गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न..

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी पाटण हेळगाव, 18 सप्टेंबर 2025: प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळगाव येथे आज "स्वास्थ नारी -सशक्त परिवार" अभियान अंतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले आरोग्य तपासून घेतले. या शिबिरात महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसह, रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, गर्भवती महिलांसाठी नियमित तपासणी (एएनसी तपासणी) बालकांसाठी लसीकरण सुविधा महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण संबंधित माहिती आणि समुपदेशन करण्यात आले. तसेच महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करून विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली असून, महिलांचे आरोग्य सशक्त बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव साहेब, डॉ. पाटील मॅडम, तालुका विस्तार अधिकारी श्री. माने, श्री. कदम, श्री. निबांळकर, श्री. मोहिते रावसाहेब तसेच लॅब टेक्निशियन, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, कर्मचारी उपस्थित होते

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

*राजाराम डाकवे (तात्या) यांचे तृतीय पुण्यस्मरण मंगळवारी*

*राजाराम डाकवे (तात्या) यांचे तृतीय पुण्यस्मरण मंगळवारी*
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.9 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रतिमा पुजन, पुष्पवृष्टी, मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर, महाप्रसाद, तर रात्री 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत ह.भ.प.जयश्रीताई महाराज धायटी यांचे सुश्राव्य कीर्तन इ.कार्यक्रमांचे चे आयोजन मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी केले आहे.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
तृतीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, संदीप डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आदोलन

*जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी बांधवांचे थकीत असणारे आणि नेहमी उशिरा होणारे वेतन वेळेवर होण्यासाठी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा मार्फत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी एक दिवसाची किरकोळ रजा टाकून जिल्हा परिषद सातारा समोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी साहेब निवेदन दिले काल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, मा.जिल्हाधिकारी,सातारा, मा पोलिस अधीक्षक सातारा, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून पगार थकल्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाला ऑनलाईन रिपोर्टीगचे काम बंद केले आहे. महिना अखेरपर्यंत थकीत पगार जमा न झाल्यास २ सप्टेंबरपासून काम बंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
कराड तालुका आरोग्य अधिकारी साहेब व सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देताना आरोग्य कर्मचारी. याबाबत राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कराड तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र माळी साहेब निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप साळुंखे, भुंजगराव पाटील, शरद काबळे, अरविंद काळे आरोग्य सहायक तसेच शेखर पन्हाळे, रोहित भोकरे पंकज यादव, किरण पाटील, स्वप्नील सुतार, रविंद्र सुतार, दत्तात्रय गायकवाड, हेमंत कुसनाके, विनायक आरेकर आदी उपस्थित होते.

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

तळमावले - सरकारी पाहुणचार घेणार्‍या लाडक्या बहिणी आहेत 'आरोग्य सेविका'

शासकीय सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी पाहुणचार घेणार्‍या त्या लाडक्या बहिणी आरोग्य विभागातील असल्याचे समोर आले आहे. विभागाकडून याची शहानिशा करण्यात येत आहे.


लवकरच या लाडक्या बहिणींना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यभरात जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या 1 हजार 183 महिला कर्मचार्‍यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील अश्विनी कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुसूंबी (ता. जावली) येथे आरोग्य सेविका, संध्या कांबळे व तनुजा बाळू झिमल या दोघी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी (ता. माण) येथे आरोग्य सेविका, सुप्रिया गुरव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे आरोग्य सेविका, प्रियांका गार्डी तळमावले ता. पाटण येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. तर अंकिता लाडी, शुभांगी रासकर, प्रतिभा विधाते या पूर्वी आरोग्य सेविका म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. मात्र, आता त्या आरोग्य विभागात नोकरीस नाहीत तरीही त्यांची शहनिशा आरोग्य विभागमाार्फत करण्यात येत असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.

सर्वच आरोग्य सेविकांच्या पडताळणीचे काम आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर घेण्यात आले आहे. यामध्ये काही आरोग्य सेविका 11 महिन्यांच्या करारावर काम करत असून त्या बंधपत्रित आहेत. मात्र, त्यापैकी काही आरोग्य सेविका कायमस्वरूपी असतील तर त्यांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे हे चुकीचे आहे. आठ महिलांची नावे निष्पन्न झाली असून त्याची पडताळणी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस; महिनाभरात ४० घरे पडली.

ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस; महिनाभरात ४० घरे पडली.


गेल्या महिनाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील विविध गावांतील ४० घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली असून.याबाबत महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत असले, तरी जुन्या घरांच्या पडझडीचा आकडा वाढत चालल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांत भीतीचे वातावरण आहे.

गेल्या महिनाभरात ढेबेवाडी, कुठरे , वाझोली, कसणी, भरेवाडी, तेटमेवाडी, लोटळेवाडी, जोशीवाडी, महिंद, पाळशी, मंद्रुळकोळे खुर्द, बनपुरी, असवलेवाडी आणि तळमावले विभागातील मानेगाव, कुंभारगाव, शेंडेवाडी, खळे, काढणे, बागलवाडी, शिद्रुकवाडी आदी गावांतील ३१ घरांची पडझड झाली होती.

आणखी नऊ घरांच्या भिंतीची पडझड झाल्याचे आज महसूल विभागाकडून सांगण्यात आले. सणबूर येथील दोन, जिंतीतील तीन, मोडकवाडीतील एक, लोटळेवाडीतील एक, गुढ्यातील एक आणि धामणीतील एका घराची पडझड झाल्याचे सांगण्यात आले.

मंडल अधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विशाल पाटील, अक्षय लोहार, बाळासाहेब गायकवाड, स्नेहल थोरात, पल्लवी बोंडे आदींनी नुकसानीचा पंचनामा केला.

कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार

कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार!


पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून, चोरट्यांनी बुधवारी (दि. 20) रात्री आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.याबाबत दिनकर पवार यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, पवारवाडी-कुठरे येथील दिनकर पवार यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून, चोरटे घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून, चोरट्यांनी सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, सोनसाखळी, बांगड्या, अंगठी, बुगड्या, मणी आणि रोख रक्कम, असा सात लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. डॉ. दाईगडे अधिक तपास करत आहेत.

या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

'कराड दक्षिण'च्या मतदार यादीतून 'ती' नावे वगळणार; प्रांताधिकारीकापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदानाचा दावा फेटाळला.

'कराड दक्षिण'च्या मतदार यादीतून 'ती' नावे वगळणार; प्रांताधिकारी

कापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदानाचा दावा फेटाळला.


राड : विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील कापील येथे मतदान केलेल्या 'त्या' ९ मतदारांची तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी झाली असून, ते त्या ठिकाणी राहत नसल्याचा पंचनामा आहे.

यावर सुनावणी घेऊन त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. कापील व गोळेश्वरमध्ये बोगस मतदान झाल्याचा माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांचा दावा म्हेत्रे यांनी फेटाळला आहे. 

तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

कापीलमध्ये बोगस मतदान झाल्याचे पुरावेही गणेश पवारांनी पत्रकारांना दिले आहेत. त्यात एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डाच्या पुराव्यावर कापीलला मतदान केले. काही मतदारांची नावे कापील व गोळेश्वर अशा दोन्ही ठिकाणच्या मतदारयादीमध्ये आढळली आहेत. शिवाय गोळेश्वरमध्ये ७५ बोगस मतदारांची नावे आढळल्याचा गणेश पवारांचा दावा आहे.

त्यावर प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, की मतदार नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन असते. संबंधित व्यक्तींनी मतदारनोंदणी करताना कोणती कागदपत्रे दिली, याची माहिती तक्रारींच्या अनुषंगाने घेतली जाईल. ज्यांनी तक्रार केली, त्यांना या प्रकरणात फौजदारी कारवाई व्हावे असे वाटत असल्यास त्यांनी पुराव्यासह पोलिसांत तक्रार द्यावी.

दरम्यान, कापीलमध्ये झालेले मतदान बोगस आहे का, गोळेश्वरमध्ये आधारवर पत्ता नसणारे, दुसऱ्याच्या नावाचे वीज देयक पुरावा म्हणून दिलेल्यांची मतदार नोंदणी कशी झाली, कापील व गोळेश्वर दोन्ही गावांच्या मतदारयादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव कसे, कोल्हापूरच्या आधार कार्डाच्या पत्त्यावर येथे मतदारनोंदणी कशी, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या तरतुदींआधारे उत्तरे दिली. कापील, गोळेश्वरमधील ज्या मतदारांच्या तक्रारीची चौकशी करून गुन्हे दाखल करणार का, यावर त्यांनी त्यासाठी वेगळे प्राधिकरण असल्याचे सांगितले.

कापील व गोळेश्वर येथील त्या मतदारांविरोधात काय कारवाई होणार, मतनोंदणी करताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) चुका झाल्या का, मतदारयादी सदोष आहे का, या प्रश्नांवर प्रांताधिकाऱ्यांनी कोठेही चूक नसल्याचे ठामपणे सांगितले. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी होऊन सुनावणीसाठी तक्रारदार व संबंधितांना बोलावून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...