ऐश्वर्या कदम यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार प्रदान
तळमावले/वार्ताहर
कराड-मलकापूर येथे वास्तव्यास असलेल्या ऐश्वर्या एकनाथ कदम यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार-2021 देवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, आशीष वीर, एकनाथ कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. आकर्षक सन्मानपत्र, स्पंदन दिनदर्शिका, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरुप होते. सदर पुरस्कार हा त्यांच्या निवासस्थानी जावून प्रदान करण्यात आला आहे.
ऐश्वर्या कदम यांना कला क्षेत्रातील कामगिरीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. सहयाद्री वाहिनीवरील दम दमा दम या नृत्य स्पर्धेतून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही अखंडित सुरु आहे. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी अनेक नृत्य स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळवले आहेे. या कामामुळे त्यांनी कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने ‘स्पंदन-नारीरत्न पुरस्कार 2021’ देवून सन्मानित करण्यात आले. नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अग्रेसर आहे. महिलांच्या अनोख्या पुरस्कार सोहळयाच्या कार्यक्रमामुळे त्यात आणखी भर पडली. ट्रस्ट च्या या उपक्रमाचे सर्व महिलांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा