शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

कर्मवीरांना अभिवादन: अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रमपोस्टकार्डावर उतरवले 133 वेळा कर्मवीर

कर्मवीरांना अभिवादन: अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम
पोस्टकार्डावर उतरवले 133 वेळा कर्मवीर

तळमावले/वार्ताहर
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असा मूलमंत्र देत संपूर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती साजरी होत आहे.
133 व्या जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर, हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार, पत्रकार, अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी कर्मवीरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले आहे.
भाऊराव पाटील (आण्णा) यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी दिली आहे. ‘कर्मवीर’ हे शब्द डाॅ.संदीप डाकवे यांनी एका पोस्टकार्डावर 133 वेळा सुंदर अक्षरात लिहून कर्मवीरांना अभिवादन केले आहे. तसेच पत्राच्या वरच्या डाव्या बाजूला 22.09.2020 ही तारीख तर दोन्ही बाजूला ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, हे वाक्य लिहले आहे. पत्राच्या शेवटी पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे लिहले आहे. पाठीमागील बाजूला ‘रयत’ ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या शब्दात रयत शिक्षण संस्थेचे बोध चिन्ह असलेले वडाचे चित्र मोठया कौशल्यपूर्वक रेखाटले आहे.
पोस्टकार्डाच्या काही सेंटीमीटरच्या आकारात 133 वेळा कर्मवीर लिहून अभिवादन करणारे बहुधा ते राज्यातील एकमेव असतील. येत्या 22 सप्टेंबरला पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांची 133 वी जयंती साजरी होत आहे. त्या अनुषंगाने आपणही त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करावे या भावनेतून हा उपक्रम राबवला असल्याचे अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.

 या अनोख्या उपक्रमासाठी कलाशिक्षक जयंत कदम, बाळासाहेब कचरे, भरत कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यापूर्वी अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘कर्मवीर’, ‘रयत’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘आण्णा’ अशा शब्दांमध्ये कर्मवीर आण्णांची आकर्षक आणि प्रमाणबध्द रेखाचित्रे चितारली आहेत. तसेच रांगोळी, पेंटींग यामधून देखील कर्मवीरांची चित्रे रेखाटत त्यांना अभिवादन केले आहे.

सातारा ; डाक विभागाद्वारे आता इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग ‍सुविधा उपलब्ध

सातारा ; डाक विभागाद्वारे आता इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग ‍सुविधा उपलब्ध 
सातारा, दि. 18 : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे व सोशल डीस्टसींगमुळे बचत व्यवहार करणे जिकीरीचे काम होऊन बसले आहे. यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगची सेवा उपलब्ध करुन दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, सातारा विभाग  यांनी  केले आहे.
 डाक विभागाच्या सर्व ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करण्यासाठी घेता येणार आहे.  इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगद्वारे  ग्राहकांना आपल्या पोस्ट ऑफीस सेव्हींग खात्याद्वारे इतर खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करणे तसेच आरडी (आवर्ती ठेव), पीपीएफ  इत्यादी खात्यांमध्ये पैसे भरणे याबरोबरच आवर्ती ठेव खाते उघडणे, फिक्स डीपॉझिट करणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या गावात राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूका घेण्याबाबत चाचपणी

मुंबई ; दि.18 राज्यातील कोरोना सद्यस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या विचारार्थ आहे.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे , जेथे मतदान घेणे शक्य आहे , याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने दि.14 सप्टेंबर रोजी अहमदनगर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,नाशिक,जळगाव,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,औरंगाबाद,नांदेड,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलडाणा, नागपूर,वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत निवडणुका घेणे बाबतची माहिती मागविली आहे.

जिल्ह्यातील दि.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे,जेथे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा , जेणेकरुन आयोगाला निवडणूकीबाबत निर्णय घेणे शक्य होईल असे राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी होईल - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि १८ : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेतील  सहभागाबाबत आज मंत्री ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, सर्व जिल्ह्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी ॲड. ठाकूर यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी अंगणवाडी ताईचा संपर्क असतो. त्यामुळे तुमच्या सक्रीय सहभागाने, सहकार्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे घराघरात पोहोचेल. याआधी प्रत्येक उपक्रमात आपण भरीव कामगिरी केली आहे, आताही कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे.

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

सातारा ;जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु

कोरोना अपडेट

सातारा दि.18 :  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 962 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  24 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 115 ,  आघारकर - 55, एन सी सी एस -60 , कृष्णा 111, खाजगी - 164,  अँटी जन टेस्ट ( RAT) 457असे सर्व मिळून  962 जण बाधित आहेत

सविस्तर माहिती 
जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.19 :  जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 962 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा* तालुक्यातील सातारा 23, सातारा शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2,  शनिवार पेठ 5, रविवार पेठ 5, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपूरा पेठ 2,  मल्हारपेठ 3, बसाप्पा पेठ 4, केसरकर पेठ 4, माची पेठ 2, चिमणपुरा पेठ 1, प्रतापगंज पेठ 4, करंजे पेठ 3, सदरबझार 9, श्रीधर कॉलनी 1, एसटी कॉलनी 1, कांगा कॉलनी 1,  केसकर कॉलनी 1, अंजली कॉलनी 4, कर्मवीर पाटील कॉलनी 1, मेघदूत कॉलनी 1, शिवसंपदा कॉलनी 2, स्वरुप कॉलनी 1, श्रीनाथ कॉलनी 1, गुलमोहोर कॉलनी  2,  शाहूपूरी 8, शाहूनगर 6,  गोडोली 6, रामाचा गोट 3, दौलतनगर 6, भूविकास बँकेच्या पाठीमागे 2, संगमनगर 5,  संगममाहूली 3, संभाजीनगर 2, तामजाईनगर 2, मोळाचा ओढा 2, जूनी एमआयडीसी 2, आदर्शनगर को. ऑप. सोसायटी 1, गडकर आळी 4, विहार कॉलनी करंजे तर्फ 3, आझादनगर 1, चैतन्य हॉस्पीटलजवळ 1,  जयमल्हार हौ. सोसा. 1, अंबेदरीरोड 1, सुयेागनगर 3, लक्ष्मीनगर 1, राधिका रोड 3, जिल्हा परिषद 1, लावंड हॉस्पीटलजवळ 2, कोटेश्वर मंदीर 1, गोविंद आर्केड 4, शिवमनगर 1, देवी चौक 1, विलासपूर 2, विकासनगर 3, कृष्णानगर 25, सत्यमनगर 3, पोलीस लाईन 1, करंजे 1, पुष्कर मंगल कार्यालयाजवळ विसावा नाका 1, कामाठीपुरा 1, आकाशवाणी केंद्र 1, सैदापूर 4, नामदेववाडी झोपडपट्टी 1, पिलेश्वरीनगर 1, गेंडामाळ 1, भोसले मळा 1, गोळीबार मैदान 2, करंजे नाका 1, खेड 4, नागठाणे 1, अतित 4,  बोरखळ 1, शिवथर 3, कोपर्डे 2, चंचळी 1, कोंडवे 3,  कोडोली 3, चंदननगर 2,  निगडी 2, वडूथ् 5, जाधववाडी 1, देगाव 4, फत्यापूर 1, डांगरवाडी 1, अंगापूर वंदन 3, चिंचणेर निंब 2, भूडकेवाडी 1, पाडळी 1, सोनगाव तर्फ 1, क्षेत्र माहूली 2, आरळे 5, लिंब 4, काळगाव 1, वनवासवाडी 3,  पाटखळ 13, अपशिंगे 1, भाटमरळी 1, शेंद्रे 4, निसराळे 3, निगडी वंदन 1, समाधीचा माळ बु. 1,  काशीळ 4, तासगाव 1, आमनेवाडी 1,   जांभळेघर रोहाट 1, नंदगाव 1, वेणेगाव 1, धावडशी 1, निगडी 1, डबेवाडी 1, बोरगाव 5,जांब बु. 1, खावली 1, सोनगाव 1, आरफळ 1, महागाव 2, वासोळे 1,   गोवे 2, कुडाळ 1, वनगळ 1, साळवण 8, न्हाळेवाडी 1, अपशिंगे 11, त्रिपूटी 1, 

*कराड* तालुक्यातील कराड 9, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  शुक्रवार पेठ 8, शनिवार पेठ 3, कोयना वसाहत 3, कृष्णा मेडीकल कॉलेज 5, विद्यानगर 3, सैदापूर 5, शिवाजी हौ.सोसायटी 2, शारदा क्लिनीक 4,  कार्वेनाका 3, मुजावर कॉलनी 1, शिवाजी स्टेडीयमजवळ 2, शिक्षक कॉलनी 1, रुक्मीणीपार्क 2, पांडूरंग पार्क 1, मलकापूर 13, आगाशिवनगर 6, ओगलेवाडी 2, घोणशी 2, धोंडेवाडी 1, नंदगाव 1, आणे 1, रेठरे बु. 5, रेठरे हवेली 2,  बेलवडे हवेली 1, बेलवडी 2,  जिंती 5, वडगाव 4, वहागाव 10, विजयनगर 1, रुक्मीणीनगर 1, बनवडी 3, चिखली 2,  गोवारे 1, ओंड 1, साळशिरंबे 1, इंदोली 2, येणके 1, खंबाले 1, अभयाचीवाडी 1, भावंडवाडी 1,  तासवडे 1,  जुळेवाडी 1, पार्ले 4, निसरे 5, दुशेरे 1, पोतले 1, ओंडशी 1, उब्रंज 9, सास्तुरंबे 1, कालगाव 2, गोटे 2, काले 7, कुसूर 3, कोपर्डे 1,  मसूर 4, गोळेश्वर 1, शिरगाव 1, शिवदे 4, शहापूर 1, शिरवडे 2, शेरेस्टेशन 1, शेणोली 1,  शिरटे 3, शेळगाव 1, येळगाव 2, येरवाळे 4, उंडाळे 3, वाघेरी 1, कासारशिरंबे 1, गोळेश्वर 4, नडशी 1, पाडळी 2, किवळ 2, कोळेवाडी 1, वारुंजी 1, रेठरे हरणाक्ष 1, विरमाडे 1, तांबवे 5, हजारमाची 1, किणीवाठार 2, करवडी 1, चव्हाणवाडी 1, 

*फलटण* तालुक्यातील फलटण 4,  फलटण शहरातील मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,   रविवार पेठ 3, नालबंद रेसीडन्स 1, धनगरवाडा 4, दत्तनगर 1, संजीवराजेनगर 1,  विद्यानगर 1, घाडगेमळा 1, स्वामी विवेकानंदनगर 3, कसबापेठ 1,  रिंगरोड 1, उमाजी  नाईक चौक 2,  सोमनाथ आळी 1, साठेफाटा 1, गुणवरे 1, लक्ष्मीनगर 4, कुरवली 3, जाधववाडी 5, ताथवडे 3, निरगुडी 1, तांदुळवाडी 1, तरडगाव 1, पाडेगाव 3,  कोळकी 8, मलठण 3, कुंटे 3,  राजूरी 1, ठाकुर्की 1, साखरवाडी 2, फडतरवाडी 10, सस्तेवाडी 1, फरांदवाडी 2, निंभोंरे 1, प्रिंप्रद 1, राजाळे 1, नाईकडोंबवाडी 1, मुंजवडी 1, बरड 1, निंबळक 1, मिरेवाडी 1, कोरहाळे 2, आसू 1,

*वाई* तालुक्यातील वाई 5,  वाई शहरातील रविवार पेठ 4, हनमाननगर 1, गणपती आळी 1, गंगापूरी 5, धर्मपूरी 1, यशवंतनगर 2, महेश कॉलनी 1, विराटनगर 6, वाठार फाटा 1, फुलेनगर 1, उत्कर्षनगर 1,  ब्राम्हणशाही 2, 
पाचवड 1, भूईज 1, धोम 1,  सिध्दनाथवाडी 2, कोंढावळे 1, व्याहळी 1, नवेचीवाडी 2, ओझर्डे 1, बावधन 1,  शेंदूरजणे 2, बेलमाची 1, कळंबे 2, आनवडी 1, बोपेगाव 1, केंजळ 1, गुळुंब 5, अंबेपुरी 3, वैगाव 9, चिखली 1, मळतपूर 3, खडकी 1,  मेणवली 2, निकवाडी 2 जांब 2, कुसगाव 2, पसरणी 1, भोगाव 1, नंदगाव 1,

*पाटण*  तालुक्यातील पाटण 3,   मठाणेवाडी 1, केराळ 1, घारेवाडी 1, तळमावले 1,वारेगाव 1, बटेवाडी पाथवडे 1, गुजरवाडी 2, भोसेगाव 1, माजगाव 1, ढेबेवाडी 1, धायटी 1, कुंभारगाव 1, मुद्रुळ 1, 

*खंडाळा*  तालुक्यातील  केसुर्डी 3,  भोळी 1, शिरवळ 7, लोणी 2, नायगाव 1, लोणंद 9, भादे 1, म्हावशी 1,  बावडा 2, सुखेड 1, 

 *खटाव* तालुक्यातील  खटाव 1, सुर्याचीवाडी 1, विसापूर 6, गोरेगाव वांगी 2, बुध 2, बनपुरी 1, गारवडी 2, खातगुण 1, पुसेगाव 4, निढळ 1, वडूज 7, गुरसाळे 1, भोसरे 1, पुसेसावळी 1, औंध 1, खरशिंगे 1, मांडवे 1, पवारवाडी 1, कांकत्रे 1, पांढरवाडी 1, निमसोड 1,  डिस्कळ 1, काळेवाडी 16,  मायणी 1, 

*माण*  तालुक्यातील   तोंडले 1,  दहिवडी 1, परखंदी 1, म्हसवड 1, दिवड 1, मानकरवाडी 1, रांजणी 1, गोंदवले बु. 3,  पिंपरी 1, 
  
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 10,  रेवडी 1, देऊर 1, जरेवाडी 1, पिपोंडे खुर्द 1, सोनके 5, वाघोली 1, तडवळे 2, दहिगाव फाटा 1, पाडळी 1, भिवडी 1, जांभ 1, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1, राऊतवाडी 3,  भोसे 1, रणदुल्लाबाद 1, तारगाव 3, दहिगाव 3, पिंपोड बु. 1, अनपटवाडी 1, शिरढोण 1,  आंबवडे 1, भाकरवाडी 1,

*जावली* तालुक्यातील  म्हातेखुर्द 3, 

*महाबळेश्वर* तालुक्यातील  
इतर- नडुजी 1,  महाबळेश्वरवाडी 1, साईबाबा मंदीर 1, 
*बाहेरील जिल्ह्यातील*  बहे (वाळवा-सांगली)1, किल्लेमच्छींद्र गड (सांगली)2, इस्लामपूर (वाळवा-सांगली)1, तडमाळे (कडेगाव-सांगली) 1, वेनवडी भोर-पुणे 1, कर्णेवाडी (इंदापूर-पुणे) 1, येडेमच्छींद्र (सांगली) 1, मुंबई 1, 

*21 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या मर्ढे सातारा येथील 52 वषी्रय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय महिला, नागपूर येथील 37 वर्षीय पुरुष,  लिंब ता.सातारा येथील 70 वर्षीय महिला, हरपळवाडी ता. कराड येथील 54 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, उरुळ ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष,  बांबवडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये सुर्यनगरी, बारामती येथील 70 वर्षीय पुरुष,  निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय महिला, ताटवडा ता. फलटण येथील 41 वर्षीय पुरुष,  कोरेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 73 वर्षीय पुरुष, भाटवडे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, निरगुंडी  ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील घोरपडे कॉलनी सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कोरेगाव येथील 36 वर्षीय महिला, कटापूर येथील 90 वर्षीय पुरुष अशा एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*घेतलेले एकूण नमुने --  61658
*एकूण बाधित --  29115
*घरी सोडण्यात आलेले --  19057  
*मृत्यू -- 828
*उपचारार्थ रुग्ण -- 9230


सातारा ; कौटुंबिक हिंसाचारबाबत महिलांत जनजागृतीसाठी ऑनलाइन शिबीर मोहीम राबवणार- अभिनेत्री अश्विनी महांगडे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांचा अनोखा उपक्रम...

कौटुंबिक हिंसाचारबाबत महिलांत जनजागृतीसाठी 
ऑनलाइन  शिबीर मोहीम राबवणार- अभिनेत्री अश्विनी महांगडे  
     रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांचा अनोखा उपक्रम...

प्रतिनिधी | सातारा
सातारा दि.17 ;  कोरोना महामारीने संबंध मानव जातीला हादरवून सोडले आहे. लॉकडाउनच्या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण हे अधिक वाढल्याचे नुकतेच सांगण्यात आले. प्रत्येक महिला ही माता, भगिनी, बायको असते. घर शांत, हसरे राहावे यासाठी महिलांना बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यांच्यातला सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवावा यासाठी घरातील सर्व माणसांनी या स्त्रीला सांभाळून घेतले पाहिले. तिचा सन्मान केला पाहिजे. आता कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने ऑनलाइन जनजागृती शिबीर ही  मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे  यांनी दिली.
      रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य हे कायम सेवेचे ठायी तत्पर आहेत. त्यांच्या कामाची पद्धत ही आजच्या युवा पिढीचे लक्ष वेधून घेत आहे. स्वतःची ओळख करून देणे हा या प्रतिष्ठानचा उद्देश आहे. 
       या आयोजित  शिबिरात कौटुंबिक हिंसाचारावरील संरक्षण कायदा, मासिक पाळी की मानसिक पाळी?, बचत गटांचे उत्पादन आणि त्यांची बाजारपेठ, तसेच महीलांना व्यक्त व्हायला संधी असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. एका वेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न हे प्रतिष्ठान करत आहे. 
     अनेक बचत गटांनाही कल्पना आवडलेली आहे. शहर आणि ग्रामीण भाग यांचा सहभाग यामध्ये असणार आहे. काळाबरोबर चालायचे तर होणारे बदल हे आपण आचरणात आणायला हवे आणि या महिलांनां आपल्यासोबत घेऊन जायला हवे असे मत रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केले.
   लवकरच हे ऑनलाइन जनजागृती शिबीर घेतले जाणार असून त्याची माहिती सोशियल मीडियाच्या माध्यमांद्वारे कळवण्यात येणार आहे. यामुळे निश्चितच फरक पडणार आहे.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 24 नागरिकांचा मृत्यु

जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 24 नागरिकांचा मृत्यु

सातारा दि.18:  जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  24 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

कराड  तालुक्यातील कराड 2, शहापूर 2, आणे 1, वडगाव 3, गजानन हौसिंग सोसायटी 2, मसूर 4, शेणोली 1, शुक्रवार पेठ 5, सैदापूर 2, कोयना वसाहत 5, साकुर्डी 1, कार्वे 2, आगाशिवनगर 4,  गोटेवाडी 1, कार्वे नाका 3, सुपणे 2, वाटेगाव 2,   रेठरे बु 1,  कुठरे 1, कासेगाव 1, शिरवडे 1,  मलकापूर 4, बुधवार पेठ 2,  विहे 1, ओगलेवाडी 1,  खराडे 2, येणपे 1, शिरते 1,  हिंगोली 1, शेरे 2,  अटके 5, सैदापूर 4, मंगळवार पेठ 4, गोळेश्वर 1, रविवार पेठ 1, वहागाव 4, गुरुवार पेठ 1, निगडी 1, जिंती 1, उंब्रज 8, गोवारे 3, विद्यानगर 3, येरावळे 2, निपाणी 4, टेंभू 2, करवडी 1, हजारमाची 3, बनवडी 2, पार्ले 2, काले 17, गोंदी 2,खराडेवाडी 1, मठाचीवाडी 1, वाठार 1, बहुले 4, सावडे 1,भादे 1, विरावडे 1, शनिवार पेठ 4, जाखणवाडी 1, सोमवार पेठ 1,  शिवदे 1, वडोली निलेश्वर 1, गोळेश्वर 3, येळगाव 1, विंग 1, वाखाण रोड 1, मुंढे 1, बेलवडी हवेली 2, सुपणे 1,दुशेरे 1, वनमासमाची 1,उंडाळे 2, मार्केट यार्ड 1, तळबीड 1,आष्टे 1,कवठे 4,कोळे 4, 

सातारा तालुक्यातील सातारा 13, शुक्रवार पेठ 4, नंदगाव 1, भूषणगड 3, वेणेगाव 1, कारंडवाडी 2, सदरबझार 2, पिंपोडा 1, खोजेवाडी 1, वसंतनगर खेड 2, सर्वोदय कॉलनी 3,  चिंचणी 2, कोंढवे 1, गोडोली 7, संगमनगर 3, शाहुपुरी 7, चिमणपुरा पेठ 1, जुनी एमआयडीसी 1, शाहुनगर 6, पोलिस वसाहत 1, शाहुपुरी करंजे तर्फ 1, कोडोली 3,  मंगळवार पेठ 2, संभाजी नगर 1, लक्ष्मीनगर 1, गेंडामाळ नाका 3, लिंब 1, धर्मवीर संभाजी कॉली 1, तामजाईनगर 3, बोरगाव 1, शनिवार पेठ 5, काशिळ 8, देगाव 3, खेड नाका 1, बामणेवाडी 1, भाटमरळी 1, अक्षय कृपा सोसायटी 1, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, पानमळेवाडी 1, केसरकर पेठ 1, आकाशवाणी झोपडपट्टी 1, विकास नगर 1,  विसावा नाका 1, कारी 7, करंजे 2, सायगाव 2, आरे 2, करंजखोप 1,खेड 3,सोनगाव 1,देशमुख कॉलनी 2,  मोळाचा ओढा 1, वेळे कामठी 1,  देगाव पाटेश्वर 1, सदाशिव पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, गोजेगाव 2, शिवाजीनगर 3, साठेवाडी सोनगाव तर्फ 1, जिहे 1, निगडी 1, कोपर्डे 1, कोटेश्वर मंदिर जवळ 1, गोळीबार मैदान 1, श्रीनाथ कॉलनी 1, वेळे कामठी 1, कुपर कॉलनी 2, विलासपूर 1, अपशिंगे 2, आरफळ 9, नहालेवाडी 3,गोवे 9, मालगाव 5, शिवथर 4, खंडोबाचीवाडी 1, वणंग 1, व्यंकटपूरा 1, चंदननगर 1, भरतगाव 3, बोरगाव 2, यशोदा जेल 11,पाडळी 2,नागठाणे 8, अतित 1, रामकृष्णनगर 2,म्हसवे 4, शेळकेवाडी 1, 

पाटण  तालुक्यातील पाटण 4,  वाघंजीवाडी 1, पाटण कॉलनी 1, साळवे 1, सोनाईचीवाडी 1, मरळी 1, सोनावडे 1,  अंबळे 1, राहुडे 1, सुळेवाडी 1, मारुल हवेली 2, कावरवाडी 1, कुंभारगाव 1, गारवडे 1, मल्हार पेठ 2,निसरे 1, शिंगणवाडी 1,जमदाडवाडी 1, काढणे 1,तळमावले 1, मालदन 1, सकादे 4,

  खंडाळा  तालुक्यातील लोणंद 9, पाडेगाव 1, नायगाव 1, बावडा 3, शिरवळ 5, घाटदरे 1,  सुखेड 2,पिसाळवाडी 1, वाडी 1,म्हावशी 1, भुईज 1, पळशी 1

  खटाव तालुक्यातील खटाव 6, मायणी 8, वडूज 10, लोणी 1, येरळवाडी 2, शेडगेवाडी 1, धोंडेवाडी 1,वडूज 1, पुणवडी 6, तडवळे 3, औंध 3, कणसेवाडी 2, वाकेश्वर 1, गणेशवाडी 1, एकसर 1, विसापूर 5, पुसेगाव 1, खातगुण 2, डिस्कळ 2, वाकळवाडी 1, कलेढोण 1, 

माण  तालुक्यातील  खुटबाव 2, भालवडी 1, म्हसवड 2, दहिवडी 8, बिदाल 1, दालमोडी 1,गोंदवले खु 2, भांडवली 1
  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 20, रहिमतपूर 3, वाठार स्टेशन 2, बोरजाई वाडी 2, अंबवडे 5, चिंचली 2, भाडळे 1, किन्हई 1, नांदवळ 3, दहिगाव 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 9, ताथवडे 1, वाजेगाव 1, फडतरवाडी 2, साखरवाडी 5, ठाकुरकी 3, कोळकी 4, मलठण 6, खटकेवस्ती 1, लक्ष्मीनगर 3, विढणी 2, खुंटे 1, धुळदेव 1, रविवार पेठ 1, गजानन चौक 1, उमाजी नाईक चौक 1, बुधवार पेठ 1, ढवळ 1, विद्यानगर 2, हडको कॉलनी 1, आदर्की 1, कसबा पेठ 2, सुरवडी 1, जाधववाडी 4, मंगळवार पेठ 2, गोळीबार मैदान 1, पद्मावती नगर 1, सोमवार पेठ 2, गिरवी 1, गोखळी 6,खटकेवस्ती 1, पणदरे 1, 

 वाई तालुक्यातील वाई 10, चिंधवली 1, शहाबाग 2, गणपती आळी 5, मिशन हॉस्पिटल 1, सिध्दनाथवाडी 7, फुलेनगर 1, कोचलेवाडी 1, परखंदी 5, मधली आळी 2, रविवार पेठ 5, सोनगिरवाडी 1, गंगापुरी 7, शेंदूरजणे 1, धर्मपुरी 2,यशवंतनगर 1, बावधन 1, ओझर्डे 1, बोपेगाव 1, सोनगिरवाडी 2, मर्ढे 1, गुळुंब 1,किसनवीर नगर 1,विराटनगर 3, पसरणी 1, बोपर्डी 1,

जावली तालुक्यातील जावळी 1,रायगाव 28, मोहाट 1, मेढा 1, जावळी 1, पवारवाडी 1, दापवडी 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3, पाचगणी 9, 

बाहेरील जिल्ह्यातील पलुस जि.सांगली 1, कोल्हापूर 1, भिकवडी खुर्द (सांगली)1,

24 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव येथील 82 वर्षीय पुरुष, कर्वे कराड येथील 70 वर्षीय महिला, गोवे सातारा येथील 56 वर्षीय महिला, गोंदवले बु येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष , वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, माणी ता. खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 85 वषीय परुष, लाखनगर ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार ता. वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुती नगर पोवई बुध ता. खटाव येथील 61 वर्षीय महिला, देगाव सोतारा येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्हार पेठ ,पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी ता. महाबळेंश्वर येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 24 जणांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*घेतलेले एकूण नमुने --  60498
*एकूण बाधित -- 28153  
*घरी सोडण्यात आलेले --- 17777  
*मृत्यू -- 807
*उपचारार्थ रुग्ण -- 9569

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...