यामध्ये इतर मागास वर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी शेखर भगवान गोरे व प्रदीप बापूसाहेब विधाते, नागरी बँका मतदार संघातील एका जागेसाठी रामराव आनंदराव लेंभे व सुनील ज्ञानदेव जाधव, महिला मतदार संघातील २ जागांसाठी कांचन सतीश साळुंखे, ऋतुजा राजेश पाटील, चंद्रभागा शंकर काटकर आणि शारदादेवी सुर्याजीराव कदम हे ४ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.
सोसायटी मतदार संघातील ११ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत त्यामध्ये जावली मधून ज्ञानदेव किसन रांजणे आणि आ. शशिकांत जयवंतराव शिंदे, कराड मधून अड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर व ना. शामराव उर्फ़ बाळासाहेब पांडुरंग पाटील, पाटण मधून ना. शंभूराज देसाई आणि सत्त्यजितसिंह पाटणकर, कोरेगाव मधून शिवाजीराव आनंदराव महाडिक व सुनील खेलचंद खत्री, खटाव मधून प्रभाकर देवबा घार्गे व नानासाहेब उर्फ़ नंदकुमार महादेव मोरे आणि माण मधून मनोजकुमार सदाशिव पोळ व शेखर भगवान गोरे निवडणूक रिगणात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा