तळमावले/वार्ताहर
कुठरे (ता.पाटण) येथील वसंत शंकर लोकरे यांचे पत्नी सौ.आशा लोकरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी आशा लोकरे यांचा वाढदिवस आला. पत्नीच्या वाढदिवसाची आठवण संस्मरणीय राहण्यासाठी वसंत लोकरे यांनी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मदत करुन हा वाढदिवस संस्मरणीय केला.
वसंत लोकरे यांनी कै.आशा लोकरे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बादेवाडी या शाळेत 1टेबल व न्यू इंग्लिश स्कूल कुठरे या विद्यालयात बांधण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी रु.2,100/- ची देणगी दिली.
तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी गणेश राजाराम शिंदे यांनी त्यांची पत्नी सौ.स्वाती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा बादेवाडीस 1 टेबल, 2 खुच्र्या व 2 सिलींग पंखे सप्रेम भेट दिले.
ज्ञानमंदिरास दिलेल्या या देणगीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुनील पवार, वसंत लोकरे, आबासोा लोकरे, रघुनाथ शिंदे, उपसरपंच संजय जाधव, मुख्याध्यापिका सौ.शैलजा कदम, सौ.मीरा पाटील, पुजा मॅडम, साठे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.
लाॅकडाऊनच्या कालावधीत अन्य खर्चास बगल देवून आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेस मदत केली हा अन्य माजी विद्यार्थी यांचेसाठी हा आदर्श आहे. माजी विद्याथ्र्यांचे याबद्दल कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा