शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 198 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू**234 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 198 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू*
*234 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.1 सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 198 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 5, कराड 16, खंडाळा 15 , खटाव 51  कोरेगांव 10 , माण 20, महाबळेश्वर 00, पाटण 1, फलटण 35 , सातारा 32, वाई 9 व इतर 4, असे  आज अखेर एकूण 248563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 234 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...