कुंभारगाव कळंत्रेवाडी भैरवदरा तालुका पाटण येथे काल दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार घडला होता तो तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणला या घरफोडी मध्ये आरोपीने १ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता तो त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला
याबाबत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी पोलीस ठाण्यात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली याबाबत माहिती देताना ते म्हणाले फिर्यादी आनंदा सखाराम यादव यांच्या पत्नी काल दुपारी घराच्या आतील दरवाजा बंद करून दळण दळण्यासाठी गावात गेल्या होत्या त्या दळण दळण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर आरोपी तुषार तानाजी यादव वय २४ वर्षे राहणार कळंत्रे वाडी याने घराच्या माळ्यावरून जाऊन घरातील कपाटाचा दरवाजा उघडून कपाटा मधील एक मंगळसूत्र एक सव्वा तोळ्याची सोन्याची चैन कानातील बुगडी व १३ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आम्ही फिर्यादीच्या घराची पाहणी केल्यानंतर तेथेच राहणारा राहणाऱ्या तुषार आनंदा यादव याची हालचाल संशयास्पद वाटली त्यानंतर त्यायाकडे चौकशी केली त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली
त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आपण चोरी केल्याची त्याने कबुली दिली त्यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याने चारून नेलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी रणजीत पाटील यांनी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एम एस तलबर पोलीस संजय राक्षे प्रशांत शेवाळे संदेश लादे ज्ञानदेव मुळगावकर नवनाथ कुंभार पोलीस पाटील प्रवीण मोरे व अमित शिंदे यांनी सहकार्य केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा