शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

डाॅ.संदीप डाकवेंच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ची दखल टीव्ही 9 मराठी वर

डाॅ.संदीप डाकवेंच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ची दखल टीव्ही 9 मराठी वर
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तिसऱ्यांदा झाली. याची दखल टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने घेतली आहे.  शुक्रवार  दि.6  ऑगस्ट, 2021 रोजीच्या सायंकाळच्या 6.30 वाजताच्या ‘36 जिल्हे 72 बातम्या’ या बातमीपत्रात दाखवण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून त्यांची 54 चित्रे रेखाटली होती. त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये झाली होती.
ना.देसाई हे ढेबेवाडी विभागातील दौऱ्यावर आले असताना डाॅ.डाकवे यांनी त्या रेकाॅर्डच्या सर्टीफिकेट ची फ्रेम प्रदान केली. या बातमीसाठी टीव्ही 9 मराठी चे कराड प्रतिनिधी पत्रकार दिनकार थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले. या बातमीमुळे एकाचवेळी संपूर्ण राज्यात डाॅ.डाकवे यांच्या रेकाॅर्ड ची माहिती पोहोचली असून त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 :
डाॅ.संदीप डाकवें यांची यापूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’ ने घेतलेली दखल :
‘जाता पंढरीशी’ या कार्यक्रमात मुलाखत
‘टीव्ही 9 मराठी’ या नावातील अक्षरगणेशा
दिवंगत पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या पोर्ट्रेट ची बातमी 
खा. शरद पवार  यांच्या स्क्रिबलिंग पोर्ट्रेट ची बातमी

1 टिप्पणी:

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...