राज्य निवडणूक आयोगाने दि.14 सप्टेंबर रोजी अहमदनगर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,नाशिक,जळगाव,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,औरंगाबाद,नांदेड,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलडाणा, नागपूर,वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत निवडणुका घेणे बाबतची माहिती मागविली आहे.
जिल्ह्यातील दि.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे,जेथे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा , जेणेकरुन आयोगाला निवडणूकीबाबत निर्णय घेणे शक्य होईल असे राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा