शुक्रवार, ९ जून, २०२३

तळमावले - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या तळमावले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव.


तळमावले - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त उद्या तळमावले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव.
तळमावले / वार्ताहर
10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा केला जातो त्याअनुषंगाने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  वर्धापन दिनाचे औचित्य साधून काळगाव कुंभारगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शाळा व कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2022 - 23 च्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रमेश मोरे बापू यांनी दिली आहे तळमावले तालुका पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. तरी काळगाव व कुंभारगाव परिसरातील जे विद्यार्थी दहावीच्या व बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने पास झाले आहेत त्यांनी उद्या शनिवारी दिनांक 10 जून रोजी सकाळी 11:30 वाजता तळमावले येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...