संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, २ जानेवारी, २०२२
*कराड : शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण*
*एकनाथ गायकवाड फाऊंडेशन च्या माध्यमातून घोगाव गावाला मिळणार पिण्यासाठी शुध्द पाणी*
शनिवार, १ जानेवारी, २०२२
कराड : येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलासा भूसंपादन मोबदल्यापोटी 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी वर्ग खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश
तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन
तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन
तळमावले दि.1 सरत्या वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं. त्यामुळे आता २०२२ च्या पहिल्या दिवशी या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सुरुवात चांगली व्हावी या पार्श्वभूमीवर तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या माध्यमातून नवीन वर्षावर दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
या वेळी संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे साहेब चेअरमन ज्ञानदेव जाधव ,व्हा.चेअरमन सर्जेराव नलवडे,,संचालक डॉ चंद्रकांत बोत्रे,प्रकाश देसाई, प्रकाश करपे,गणेश कोळेकर,अनिल माने,सुरेश देसाई,बाबासो तडाखे,लक्ष्मण मत्रे,अंजना सुर्वे,रामचंद्र कदम,ओंकार शिंदे,संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंझाळकर,उपव्यवस्थापक शरद शिंदे व आदी सेवक वर्ग उपस्थित होते.
मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणानिर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना
मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
निर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना
मुंबई दि 1: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.
कुठरे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...