पाटण, दि. 26 : पाटण वासियांच्या जिव्हाळ्याच्या कराड-चिपळूण 166 राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पाटण ते हेळवाक रस्त्याचे काम रखडल्याने खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेविरोधात मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली पाटणमध्ये ( रामापूर) मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषण अधिकच तीव्र होत असल्याने शासनाने नमते घेतले. या आंदोलनाला अखेर यश आले असून राष्ट्रीय महामार्ग विभाग साताराचे अधिकारी अभियांत मणेर यानी उपोषस्थळी भेट देवून सर्व मागण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने चौथ्या दिवशी उपोषण मागे घेन्यात आले. यावेळी गायब तहसीलदार पंडीत पाटील यांच्या हस्ते गोरख नारकर याना सरबत देवून आंदोलनाची सांगता करन्यात आली.
रखडलेल्या कराड-चिपळूण राज्यमार्ग अंतर्गत पाटण ते हेळवाक रस्त्याच्या रुंदीकरणासाठी, गाशा गुंडाळून पळालेल्या एल अँड टी कंपनीवर गुन्हा दाखल करावा, रूंदीकरणासाठी तोडलेल्या झाडांच्या बदलाट तातडीने झाडे लावावीत व निकृष्ठ कामाच्या चौकशीसाठी मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष चंद्रकांत बामने, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, संजय सत्रे आदींसह मनसैनिकांनी दि. 23 पासून पाटण शहरात आमरन उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरीकांनी भेटी देवून आपला पाठींबा जाहीर करत रखडलेल्या कामा विरोधात संताप व्यक्त केला होता. आंदोलनास तहसीलदार अनंत गुरव व उपअभियांत परेदशी मॅडम यांनी भेट देवून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र कंपनीने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा मनसैनिकांनी घेतला होता.
मात्र अखेर उपोषणकरट्यांपुढे शासनाने नमते घेतले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सातारा येथील अभियंता मनेर यांनी नायब तहसीलदार पंडीत पाटील यांच्या समवेत चौथ्या दिवशी उपोषणकर्त्याची भेट घेत लेखी आश्वासन दिले आहे. या लेखी आश्वासनात रखडलेल्या 13 कि.मीचे काम ऑल ग्रेस कंपनी गुडगाव याना दिले आहे. यासाठी मशिनरी आली असून कार्यरंभ आदेश आपवार तातडीने काम सुरू करू. कामास विलंब झाल्याने एल. अँड. टी. कंपनीस 10.01 कोटींच्या दंडाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयास पाठवला आहे. एल. अँड. टी. कंपनीला वृक्ष लागवडीच्या सूचना दिल्या असून दोन दिवसात तोडलेल्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाईल. कंपनीला आतापर्यंत 211.69 कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे. नवीन कंत्राटदारास कार्यरंभ आदेश दिल्यास तातडीने काम सुरू होईल. याशिवाय रस्त्यावर पडलेले खड्डे भरन्याचे काम तातडीने हाती घेतले आले आहे, असे विविध मुद्दे कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनात देण्यात आले आहेत.
यास्तव मनसैनिकांच्या मागण्यांबाबत समाधान झाल्याने चौथा दिवशी गुरूवार दि. 26 रोजी मनसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी नायाब तहसीलदार पंडीत पाटील यानी गोरख नारकर याना सरबत देवून उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे समर्थ चव्हाण, राहूल संकपाळ, हणमंत पवार, रामचंद्र माने, अधिकराव पवार, ंसंतोष देशमुख, अरविंद पवार, सचिन कदम, संभाजी चव्हाण, भाउसाहेब पवार, तानाजी पवार, बळीराम पवार आदी मनसैनिकांसह सामजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, शंकर मोरे, अनिल भोसले आदी नागरीक उपस्थित होते.
चौकट
अधिकाऱ्यांनी आज लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतले आहे. मात्र या संपूर्ण कामावर आमचे बारकाईने लक्ष असणार आहे. सदर काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे. काम व्यवस्थित नसेल तर यापुढे आम्ही आंदोलन, उपोषण करणार नाही. मनसे स्टाईल खळ खट्ट्याक...करणार, असा इशाराही यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष गोरख नारकर व कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यानी बोलताना अधिकाऱ्यांना दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा