संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
रंगभूमी ‘जगलेले’ अभिनेते...प्रदीप पटवर्धन
बिहार : नितीशकुमार - भाजपा सरकार कोसळले
नवी दिल्ली ; लोकसभेतील गटनेतेपदाच्या लढाईत शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र तर ठाकरे गटाने मागितली वेळ
यावरून लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शिंदे गटाच्या बाराही खासदारांनी वकीलांमार्फत हे निवेदन दिले आहेत. यात १८ पैकी १२ खासदारांनी एकमताने गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केल्याचा दावा केला आहे. शिवसेना खरी कोणती यावरून निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.
ठाकरे गटाने मागितली वेळ
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची काही वेळ मागून घेतला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राज्याला अखेर कारभारी मिळाले 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.
या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.
शिंदे गटातील मंत्री
गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)
भाजपतील मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
कराड जनता सहकारी बँकेच्या संचालक,शासकीय अधिकाऱ्यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल
कराड जनता सहकारी बँक प्रकरण : संचालक, शासकीय अधिकाऱ्यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल
कराड दि.8 कराड जनता सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणात चांगलीच गुरफटत चालली आहे. या बँकेच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकूण 27 जणांचा समावेश आहे.कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज दिल्याबाबत सध्या या बँकेची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यात ज्या ज्या लोकांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यात आले आहे त्या त्या कर्जदारांची ईडी चौकशी करत आहे. हे सुरु असताना बँकेतीलच कर्मचाऱ्यांच्या नावे घेतलेल्या कर्ज प्रकरणाबाबत न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, रात्री कराड पोलिसांनी बोगस कर्ज प्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी तक्रार दिली आहे.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
कराड जनता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात, अशा 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२
ढेबेवाडी - नागठाणे येथील अपघातात ढेबेवाडीतील जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी
साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी नेहमी वर्दळ असल्या कारणाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे .पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रविवार, ३१ जुलै, २०२२
मुंबई - नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून संजय राऊतांना अटक
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...