गुरुवार, २५ जुलै, २०२४

अतिवृष्टीच्या काळात आरोग्य विभागाने सज्ज राहावे. - प्रांताधिकारी सुनील गाढे.

 अतिवृष्टीच्या काळात आरोग्य विभागाने सज्ज राहावे. - प्रांताधिकारी सुनील गाढे.


पाटण - सध्या सातारा जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे.पाटण तालुक्याच्या घाटमाथा परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पाटण सारख्या दुर्गम व डोंगराळ भागात भूस्खलन अथवा पुर परिस्थिती संदर्भात प्रशासन आवश्यक ती काळजी घेत आहे. या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक काही समस्या असल्यास किंवा त्यांना काही अडचण असल्यास आरोग्य विभागच्या अधिकारी कर्मचारी यांनी सकारात्मक प्रतिसाद तत्परतेने द्यावा असे निर्देश प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिले आहे.
सध्या पावसामुळे  डेंग्यू किंवा सर्पदंश यासारख्या  इतर अन्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात .त्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती  घेण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी सातारा यांनी दिले आहे.
त्या पार्श्वभूमीवर  आज प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर बी पाटील ,तसेच तहसीलदार अनंत गुरव यांचेसह मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेट दिली.तेथील औषध साठ्याची तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णाची विचारपूस करण्यात आली. तसेच जोतिबाची वाडी येथे देखील स्थलांतरित केलेल्या 14 कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत गोळ्या औषधाचे देखील वाटप करण्यात आले.
मोर गिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग अपुरा असला तरी आहे त्या  कर्मचारी वर्गाने अतिवृष्टीच्या काळात वेळ पडल्यास अतिरिक्त कामकाज करावे लागले तरी ते करावे असे निर्देश प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिले आहे.
 


अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य विषयक बाबी संदर्भात पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत. आपत्कालीन वैद्यकीय किट सर्वत्र तयार  असून नागरिकाच्या जीविताची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल.
... डॉ आर बी पाटील तालुका आरोग्य अधिकारी पाटण
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...