत झाली आहे. आता भाजपची राज्यव्यापी परिषद नवी मुंबईत होत आहे. त्यामागे वातावरण निर्मिती हे कारण असून महाविकास आघाडीला शह देण्याचा भाजपाचा पूर्ण प्रयत्न आहे. किमान या निवडणुकीसाठी नाईक- म्हात्रे यांचे मनोमीलन भाजपचे नेते घडवणार आहेत. तुमची भांडणे तूर्त बाजूला ठेवून पक्षाला विजयी करा, असा संदेश या दोन्ही नेत्यांना देण्यात आलेले आहेत. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात पूर्वीच्या सहा नगरसेवकांनी आतापासूनच फलकबाजी सुरू केली आहे. यात एक गट जुन्या भाजपचा निष्ठावंत गट असून त्यांनाही उमेदवारीची आस आहे. त्यामुळे या पक्षालाही बंडखोरीची लागण होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा