रविवार, २१ जून, २०२०

जिल्ह्यातील 4 नागरिक कोरोनाबाधितआतापर्यंत 624 जण उपचार घेऊन घरी तर जिल्ह्यात उपचार घेणारे 141

जिल्ह्यातील  4 नागरिक कोरोनाबाधित

आतापर्यंत 624 जण उपचार घेऊन घरी तर जिल्ह्यात उपचार घेणारे 141

सातारा दि. 20: विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये  उपचार घेणाऱ्या 4 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

            कारोनाबाधित रुग्णांमध्ये सातारा शहरातील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील तळबीड येथील 26 वर्षीय पुरुष, चोचेगाव येथील 30 वर्षीय महिला, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

            आतापर्यंत सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 804 इतकी झाली असून, 624 नागरिक त्यातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत  39 नागरिकांचा मृत्यू झाला असून उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या 141 इतकी झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील 4 बाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात  उपचार घेत आहेत, त्यांची बाधित रुग्ण म्हणून त्यांच्या जिल्ह्यात गणना केली आहे.त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येतून ते वजा करण्यात येत आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

शनिवार, २० जून, २०२०

*13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह*

*13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
सातारा दि. 19  :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 यामध्ये पाटण  तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण
 कराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50, 54 व 79  वर्षीय पुरुष, व 1 वर्षीय बालक, 45 वर्षीय महिला,
 जावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला,
 सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष.
 

शुक्रवार, १९ जून, २०२०

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 192.17 मि.मी. पावसाची नोंदगेल्या 24 तासात एकूण सरासरी 20.28 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी  192.17 मि.मी. पावसाची नोंद
गेल्या 24 तासात एकूण सरासरी  20.28 मि.मी. पाऊस
 सातारा, दि. 19 :  जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 192.17 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  20.28  मि.मी. पाऊस झाला आहे.
 जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 29.62 (180.86) मि. मी., जावली- 22.62 (272.26) मि.मी. पाटण-56.91(285.09) मि.मी., कराड- 23.23 (158.62) मि.मी., कोरेगाव- 6.89 (112.00) मि.मी., खटाव-2.31 (122.49) मि.मी., माण- 00 (55.43) मि.मी., फलटण- 0.00 (56.78) मि.मी., खंडाळा- 4.05 (64.30) मि.मी., वाई – 4.51 (159.17) मि.मी., महाबळेश्वर-73.88 (646.83) 
   

साताऱ्यामध्ये पुन्हा 'रोल, कॅमेरा, अॅक्शन'...... !!

साताऱ्यामध्ये पुन्हा 'रोल, कॅमेरा, अॅक्शन'...... !! 
            कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा 'रोल, कॅमेरा, अॅक्शन'साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'टोटल हूबलाक' या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे. 
डोळे दिपवणारं सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाने केलेली मुक्तहस्ताने उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ, शंभरहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईच सौंदर्य यामुळे सातारा हा चित्रपट सृष्टीसाठी पूर्वीपासूनच पोषक वातावरण असलेला जिल्हा. मुंबईमध्ये जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीने भरभरुन दिल्यामुळे निसर्गतःच उपलब्ध आहे. 
                   जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही 'लोकेशन्स' निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत. 
                  जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हूबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले. 
              जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली 'एक खिडकी योजना' ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टीस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
              चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण–वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतुनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
*या नियम व अटींसहीत परवानगी.*

● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे. 
● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई. 
● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर. 
●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई. 
●चित्रीकरण दरम्यान लग्न समारंभ, पुजा, सण, उत्सव, सामुहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तु वापरणे.
●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक. 
●चित्रीकरण दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. - कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

                जिल्ह्याने देखील चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने हिरे दिले. यामध्ये सिनेअभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे तसेच नवोदित कलाकार सागर कारंडे, संतोष साळुंखे आहेत. पटकथा लेखक प्रताप गंगवणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवर देखील याच मातीने दिले. 
            वास्तविक सातारा सांगली आणि कोल्हापूर ही पूर्वीपासून मराठी-हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाचे केंद्र होते. याच ठिकाणी बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण केले जाई. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारी भरपूर लोकेशन्स, ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आहे. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामुळे एकीकडे राज्यांच्या अस्मितांना खतपाणी मिळत गेले. सोबत नव्याने काही प्रश्न उभे राहिले. आजुबाजूच्या लोकेशन्समध्ये अनेक समस्या किंवा म्हणावी तेवढी स्पेस, बघ्यांची गर्दी यामुळे आपसूकच चित्रीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्र हे मुख्य केंद्र बनले. सद्य स्थितीतही कोरोनामुळे मुंबईमधील चित्रीकरण पूर्णतः बंद आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा होत असलेला तोटा लक्षात घेऊन चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा या भागाकडे वळत आहे. 

            चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे.                        
        - तेजपाल वाघ (पटकथाकार) 

              होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही 'टोटल हुबलाक' या मालिकेचे चित्रीकरण आम्ही सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्याखोर्यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!!                                                                      किरण माने (अभिनेते)

                                                          

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी
मुंबई, दि. १८ जून : कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम असल्याने अजून  गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने नागरिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र अद्यापही देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरणास जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येऊन राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.

गुरुवार, १८ जून, २०२०

सातारा ; तब्येती बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विचारणा झाल्यास खरी ती माहिती दयावी पालकमंत्री बाळासहेब पाटील यांचे नागरिकांना आवाहन

तब्येती बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विचारणा झाल्यास खरी ती माहिती दयावी
पालकमंत्री बाळासहेब पाटील यांचे नागरिकांना आवाहन

  सातारा दि. 18 : नागरिकांनी व बाहेरगावावरुन आलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती न लपवता  आपल्याकडे येणाऱ्या  आशा वर्कर, सरपंच, पोलीस पाटील यांना योग्य ती माहिती द्यावी,  असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 
 जगामध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. विशेषत: महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे येथे त्याचा प्रसार जास्त झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक विविध कामासाठी मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात गेले आहेत. या परिस्थितीत घराच्या ओढीने ते आपल्या घरी परतत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये दुर्दैवाने सातारा जिल्ह्यात एकूण 38 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू हा प्रशासनाची इच्छा असतानाही त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्याने या नागरिकांचा त्यांच्या घरी किंवा ते ज्या ठिकाणी विलगीकरणात होते त्या ठिकाणी झाला आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये आलेले नागरिक, ग्रामस्थ यांची माहिती द्यावी. रोगाची काही लक्षणं दिसत असतील तर वेळीच त्याची माहिती द्यावी. वेळीच उपचार झाल्यास या साथीच्या रोगामध्ये पेशंट हा निश्चितच बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता प्रशासनाला आपली माहिती देण्याचे सहकार्य करण्याचे आवाहनही  त्यांनी शेवटी केले. 

पाटण तालुक्यातील सर्वाधिक ७३ टक्के पेरणी पुर्ण.

गतवर्षोच्या तुलनेत खरीप पेरणीच्या कामांना वेग 
पाटण तालुक्यातील सर्वाधिक ७३ टक्के पेरणी पुर्ण.

सातारा दि. 18  जिल्ह्यामध्ये यंदा पेरणीला पुरक पाऊस झाल्याने पेरणी खरिपाच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे गतवर्षी जूनच्या अखेरीस ६ टक्के असलेले पेरणीचे क्षेत्र यंदाच्या वर्षी मात्र जूनच्या मध्यातच ३० टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहे. ते भात ज्वारी भुईमूग सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. जून च्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील पेरणी ची सर्व कामे पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. 
मागील काही दिवसांमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने आपल्या पारंपरिक खरीप पिकांच्या पेरणीची कामं हाती घेतली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत पाटण तालुका अग्रेसर असून येथे सर्वाधिक ७३ टक्के पेरणीची काम पूर्ण झाले आहेत. तर माण तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ०.२५ टक्केच पेरणी झाली आहे. 
यावर्षी कोरोना आणि लाॅकडाऊन अशा दुहेरी संकटांना तोंड देत असताना शासनाने शेती आणि शेतकऱ्यांवर मात्र याचा कोणताही परिणाम होवू दिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच खत आणि मागणी केलेले बियाणं उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे कोरोनाचा कोणताही फटका शेतीसंबंधीत कामांना बसलेला नाही. 
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील भाताच्या ४९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २२ हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. तर ज्वारीच्या पिकाचीही ५० टक्के भागावरील पेरणी झाली आहे. त्यासोबतच सोयाबीन आणि भुईमूग या दोन्ही पिकांची प्रत्येकी ४३ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. 
गतवर्षी जूनचा शेवटचा आठवडा संपला तरी माॅन्सूनचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पेरणीची आणि शेतीशी संबंधित सर्व कामे रखडली होती. जून अखेरीस ही केवळ ६ टक्केच पेरणी पुर्ण झाली होती. यावर्षी मात्र जून अखेर पर्यंत पेरणीशी संबंधित कामे पुर्ण होण्याचा अंदाज आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...