गुरुवार, २५ जुलै, २०२४

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघात ४७ कामांसाठी आणला ४ कोटी ५२ लाख रुपयेचा निधी.

 
 आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघात ४७ कामांसाठी आणला ४ कोटी ५२ लाख रुपयेचा निधी. 

 


 

 कराड : विकास दूत व मिस्टर क्लीन म्हणून देशात लौकिक ठरलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा गेल्या दहा वर्षात चेहरामोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात १८०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी आणला होता. विकासाचा सिलसिला व त्यांची विकासाची दृष्टी अद्यापही तशीच असून, त्यांनी नुकताच मतदारसंघातील ४७ विकासकामांना ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी आणून आपल्या कृतिशील व्यक्तिमत्वाची ओळख आणखी घट्ट केली आहे. या निधीमध्ये रेठरे बुद्रुक या प्रमुख गावासह कृष्णा काठावरील गावांमधील कामांसाठी सव्वा कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडे कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती अंतर्गत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. या समितीने राज्यात ४७ कोटी रुपयांचा निधीस नुकतीच तांत्रिक मंजुरी दिली. यामधून प्रत्येक तालुक्यासाठी १० टक्के निधीप्रमाणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवलेल्या ४७ कामांना ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सुमारे ४२ गावातील मूलभूत सुविधा व शैक्षणिक कार्याला बळकटी मिळणार आहे.

भूकंप पुनर्वसन निधीतून मंजूर झालेली कामे, गावे व कंसात मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे : आकाईचीवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख रुपये), आटके येथील प्रजिमा रस्ता जोडणाऱ्या कोळे पाणंद रस्ता मुरुमीकरण करणे (दहा लाख रुपये), आणे येथे आणे गावठाण ते आणे - येणके पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (आठ लाख रुपये), कापील येथील हनुमान वॉर्डातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कार्वे येथील दोन ठिकाणच्या अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), कालवडे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), काले येथील जुजारवाडी बंधारा ते काले - मालखेड ग्रामीण मार्गापासून रस्ता मुरुमीकरण, खडीकरण व डांबरीकरण या कामासाठी (आठ लाख रुपये)

संजयनगर (काले) येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कासारशिरंबे येथील खंडोबा मंदिर ते वसंत माने यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये), किरपे येथील शिवाजी माने यांच्या घरापासून मारुती देसाई यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कुसुर येथील कुसुर स्टँड ते शेष वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (आठ लाख रुपये), कोडोली येथील दिलीप जगताप यांची वस्ती ते शंकर जगताप यांच्या वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), शेणोली येथील रोहिणी दिलीप पाटील यांच्या घरापासून गाव ओढ्यापर्यंतच्या रस्त्यालगत गटार बांधणीसाठी (चौदा लाख रुपये)

कोळे येथील शेख बोजगर दफनभूमी रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), कोळेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये), खुबी येथील नागनाथ पाणंद रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणेसाठी (सात लाख रुपये), खोडशी येथील हायवेपासून ग्रामपंचायतीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), गवारकरवाडी (येळगाव) येथे सामाजिक सभागृह बांधणे (बारा लाख रुपये), गोटे येथील भादी मदरसा ते नवीन पाणीपुरवठा विहिरीपर्यंतचा पाणंद रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे (सात लाख रुपये), गोटे येथील शंकर पवार यांचे घर ते विनायक थोरात यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), गोटेवाडी येथील महेंद्र आमले ते बाळासाहेब सुपनेकर, आनंदा रानमाळे ते संदीप रानमाळे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (आठ लाख रुपये)

गोळेश्वर येथील शंभू महादेवनगर येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), घारेवाडी येथील जुनी घारेवाडी ते नवीन घारेवाडी रस्ता डांबरीकरण करणे (सात लाख रुपये), घोगाव येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणेसाठी (दहा लाख रुपये), चचेगाव येथील कमानीपासून उत्तम पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), जखिणवाडी येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), जिंती येथील अधिक पाटील यांचे घर ते एकनाथ नांगरे - पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), जुळेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे (दहा लाख रुपये), दुशेरे येथील वडगाव हवेली हद्दीजवळ शिव पाणंद रस्ता शिवाजी मारुती जाधव यांच्या शेतापासून माणिक जगन्नाथ जाधव यांच्या शेतापर्यंतचा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे (दहा लाख रुपये), धोंडेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), नांदलापूर येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), पोतले येथील पाटील मळ्यात एक शाळा खोली बांधण्यासाठी (बारा लाख रुपये)

भुरभूशी येथील पाटील गल्लीतील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), मनव येथील ग्रामपंचायत ते पाण्याच्या विहिरीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), मलकापूर येथील आनंदा पवार यांच्या घरापासून श्री. भस्मे यांच्या कोपऱ्यापर्यंत काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), मलकापूर येथील शास्त्रीनगरमधील हौसाई कन्या शाळेच्या पश्चिम बाजूकडील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे (दहा लाख रुपये), मुनावळे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख रुपये), येणपे येथील तानाजी जाधव यांच्या घरापासून दत्त मंदिर तळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (आठ लाख रुपये),  येरवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक खोली बांधण्यासाठी (बारा लाख रुपये), येळगाव येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), रेठरे खुर्द येथील सतीश नलवडे यांच्या गॅरेजपासून मांड नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरुमीकरण व खडीकरण करणे (सात लाख रुपये), रेठरे बुद्रुक येथील मारुती मंदिर ते विलास पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), वाठार येथील दगडी चाळ ते लक्ष्मी मंदिरपर्यंतच्या २०० मीटर रस्त्याचे  काँक्रिटीकरण करणे (वीस लाख रुपये), विंग येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये), साळशिरंबे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (सात लाख रुपये), सैदापूर येथील एसजीएम कॉलेजच्या पाठीमागील गुरु दत्तनगर मधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (दहा लाख रुपये) आदी कामांचा समावेश आहे.
-----------------------------------
 

सदरचा निधी आणताना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रेठरे बुद्रुक येथील विकासकामासाठी वीस लाख रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. राजकीय हेतूने कोणताही दुजाभाव न करता विकासाची प्रक्रिया राबविण्यात आ. चव्हाण पारंगत आहेत, याची प्रचिती यातून होते. याआधी पृथ्वीराजबाबांनी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधणीसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. हे काम सद्या गतीने सुरू आहे. तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये उपलब्ध केले होते. ते काम पूर्ण होवून बऱ्याच कालावधीसाठी वाहतुकीस बंद असलेला पुल सुरू झाला. विकासाच्या कार्यात आ. पृथ्वीराज चव्हाण कधीच संकुचित विचार ठेवत नाहीत. असा अनुभव त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीतून येतो, हे नक्की.


सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी.

 

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी.

 
 
 
सातारा दि. 24 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

सोमवार, २२ जुलै, २०२४

अतिवृष्टी मध्ये पाटणचे प्रशासन तत्पर, प्रांताधिकारी सुनील गाढे यांची माहिती.

 अतिवृष्टी मध्ये पाटण चे प्रशासन तत्पर...प्रांताधिकारी सुनील गाढे यांची माहिती.


 

पाटण ..पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात सध्या पावसाची संततधार गेल्या 2/3 दिवसापासून सुरू असल्यामुळे अनेक  ठिकाणी नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पुलावरून पानी जातं आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या देखील घटना घडत आहेत. याबाबत पाटण प्रशासन रात्रंदिवस अलर्ट असून  याबाबत  तात्काळ उपाय योजना देखील करण्यात येत आहेत.या सर्व परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील लक्ष ठेऊन असून ते तालुक्यातील अधिकारी याना वेळोवेळीसूचना देखील देत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील   रासाटी शाखे अंतर्गत येणाऱ्या देवघर येथे अतिवृष्टीमुळे एकूण 5 HT विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्यामुळे दुर्गम भागातील एकूण 5 गावे अनुक्रमे गोवारे, तलोशी, वाघणे, नाव, चिरंबे अंधारात गेली  होती. ही बाब स्थानिक पोलीस पोटील व ग्रामस्थ यांनी तहसीलदार पाटण व प्रांताधिकारी पाटण यांचे निदर्शनास आणून दिली . अतिवृष्टी सुरू असल्याने दुर्गम भागात विद्युत पुरवठा सुरू असणे आवश्यक असल्याने यासंदर्भात महसूल प्रशासनाने वीजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या  दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत सूचना दिल्या. त्यास विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ सकारात्मक  प्रतिसाद दिला. वीज वितरण विभागाचे  उप अभियंता श्री कुंभार यांचे मार्गदर्शन  खाली शाखा अभियंता  श्री मंगेश क्षीरसागर ,वायरमन श्री आकाश कुंभार , श्री अमित सपकाळ यांनी  यांनी तात्काळ जीवाची बाजी लाऊन पाऊस सुरू असताना देखील  तलावात पोहत जाऊन विद्युत तारा ओढून विद्युत पुरवठा सुरळीत केला.
त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्याने स्थानिक ग्रामस्थ यांनी समाधान व आनंद  व्यक्त केला  , याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी पाटण यांनी संबंधित वीज वितरण विभागाच्या  अधिकारी व  कर्मचारी वर्गाने दाखविलेल्या कर्तव्यपरायणते बाबत कौतुक केले  आहे.


 " पाटण मधील सर्वच विभागाचे कर्मचारी अतिवृष्टी दरम्यान सज्ज असून कुठेही काही अडचण आली तर त्यास संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी तत्परतेने प्रतिसाद देतात.त्यामुळे पाटण मध्ये अतिवृष्टी दरम्यान कुठलीही अडचण आली तर ती सक्षमपणे हाताळली जाईल असा विश्वास आहे. वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्यानी दाखविलेली तत्परता निश्चितच प्रशंसनीय आहे "
--- सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण.

बुधवार, १७ जुलै, २०२४

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश कराड शहरासाठी पाणीपुरवठा सुरु होणार .

 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश कराड शहरासाठी पाणीपुरवठा सुरु होणार .



- आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनवरील पकडीने प्रशासन अलर्ट मोडवर येऊन तात्काळ हालचालीने यंत्रणा कार्यान्वित
- कराड नगरपालिकेचा जुना जॅकवेल कार्यान्वित करण्यात नगरपालिकेस यश आले असून बुधवारी १७ रोजी रात्री आठ नंतर शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.



 कराड : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर काल तातडीने स्पॉट भेट देऊन कराड नगरपालिका मुख्याधिकारी, MGP चे अधिकारी तसेच हायवेचे अधिकारी अशा सर्वांची संयुक्तिक मिटिंग घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे परिस्थिती समजून घेतल्यानंतर तसेच नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रशासनातील पकड व अभ्यास कराडकरांनी अनुभवला. आ. चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागाची एकत्रित मिटिंग घेतल्याने सुचविलेल्या पर्यायावर तात्काळ निर्णय घेता आले. तसेच जें निर्णय जिल्हाधिकारी पातळीवर घेणे गरजेचे आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी यांना दुसऱ्याच दिवशी कराडला येऊन परिस्थितीची पाहणी करून निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे कराड दौऱ्यावर येऊन त्यांनी परिस्थिती ची पाहणी केली. व त्यांच्या दौऱ्यानंतर ठोस निर्णय कराड नगरपालिका प्रशासनला घेता आले. व त्यांचमुळे आज पाणीपुरवठा केंद्रातील सर्व कामे पूर्ण झाली असून नदीपात्रातून पाणी उपसा सुरू केलेला आहे. त्यामुळे आज संध्याकाळी उशिराने पण कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल आणि उद्यापासून दिवसातून एक वेळेला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

आज पुन्हा एकदा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनवरील पकडीने तसेच त्यांच्या अभ्यासाने कराडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ हालचाली झाल्याने कराडला पाणी यंत्रणा कार्यान्वित झाली त्यामुळे कराडकरांनी या निर्णयाबाबत तसेच पृथ्वीराज बाबांच्या समयसूचकतेबाबत आंनद व समाधान व्यक्त केला आहे.


सोमवार, ८ जुलै, २०२४

सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नेहमी तत्पर राहावे..प्रांताधिकारी सुनील गाढे

सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नेहमी तत्पर राहावे..प्रांताधिकारी सुनील गाढे 
पाटण - पाटण सारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिक हे त्यांचे प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे एका दिवसाचे संपूर्ण शेतीकाम व इतर काम बाजूला ठेऊन खाजगी वाहनाने किंवा एस टी ने तालुक्याच्या मुख्यालयाला येत असतात. त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय कामासाठी सर्वच विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी नेहमीच  तत्पर  राहिले पाहिजे असे प्रतिपादन पाटण चे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्री.अजमुद्दिन मुलाणी यांचे सेवा निवृत्तीनिमित आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात केले आहे. 
पाटण प्रांत कार्यालयातील अजमुद्दीन मुलाणी हे नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.  मूळचे खटाव तालुक्यातील मांडवे गावामधील रहिवासी असलेले श्री. मुलाणी यांनी सुरवातीच्या काळात  महसूल विभागात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामकाज केल्यानंतर पुढील काळात महसूल विभागात त्यांना सामावून घेण्यात आले.सातारा जिल्ह्याच्या विविध भागात सेवा केल्यानंतर सुमारे 18 वर्षाच्या सेवेनंतर महसूल विभागातून ते सेवानिवृत्त झाले आहे. 18 वर्षाच्या सेवेच्या कालावधीतील पाटण मध्ये त्यांनी सुमारे 6 वर्ष प्रांत कार्यालयात कामकाज पाहिले आहे. शांत व संयमी तसेच येणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा कर्मचारी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता.पाटण प्रांत कार्यालयात मध्यंतरी  सुमारे 5 वर्ष नायब तहसीलदार पद रिक्त असताना त्यांनी या पदाची धुरा यशस्वीपणे  सांभाळली. निवडणूक विषयक ,तसेच पोलीस पाटील भरती , कोतवाल भरती आदी संवेदनशिल विषय देखील त्यांनी सक्षमपणे हाताळले असे  पुढे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.
पाटण प्रांत कार्यालयात पोलीस पाटील कोतवाल ,तलाठी तसेच तालुक्याच्या विविध भागातून येणारी जनता त्यांचेकडे हककचा माणूस म्हणून पाहत असे .आपल्या कामाची कैफियत प्रांत अधिकारी यांचे आधी सर्व प्रथम त्यांच्याकडे  मांडली जायची.असे प्रतिपादन तहसीलदार अनंत गुरव  यांनी त्यांचे भाषणा दरम्यान केले.
याप्रसंगी तलाठी संघटनेचे अध्यक्ष  श्री.लुगडे अण्णा, मंडळ अधिकारी पाटण विलास गभाले, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष,पत्रकार यांचे वतीने विद्या म्हासूर्णेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
श्री. मुलाणी यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले की,  प्रशासकीय सेवा संदर्भात  पाटण कडे पाहण्याचा सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले.पाटण हा निसर्गरम्य भाग असून येथील जनता खूप चांगली आहे. काम करणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे ते नेहमीच तोंड भरून कौतुक करतात असा अनुभव आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की पाटण मध्ये जेव्हापासून प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रशासकीय कामे पार पाडताना  सर्वच कर्मचारी यांनी गेले 3 वर्ष  अनुभवले आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रशासकीय कामे पोहचविण्याची त्यांची तळमळ आमच्यासारख्या सर्व सामान्य कर्मचारी याना निश्चितपणे प्रेरणा देत राहते असे देखील त्यांनी पुढे नमूद केले.
या निरोप समारंभ प्रसंगी श्री
 अजमुद्दिन मुलाणी यांचा महसूल प्रशासनातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुलाणी हे सहकुटुंब उपस्थित होते. सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी, पोलीस पाटील ,तलाठी ,कोतवाल, मंडळ अधिकारी ,महसूल कर्मचारी,पत्रकार , राजकीय पक्षाचे प्रतिनिधी , तसेच काही सेवानिवृत्त महसूल कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शनिवार, ६ जुलै, २०२४

पाटण मतदारसंघातील 548 जिल्हा परिषदेच्या 12 हजार 586 विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेला यश मा.यशराज देसाई यांचे हस्ते वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वहयांचे वाटप.

 

पाटण मतदारसंघातील 548 जिल्हा परिषदेच्या 12 हजार 586 विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेला यश

मा.यशराज देसाई यांचे हस्ते वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वहयांचे वाटप.


 

दौलतनगर दि.05:- पाटण तालुका हा दुर्गम डोंगराळ असला तरी या तालुक्याचा  शैक्षणिक दर्जा नेहमीच उंचावलेला पाहवयास मिळतो.पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई ज्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री असताना संपूर्ण राज्यात शैक्षणिक इबीसी सारखी सवलत जाहीर करून सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची दारे खुली करून दिली परिणामी संपूर्ण देशात महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात प्रगतशील राज्य म्हणून नावारूपास आणले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेच नातू आणि राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह वहयांचे  वाटप करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांच्या हस्ते आज वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप करण्यात आले.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळांमधील 12586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागातील व गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक यांचे हस्ते शालेय साहित्यासह 50 हजार वहयांचे  वाटप करण्यात आले. ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतील या उपक्रमाबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे भेटी साठी येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटीसाठी येताना हार,शाल ,नारळ,पुष्पगुच्छ इ. साहित्य न आणता शालेय वहया व वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहन  वेळोवेळा केले होते. तसेच प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून शुभेच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते  त्या हारतुऱ्यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावावी लागत असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या हेतूने वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे  असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी या अगोदरच केले आहे. त्यांचे या आवाहनाला मतदारसंघातील जनतेने  चांगला प्रतिसाद दिला. हाच पायंडा लग्नसमारंभ तसेच इतर सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांना भेट म्हणून मिळणाऱ्या वहया तसेच शालेय साहित्य हे मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून मतदारसंघात वाटप करण्यात येत असते. तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये साजरा झालेल्या ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना हार,शाल ,नारळ,पुष्पगुच्छ इ. साहित्य न आणता  वहितुला करण्याचे आावाहन ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले होते. करण्यात  आलेल्या आवाहनानुसार ना. शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसा दिवशी पदाधिकारी,कार्यकर्ते,  ग्रामपंचायती तसेच विविध संस्थांनी मोठया प्रमाणांत वहीतुला करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  दिल्या होत्या ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांच्या हस्ते आज वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप करण्यात आले.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळांमधील 12586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागातील व गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक यांचे हस्ते वहयांचे वाटप करण्यात आले.

 

शालेय विद्यार्थ्यांना वहया वाटप विद्यार्थ्यांसाठी  प्रेरणादायी-चेअरमन यशराज देसाई.

ना.शंभूराज देसाई यांनी वाढदिवसाला तसेच भेटायला येताना व इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना  हार तुरे न आणता शालेय साहित्य घेऊन येण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार मोठया प्रमाणांत वहया जमा झाल्या होत्या. ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण विधानसभा मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळेमधील 12586 विद्यार्थ्यांना 50 हजार वहयांचे वाटप आज एकाच दिवशी होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून आपण प्रतिवर्षी वहया वाटप करत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना केलेले वहया वाटप हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी याप्रसंगी केले.

बुधवार, ३ जुलै, २०२४

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे,दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.

 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे,दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
            
मुंबई, दि. ३ : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

    त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...