गुरुवार, १० जून, २०२१

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या ठाणे महिला जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिभा शिर्के यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या ठाणे महिला जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिभा शिर्के यांची निवड

तळमावले/वार्ताहर
माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या ठाणे महिला जिल्हा अध्यक्ष प्रतिभा शिवाजी शिर्के यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रतिभा शिर्के या मुळच्या अडूळ (ता.पाटण) येथील आहेत. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा भाऊ केदारे, राष्ट्रीय महा सचिव राजेशजी आंधळे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र त्यांना प्राप्त झाले आहे, निवडीबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप भाऊ जाधव, राष्ट्रीय महासचिव रोहिणी ताई भामरे, महाराष्ट्र अध्यक्ष विद्याताई गडाख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे कार्य प्रगतीपथावर जाईल अशी परिसरात चर्चा आहे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...