३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली मराठेवाडी संघाची बाजी
३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन स्पोर्ट्स मुंबई अंतर्गत ३२ शिराळा मर्यादित संघ श्री निनाईदेवी स्पोर्ट्स चरण आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत वाशी (Mgm) या मैदानावर रविवारी २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली मराठेवाडी या संघाने प्रथम क्रमांकाच्या परितोषिकाचा मान पटकावला.या संघाचे संघामालक संजय पाटील (दादा) सरपंच ,दत्ता जाधव (DJ) अन संजय पाटील (संजुबाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन किंगमेकर ताना भाई यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट खेळी करत प्रथम क्रमांक पटकावला.
तर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक उत्कृष्ट खेळी करत श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बु या संघाने पारितोषिक चा मान पटकवला
आणि स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळी करत हिंदुस्तान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाने तृतीय क्रमांक पारितोषिक चा मान पटकवला .स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करत वाकाईदेवी इलेव्हन स्पोर्ट्स वाकाईवाडी या संघाने चतुर्थ क्रमांक पारितोषिक चा मान पटकवला
श्री निनाईदेवी स्पोर्ट्स चरण ,तसेच मा श्री ,प्रकाश थावरे (साहेब) मा श्री दिनकर शिंदे (साहेब) मा श्री महेश चोरमारे (भाऊ) मा श्री विशाल नायकवडी (भाऊ) मा श्री समोनाथ नायकवडी (भाऊ) मा श्री सचिन चोरमारे (आप्पा) तसेच चरण स्पोर्ट्स चे कॅप्टन सखाराम कोळशे व कृष्णा नायकवडी अन विजयी टिमचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेमध्ये दिवसभर आपल्या बॅटिंग च्या अन बॉलिंग च्या जोरावर आपल्या टिम ला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात दिवसभर उत्कृष्ट खेळ करत ,संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली / मराठेवाडी संघा चा अष्टपैलू खेळाडू अमर मराठे (तात्या) याने मालिकविर चा मान पटकवला
तसेच स्पर्धेमध्ये दिवसभर उत्कृष्ट खेळ करत आपल्या बॅटिंग च्या जोरावर आपल्या टिम ला फायनलमध्ये प्रथम क्रमांक मिळवुन देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा संजय दादा युवा स्पोर्ट्स चा धडाकेबाज फलंदाज सुनिल पाटील (नाना) याने उत्कृष्ट फलंदाजाचा मान पटकवला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा