कुठरे ता.पाटण दिनांक ३० रोजी पवारवाडी कुठरे येथे श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने येणाऱ्या नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पवारवाडी गावातील सर्व महिला,सौभाग्यवती यांच्या हस्ते प्रकाशन करून आम्ही एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार घराण्याची महती, माहिती आणि व्याप्ती समस्त जनसमुदायास सांगण्याचं काम श्रीमंत राजे पवार घराण्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश पवार यांनी केले.
यावेळी बोलताना म्हणाले की या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आम्ही महिलांना जो मान सन्मान दिला त्यामुळे समस्त महिलावर्ग आनंदी होता. फक्त सामाजिक कार्यक्रमातच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांना मान सन्मान देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान नेहमी आग्रही असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी संदिप पवार व ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटिल उपस्थीत होते.
या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल समस्त पवार परिवाराचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा