शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 2493 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू* *1851 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 2493 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू* *1851  नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
 सातारा दि. 30: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2493 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 32 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (4824), कराड 212 (15714), खंडाळा  144 (6315), खटाव 309 (8906), कोरेगांव 251 (8680),माण 185 (6136), महाबळेश्वर 35 (3339), पाटण 124 (4229), फलटण 389 (13059), सातारा 466 (23617), वाई 221 (7889 ) व इतर 29 (573) असे आज अखेर  एकूण   103281  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (103), कराड 4 (432), खंडाळा 0 (82), खटाव 5 (253), कोरेगांव 2 (233), माण 5  (141), महाबळेश्वर 1 (31), पाटण 1 (118), फलटण 3 (184), सातारा 7 (733), वाई 3 (186) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2496 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*1851  नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
   सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1851 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -540026*
*एकूण बाधित -103281*  
*घरी सोडण्यात आलेले -82375*  
*मृत्यू -2496* 
*उपचारार्थ रुग्ण-18059* 


*सातारा : वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध वाढविले ; जनतेने प्रशासनाला मदत करावे*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*सातारा : वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध वाढविले ; जनतेने प्रशासनाला मदत करावे*
- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

सातारा दि. 29 (जिमाका): वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून या अनुषंगाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करुन जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
15 मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन पूर्णपणे पाळला पाहिजे, नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. तसेच बाजारपेठेत गर्दी करुन नये. संपूर्ण कुटुंब  बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. ज्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे पहिले लसीकरण झाले आहे, अशा नागरिकांनी दुसऱ्या डोस   ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच   घ्यावे. तसेच लसीकरणाचा मेसेज आल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

मलकापुर येथील लोटस फर्निचरला भीषण आग

मलकापुर येथील लोटस फर्निचरला भीषण आग

कराड मलकापुर ता. कराड येथील लोटस फर्निचरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी 29 रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून यामध्ये फर्निचर दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत मलकापुर ते नांदलापूर ता. कराड दरम्यान लोटस फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानाला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गालगतच दुकानाला भीषण आग लागल्याने स्थानिक नागरिक, प्रवाशांसह बघ्यांची मोठी गर्दी केली होती.दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत फर्निचर दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर*

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर* 
कराड: कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५-१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५-१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५-१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठपुरावा केला होता यानुसार कराड दक्षिण मधील गावांच्यासाठी ३ कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकासनिधीमधून ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत असा एकूण ६ कोटी रुपयांचा भरघोस निधी कराड दक्षिणेस मंजूर झाला आहे. 

२५-१५ (इतर ग्राम विकास कार्यक्रम) मधून मंजूर निधीतून वनवासमाची येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., धोंडेवाडी अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ५ लाख रु., पवारवाडी (बामणवाडी) अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळेवाडी येथे  अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., वानरवाडी येथे सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., गोळेश्वर येथील  अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख रु., नांदगाव येथील  अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथील  अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रु., रेठरे बु. येथे मुस्लिम समाजासाठी कब्रस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यावर साकव पूल बांधणे यासाठी २५ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथे अंतर्गत रस्त्यासाठी ७ लाख रु., हवेलवाडी (सवादे) येथे सामाजिक सभागृह बांधणेसाठी १० लाख रु., शेळकेवाडी (येवती) सामाजिक सभागृहासाठी ७ लाख रु., नांदलापूर येथे गोपाळवस्ती अंतर्गत बंदिस्त गटार बांधणीसाठी ५ लाख रु., काले येथे कालेवाडी मालखेड (देसाईवस्ती) रस्त्यासाठी १० लाख रु., कोडोली ते वडगाव ह. रस्ता दुरुस्तीसाठी १४ लाख रु., कोडोली येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., किरपे येथील  अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु.,  सवादे येथील व्यायामशाळेसाठी १५ लाख रु., धोंडेवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कापील येथील अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख रु., नारायणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., गोटे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २५ लाख रु., ओंड येथील अंतर्गत रस्ते व गटर साठी १० लाख रु., कार्वे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., जखीणवाडी येथील  येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु. असा २५१५ चा ३ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. 

यासोबतच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शेणोली येथे अंतर्गत गटर बांधणेसाठी ८ लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडबांधणीसाठी ८ लाख रु., गोवारे येथील अंतर्गत रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., सैदापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., सवादे येथील स्मशानभूमीच्या शेडमधील काँक्रीटीकरण व संरक्षक भिंतीसाठी १० लाख रु., साळशिरंबे येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., चचेगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वडगाव ह. येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., घारेवाडी  येथील अंतर्गत रस्त्यासाठी ६ लाख रु., जिंती येथील  येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., वारुंजी  येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग येथील रस्त्यासाठी व गटर साठी १० लाख रु., म्हासोली येथील स्मशानभूमीच्या संरक्षण भूमीसाठी व पेव्हर ब्लॉक साठी १० लाख रु., रेठरे खुर्द येथील रस्त्यासाठी १० लाख रु., गवारकरवाडी (येळगाव) येथील स्मशानभूमीच्या शेडसाठी ८ लाख रु., मालखेड येथील गटर बांधणीसाठी १० लाख रु., शिंगणवाडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कालवडे येथे सामाजिक सभागृह बांधणीसाठी १५ लाख रु., तारूख येथील सभागृह दुरुस्तीसाठी ७ लाख रु., सवादे येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., तुळसन  येथे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी ३ लाख रु., बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., टाळगाव (शेवाळवाडी) येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., विंग  येथील अंतर्गत रस्त्यासाठी ५ लाख रु., कराड येथील उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाची दुरुस्तीसाठी ६ लाख रु., घोणशी येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कोळे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., शेरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., नांदलापूर  येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रु., कुसूर येथे अंतर्गत रस्ते व गटर बांधणीसाठी १० लाख रु., मलकापूर नगरपालिकेला  रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., व कराड नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रु., कराड शहर मुस्लिम समाज संचलित कोविड केअर सेंटर साठी ३ लाख रु. 
असा भरघोस निधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण या आपल्या मतदारसंघासाठी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील : 2256 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 42 बाधितांचा मृत्यू : *1444 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा जिल्ह्यातील : 2256 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 42 बाधितांचा मृत्यू : *1444  नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि. 29 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2256  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 42 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 69 (4696), कराड 280 (15502), खंडाळा  135 (6171), खटाव 147 (8597), कोरेगांव 205 (8429),माण 270 (5951), महाबळेश्वर 46 (3304), पाटण 111 (4105), फलटण 319 (12670), सातारा 477 (23151), वाई 169 (7668 ) व इतर 28 (544) असे आज अखेर  एकूण   100788  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (102), कराड 9 (428), खंडाळा 1 (82), खटाव 11 (248), कोरेगांव 2 (231), माण 2  (136), महाबळेश्वर 1 (30), पाटण 2 (117), फलटण 2 (181), सातारा 8 (726), वाई 3 (183) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2464 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*1444  नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
   सातारा दि. 29 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1444 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

मालदनमधील विजय करतोय शेतीत करिअर

मालदनमधील विजय करतोय शेतीत करिअर

तळमावले/डाॅ.संदीप डाकवे
 आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा व्यावहारिक जीवनात उपयोग करणारे तसे विरळच आहेत. मालदन मधील विजय काळे हा 27 वर्षाचा युवक शेती मध्ये विविध प्रयोग करण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे. स्वतःच्या शेतीमध्ये त्याने वेगवेगळे प्रयोग सुरु केले आहेत. विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी उत्तम पर्याय म्हणून ‘राॅयल गांडूळखत प्रकल्प’ तयार केला आहे. मोठया प्रमाणात गांडुळ खत निर्मिती, आणि सेंद्रीय शेती मधून मसाले गुळ निर्मिती करुन तो वार्षिक 4 ते 5 लाख रुपये कमवत आहे.
निसर्गाची आणि शेतीची आवड असलेल्या विजय काळे याने शालेय शिक्षणानंतर त्याच दृष्टीकोनातून आपले पुढील शिक्षण घेतले. बी.एससी अॅग्री झाल्यानंतर शेतीला पूरक असणारे कोर्स त्याने पूर्ण केले आहेत. यामध्ये अॅग्री क्लिनिक्स अॅन्ड अॅग्री बिझनेस सेंटर्स हा कृषी क्षेत्रातील युवा उद्योजकांसाठी असणारा कोर्स बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पूर्ण करुन सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र कालवडे (कराड) येथे गांडुळ खत निर्मिती प्रशिक्षण घेतले आहे. तसेच सुभाष पाळेकर यांचा नैसर्गिक शेतीचा एक महिन्याचा कोर्स केला आहे. घेतलेल्या ज्ञानाचा व्यावसायिक जीवनात उपयोग करण्यासाठी त्याने गांडुळ खत निर्मिती व विक्री सुरु केली आहे. या खताचा त्याने राॅयल गांडूळ हा ब्रॅंड तयार केला आहे. तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी शेतकÚयांच्या बांधावर जावून त्यांना मार्गदर्शन देखील करत आहे.
हरीत क्रांतीमुळे शेतीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ झाली. पण हळूहळू जमिनीचा पोत बिघडत गेला. जमिनीची उत्पादन क्षमता कमी होवू लागली. रासायनिक खतांचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होवू लागला. त्यामुळे सर्वजण पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडे वळू लागलेत. लोकांच्या शेतीकडे कल वाढावा, रासायनिक खते न टाकता उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मी या क्षे़त्रात पडलो असल्याचे मत विजय काळे याने व्यक्त केले. सध्या माझ्या या गांडुुळ खत निर्मितीमधून वार्षिक 110 टनाच्या आसपास खतांची निर्मिती होत आहे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. तसेच टाॅनिक म्हणून फवारणीसाठी साधारणपणे 7 ते 8 हजार लीटर व्हर्मी वाॅश तयार करतो. याशिवाय कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क सुमारे 1200 लीटर तयार करतो. सेंद्रीय मसाले गुळ वार्षिक 2200 किलो इतका तयार होत असतो.
कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने त्याने हा प्रोजेक्ट तयार केला असून साधारणपणे 18 लाख पर्यंत त्याची गुंतवणूक केली आहे. या प्रोजेक्टमधून त्याला सध्या गांडुळ खत निर्मिती, सेंद्रीय टाॅनिक, दशपर्णी अर्क, कीटकनाशक, सेंद्रीय मसाले गुळ, अॅग्रो कन्सल्टींग इ. मधून सर्व खर्च वजा जाता वार्षिक 4 ते 5 लाख रु. मिळत आहे.
रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे मानव व जमिनीच्या आरोग्यास धोका आहे. विजय याने स्वतः प्रशिक्षण घेवून हे निर्मिती प्रकल्प उभे केले आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणींना यात सामोरे जावे लागले. परंतु येणाÚया प्रत्येक अडचणीतून तो शिकत राहिला. त्याचा त्याला आता फायदा देखील होत आहे.
सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांकडून त्याला विरोध झाला. परंतू त्याची या क्षेत्रातील आवड, परिश्रम करण्याची तयारी पाहून घरच्यांनी त्याला यात खूप मदत केली आहे. आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा यासाठी त्याच्या या प्रोजेक्टला गावकरी देखील मदत करत आहेत. गावांमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास या निमित्ताने लोकांची चांगली गर्दी होते.
सदर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारत असताना कृषी विज्ञान केंद्र कालवडे, कराड येथील तज्ञ शिक्षक, कृषी विज्ञान केंद्र बारामती, अॅग्री काॅलेज रेठरे येथे तसेच कृषी विभागातील अधिकारी यांनी देखील त्याला सहकार्य केले.
  माझ्या आवडीच्या कृषीच्या क्षेत्रातच मी करिअर करत असून याचा मला भविष्यात नक्कीच फायदा होईल. जमिनीचा पोत राखण्यासाठी प्रयत्न करणे, गांडुळ खत मोठया प्रमाणात निर्यात करणे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे हे माझे भविष्यातील नियोजन आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत शेतीत यशस्वी होता येवू शकते. तसेच कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी असल्याने तरुणांची देखील एक करिअर म्हणून याकडे वळण्यास हरकत नाही. असे मत विजय काळे यांने यावेळी बोलताना व्यक्त केले.
  विभागातील शेतकरी वर्गाला कृषी क्षेत्रातील सर्व तंत्रज्ञान, माहिती, विविध नाविण्यपूर्वक योजना, उपक्रम, प्रशिक्षण, गटशेती, घरच्या घरी कमी खर्चात ओैषधे कशी करावित यासाठी विजय प्रयत्नशील आहे. शेतकÚयाला शेतीच्या बाबतीत सुशिक्षित बनवणे हे त्याचे ध्येय आहे.
विजयच्या कार्याची दखल म्हणून कोल्हापूर आकाशवाणीवर हॅलो किसान कार्यक्रमात ‘उत्कृष्ट गांडूळखत निर्मिती आणि सेंद्रीय मसाले गुळ निर्मिती’ या दोन विषयांवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्याला बोलावण्यात आले होते. मालदन मधील विजय काळे या ध्येयवेडया युवा शेतकÚयाचा आदर्श घेवून तरुणांनी यामध्ये उतरायला हरकत नाही.

:
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆◆●●
सेंद्रीय शेतीमधील मसाले गुळ निर्मिती बाबत थोडंसं...
22 गुंठे उस लागण मसाले गुळ निर्मिती करताना 2 वर्षाची ऊसाची पाचट शेतात गाढली. हिरवळीचे स्वतःसाठी ताग विस्कटून 2 महिन्यात 7 फुट उंचीचा खतासाठी ताग जमिनीत गाढला. ताग काढताना नत्र, स्फुरद व कंपोस्ट कल्चर जीवाणूंचा वापर मोठया प्रमाणात केला.
व्हीएसआय मांजरी पुणे येथील टिश्यू कल्चरचे बीयाणे, घरी तयार केेलेले तेच बीयाणे लागणीसाठी वापरले आहे. 4 फुटी सरी पध्दत वापरली आहे.
लागण करताना जैविक बेणे प्रक्रिया पीएसबी व ट्रायकोडर्मा या जीवाणूंचा वापर ऊस लावताना 1 टन गांडूळखतांचा वापर केला आहे.
ऊसाला आळवणी व फवारणीसाठी गोमुत्र, व्हर्मी वाॅश, जीवामृत, ताक, दशपर्णी अर्क यांचा वापर तसेच सर्व प्रकारचे जीवाणू खते वापरली आहेत.
200 लीटर व्हर्मीवाॅश, 1200 लीटर जीवामृत, 20 लीटर दशपर्णी अर्क, 140 लीटर गोमुत्र यांचा वापर पाठपाण्याव्दारे आळवणीसाठी केला आहे.
ऊसाला भर घालताना 1200 किलो गांडूळखताचा वापर, 1 पोते निंबोळी पेंड, 20 किलो शेंगदाणा पंेड याचा त्यासोबत वापर केला आहे. किड नियत्रंणासाठी मोठया प्रमाणात मित्र कीटक उपलब्ध होते.या सर्व प्रकारच्या खतांमुळे जमीन भुसभुशीत होवून गांडूळांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब मोठया प्रमाणात वाढला. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता 22 गुठयांमध्ये 22 टन उसाचे उत्पन्न मिळाले. व त्यापासून उत्तम प्रतिचा मसाले गुळ तयार करण्यात आला. या गुळाला प्रति किलो रु.100 ते 150 किलो दर मिळाला असल्याचे युवा शेतकरी विजय काळे यांनी सांगितले आहे.
केमिकलमुक्त गुळाची वैशिष्टये:

क्षारमुक्त पाणी असल्याने अप्रतिम चव, रसायनमुक्त जमीन, त्यामुळे इतर गुळापेक्षा गुणकारी औषधी, रासायनिक भेंडी पावडर ऐवजी देशी भेंडी, बाजारातील तेलाऐवजी देशी गाईचे तूप, गुळ चवदार/सुगंधी होण्यासाठी वेलची व सुंठ पावडरचा वापर

धामणी : मस्करवाडी येथे लसीकरण शिबीर संपन्न

धामणी : मस्करवाडी येथे लसीकरण शिबीर संपन्न 
 प्रतिनिधी / मनोज सावंत
धामणी : कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मस्करवाडी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र काळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यलय मस्करवाडी येथे लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 200 लसीचे डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी 135 लोकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविला.
गावातील सर्व ग्रामस्थांनी लस घेतली.शिल्लक राहिलेली लस चव्हाणवाडी (धामणी ) येथील नागरिकांना देण्यात आली. याशिबिरासाठी काळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ अरुण जाधव,डॉ.राजेंद्र गरुड,सौ.आरुंदती गरुड सरपंच श्रीमती उषा भरत मते ,उपसरपंच श्री.अशोक शंकर पाळसे,ग्रामपंचायत सदस्य श्री.बबन मस्कर,कल्पना सनूगले,मंगल कदम,ग्रामसेवक टी. एस.जाधव,शिपाई आनंदा पाटील आरोग्य सेवक प्रशांत काळे,सिस्टर आर.एस. पवार,एस.साळुंखे,सुरेखा पाटील,अंगणवाडी सेविका कल्पना सनूगले,उषा तेटमे मदतनीस निर्मला जाधव मस्करवाडी ग्रामपंचायत परीसरातील सर्व ग्रामस्थ यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 यावेळी उपसरपंच अशोक पाळसे यांनी स्वत: डोस घेऊन ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी, आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नका, आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे, अशा प्रकारे आवाहन केले.

*सातारा जिल्ह्यातील 1810 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1810 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 28 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1810  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 77 (4627), कराड 202 (15222), खंडाळा  101 (6036), खटाव 200 (8450), कोरेगांव 139 (8224),माण 90 (5681), महाबळेश्वर 69 (3258), पाटण 73 (3994), फलटण 217 (12351), सातारा 507 (22674), वाई 114 (7499 ) व इतर 21 (516) असे आज अखेर  एकूण   98532  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (96), कराड 4 (423), खंडाळा 0 (81),खटाव 0 (237), कोरेगांव 4 (229), माण 3  (133), महाबळेश्वर 1 (29), पाटण 1(115), फलटण 3 (179), सातारा 12 (720), वाई 6 (180) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2422 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा*

*राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा*

मुंबई दि.28 राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

*लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार*

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

*जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न*

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

*उत्तम नियोजन करावे*

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

*कोविन एपवर नोंदणी करा*

या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

*केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत -* मा.मुख्यमंत्री -पृथ्वीराज चव्हाण


 *केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत -*  
मा.मुख्यमंत्री -पृथ्वीराज चव्हाण
कराड:    देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या  20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, “.वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे..... मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सीजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही."   
 देशभरात वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा वाढवण्यासाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगताना ते म्हणाले,
  1) केंद्र  शासनाने देशभरातील 390 दवाखान्यात PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. 
 2) कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने 1 लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  
सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त 1 लाख MT ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे. 

 

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत.  
1) ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत "  हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता? 
2) 1 लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयातीचे काय झाले ? 5 महिन्यात ते का आयात केले नाही ?  हि प्रक्रिया कोणी थांबवली? 
3)  आतापर्यत  देशभरात मंजूर केलेल्या 162 PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त 33 दवाखान्यातच उभा केले आहेत, व त्यापैकी महाराष्ट्रात फक्त एक प्लॅन्ट उभारला आहे. हे खरे आहे का? 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना "भारताने कोरोनाला कसे हरवले" अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सीजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले  आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे अशी मागणी मी करतो.   

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी धामणी येथील भराडीदेवीची यात्रा रद्द

कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी धामणी येथील भराडीदेवीची यात्रा रद्द

तळमावले / मनोज सावंत
या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उरूस आदी उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर धामणी येथील ग्रामदैवत श्री भराडीदेवीची दि.28 व 29 एप्रिलदरम्यान
होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

धामणी : कोरोना संकटामुळे पाटण तालुक्यातील धामणी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांत मुंबई पुण्यातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात. पण यंदा यात्रा होणार नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले.

दि.26 एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतिने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच सौ.आशाताई  नेर्लेकर उपसरपंच श्री.रमेश अण्णा सवादेकर यांनी सांगितले.यात्रेनिमित्त होणारे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत याची सर्व भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन सरपंच/उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,श्री भराडीदेवी यात्रा कमिटी, तंटामुक्ती समिती,व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.याविषयानुरूप दवंडी गावात देण्यात आली.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,अत्यावश्यक गरज असल्यासच घराबाहेर पडावे,मास्क,सॅनिटायजरचा वापर करावा,हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावेत,सुरक्षित अंतराचे पालन करावे,सध्या कोरोनाचा भयावह प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आपण,आपले कुटुंब,मित्र परिवार सुरक्षित राहावा म्हणून शासन वेळोवेळी देत असलेल्या कोरोना प्रतिबंध सूचनांचे तंतोतंत पालन करावे,' असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.


सातारा : कडक लॉकडाऊनचा चांगला असर ! आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडीशी घट : 1666 बाधित तर 33 बाधितांचा मृत्यू

सातारा : कडक लॉकडाऊनचा चांगला असर ! आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडीशी घट : 1666 बाधित तर 33 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.27 गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. दिवसाला दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती. पण आता कडक लॉकडाऊनचा चांगला असर पडताना दिसत आहे. बधितांची संख्या काहीशी कमी होत आहे  गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 1666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू झाला आहे
  जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1666  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 149 (4550), कराड 258 (15020), खंडाळा  74 (5935), खटाव 142 (8250), कोरेगांव 78 (8085),माण 123 (5591), महाबळेश्वर 31 (3189), पाटण 119 (3921), फलटण 151 (12134), सातारा 367 (22167), वाई 147 (7385 ) व इतर 27 (495) असे आज अखेर  एकूण   96722  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (96), कराड 6 (419), खंडाळा 3 (81),खटाव 5 (237), कोरेगांव 1 (225), माण 2  (130), महाबळेश्वर 0 (28), पाटण 14), फलटण 1 (176), सातारा 11 (708), वाई 2 (174) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2388 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

धामणीत बिबटयाची दहशत

धामणीत बिबटयाची दहशत
तळमावले / मनोज सावंत 
धामणी मध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. गावामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आज दि. 27 रोजी पहाटेच्या सुमारास गावामधील भावके आळी येथिल मिलिंद अरुण जाधव यांच्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली आणि कुत्र्याला घेऊन जंगलात पसार झाला. पहाटे घरातील लोकांनी कुत्रा दिसत नाही म्हणून शोधाशोध केली असता घराजवळच्या काही अंतरावर बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेले असल्याचे आणि बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. 
धामणी काळगाव भागात बिबट्याचा व इतर प्राण्यांचा वावर वाढला असतानाही वनविभागाचे या घटनेनंतर दुर्लक्ष होत आहे ,असे निदर्शनास येत असून गेल्या काही महिन्यात बिबट्याने अनेक कुत्री व शेळी फस्त केली आहेत.  यामुळे गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीदायक वातावरण झाले असून ,बिबट्याचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

: गेल्या सहामहिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाही करावी,गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांच्या कडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटने नंतर  गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वनविभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा.   - मुरलीधर सावंत
 (अध्यक्ष-वेंदात चॅरिटेबल ट्रस्ट )

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने 5 कोटी निधी मंजूरजिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामे लागणार मार्गी

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने 5 कोटी निधी मंजूर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामे लागणार मार्गी 

कराड : प्रतिनिधी
 खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कोरेगाव, वाई, खटाव, जावली, कराड व पाटण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी निधी मंजूर झाला आहे. लोकसभा मतदार संघातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांसाठी खा. पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार हा निधी मंजूर झाल्याने मुलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
      खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या शिफारशीनुसार 2515 मधून सदरचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये 
पाटण तालुक्यातील मेंढोशी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी 5 लाख, म्‍हावशी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी 7 लाख, गुढे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी 5 लाख, घोटील (खालचे) येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी 5 लाख, आंब्रग येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, गारवडे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, हावळेवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, पाळेकरवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, मारुल हवेली येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे 20 लाख, कोरीवळे येथे गणेशनगर ते येताळबा अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, टेळेवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, पापर्डे येथे अंतर्गत गटर्स बांधणे 7 लाख, चाफळ येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, रुवले येथे सणबूर-रुवले रस्‍ता ते पाटीलवाडी मार्गे नेहरु टेकडी रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, पेठ बनपूरी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, सोनाईचीवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, नावडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, निसरे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, खिलारवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, बेलवडे येथे मातंगवस्‍ती ते स्‍मशानभूमी पर्यंतचा रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, कुंभारगांव येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख निधी मंजूर झाला आहे.
सातारा तालुक्यातील सासपडे येथे गवंड ते नदशिवार व स्मशानभूमी ते नदी रस्‍ता डांबरीकरण करणे 7 लाख, गोवे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, आरे तर्फ परळी येथे हायमास्‍ट लॅम्‍प बसविणे 2 लाख, बोरगाव येथे बोरगाव स्‍टॅड ते बौधवस्‍ती रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख, पाडळी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, किडगांव येथे भांबुरेवस्‍ती कळंबे किडगाव रोड ते भांबुरेवस्‍ती रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, हामदाबाज येथे मेढा-सातारा रोड ते हामदाबाज 900 मीटर अंतराचे खडीकरण व डांबरीकरण पोहेाच रस्‍ता करणे 7 लाख, मालगाव येथे स्‍मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे 5 लाख, मांडवे येथे अंतर्गत रस्‍ते डांबरीकरण करणे 7 लाख, पाटखळ येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे 10 लाख, चिंचणेर सं. निंब येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, शिवथर येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, अति‍त येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, काशीळ येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख,  नागठाणे येथे आण्‍णासाहेब सोनटक्‍के यांचे घर ते हणुमंत साळुंखे यांचे घरापर्यतच्या अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी  7 लाख मंजूर झाले आहेत. 
      खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, लाडेगाव अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, पुसेसावळी येथे सभामंडप बांधणे 10 लाख, खातगुण येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रेटीकरण करणे 5 लाख मंजूर झाले आहेत.
      वाई तालुक्यातील चांदक येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रेटीकरण करणे 7 लाख मंजूर झाले आहेत.
     कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे तारगाव ते किरोली खडखडा ओढा रस्‍ता करणे 5 लाख, जळगांव येथे संजय लक्ष्‍मण जाधव ते दत्‍त मंदिर दोन्‍ही बाजुस गटर्स बांधणे 5 लाख, सिध्‍दार्थनगर येथे समाज मंदिर बांधणे 7 लाख, नागझरी येथे वरची आळी अंतर्गत पेव्‍हर्स ब्‍लॅाक बसविणे 5 लाख, पवारवाडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, साप येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, देऊर येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, भोसे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, बोरगाव येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे 10 लाख, रुई येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे 10 लाख, जावली तालुक्यातील बिभवी येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे व आरसीसी बंदिस्‍त गटर बांधणे 7 लाख मंजूर झाले आहेत. 
     कराड तालुक्यातील टेंभू येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे कामासाठी 7 लाख, हिंगनोळे येथे अंतर्गत रस्‍ते करणे 5 लाख, पेर्ले येथे सभामंडप बांधणे 10 लाख, उंब्रज येथे चोरे रस्‍ता, वसंतराव जाधव घर ते शिंदे चाफळकर घरापर्यंत डांबरीकरण करणे आणि ग्रामपंचायत कार्यालय ते महादेव मंदीर डांबरीकरण करणे 10 लाख, मसूर येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, खराडे येथे बहुउद्येशीय इमारत बांधणे 10 लाख, हजारमाची येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, कवठे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, कोपर्डे हवेली येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण व गटर्स बांधणे 7 लाख, नडशी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, अंतवडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, कोर्टी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, शेरे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, म्‍हासोली येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, भोळेवाडी येथे सभामंडप बांधणे 10 लाख, सवादे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रेटीकरण करणे 5 लाख, रेठरे खुर्द येथे सभामंडप बांधणे 10 लाख, येणपे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, घोगाव येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लाख, बेलवडे हवेली येथे सभामंडप बांधण्यासाठी  10 लाख मंजूर झाले आहेत.
       त्यामुळे विविध गावातील विकासकामांना चालना मिळणार आहे.

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

*सातारा पोलिसांच्या सेवेत विविध 24 वाहनं आणि 48 मोटारसायकली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली सुपूर्द*

*सातारा पोलिसांच्या सेवेत विविध 24 वाहनं आणि 48 मोटारसायकली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली सुपूर्द*
सातारा दि. 25 :  जिल्हा नियोजच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारचे 24 वाहनं आणि 48 मोटार सायकली याच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार  आहे.  जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.
पोलीस विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती. जिल्हा नियोजनच्या निधीमधून 13 स्कॉर्पिओ, 5 बलोरो, 6 व्हॅन व 48 मोटार सायकली पोलीस विभागास देण्यात आली आहेत. या वाहनांचा बंदोबस्तासाठी मोठा उपयोग होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मिदत मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलीस विभागातील वाहने जुनी झाली होती. कायदा व सुव्यास्था राखण्यासाठी जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी रुपये वाहनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. या वाहनांचा पोलीस विभागामार्फत योग्य उपयोग करुन पोलीसांमधील कार्यक्षमता व गतीमानता वाढणार असून, हा निधी मंजुर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले.

सातारा जिल्ह्यातील ; 1434 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील ; 1434 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू
 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 26  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 77 (4401), कराड 76 (14762), खंडाळा  87 (5861), खटाव 270 (8108), कोरेगांव 118 (8007),माण 145 (5468), महाबळेश्वर 38 (3158), पाटण 32 (3802), फलटण 204 (11983), सातारा 295 (21800), वाई 84 (7238 ) व इतर 11 (468) असे आज अखेर  एकूण   95056  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (95), कराड 5 (413), खंडाळा 0 (78),खटाव 3 (232), कोरेगांव 2 (224), माण 2  (128), महाबळेश्वर 0 (28), पाटण 1 (113), फलटण 7 (175), सातारा 5 (697), वाई 1 (172) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2355 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार* *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत केल्या सूचना*

 *वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार* 
 
*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत केल्या सूचना* 
     
 *कराड /प्रतिनिधी
कराड :- वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना होत असतो. या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती कि हि योजना कार्यान्वित व्हावी जेणेकरून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सद्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेतासाठी पाणी गरजेचे आहेच त्याहीपेक्षा पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे त्यामुळेच वाकुर्डेचे पाणी सोडण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी  वाकुर्डे, येणपे, महारुगडेवाडी, उंडाळे या प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली व वाकुर्डे योजनेचे पाणी तात्काळ सोडण्याबाबत सूचना केल्या त्याप्रमाणे येत्या काही दिवसात वाकुर्डे योजनेचे पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत पोहचणार आहे. व दक्षिण मांड नदी पुन्हा एकदा वाहणार असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. या आढावा बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील तसेच प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, टेम्भू उपसा सिंचन प्रकल्पचे कार्यकारी अभियंता रा. प. रेड्डीयार, वारणा कळवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, टेम्भू प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता आबासाहेब शिंदे,  मृदा व जलसंधारण विभागाचे इंजि. मि. सु. पवार, जलसंपदा विभागाचे इंजि. सतीश चव्हाण, कृष्णा कालवा विभागाचे उपविभागीय अधिकारी इंजि. सुधीर रणदिवे, महावितरणचे सहायक अभियंता इंजि. फिरोज मुलाणी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, उदय पाटील (आबा), पै. नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात आदी यावेळी उपस्थित होते. 

 *याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* वाकुर्डे उपसा योजनेचे पाणी सोडले जावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी होऊ शकतो. यामुळेच शेतकऱ्यांचा मागणीचा विचार करून वाकुर्डे योजनेचे पाणी तात्काळ सोडले जावे अश्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच हे पाणी जुजारवाडी येथे जाईपर्यंत कोणीही पाणी उपसा करू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना महावितरण अधिकाऱ्यांनी कराव्यात अश्या सूचना केल्या आहेत. कारण जर पाणी जुजारवाडी पर्यंत पोहोचण्याआधीच उचलले गेले तर पुन्हा पाण्याचा प्रश्न उदभवेल. जुजारवाडीपर्यंत पाणी पोहचले कि उंडाळे ल.पा.तलाव टाळगाव ल.पा.तलाव इथपर्यंत उलट पाणी साठवीत यावे जेणेकरून ऐन उन्हाळ्यात पाणी अपुरे पडणार नाही. तसेच जरी पाणी थोडे फार कमी पडले तर येवती येथील तलावात पुरेसा पाणीसाठा केला आहे व गरज पडली तर तोसुद्धा यामार्गाने सोडण्यात येईल अश्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

------------------------------------------------------

रविवार, २५ एप्रिल, २०२१

कोरोनामुळे यादववाडी येथे होणारी जोतिर्लिंग यात्रा यंदाच्या वर्षीही रद्द

कोरोनामुळे यादववाडी येथे होणारी जोतिर्लिंग यात्रा यंदाच्या वर्षीही रद्द

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सण उत्सव रद्द करण्यात आले होते.

तर राज्यात यात्रा उत्सव देखील रद्द करण्यात आले होते. हीच परंपरा यंदाच्या वर्षीही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कायम आहे.

त्यातच यंदाच्या वर्षीचे कोरोनाचा कहर जरा जास्तच असल्याने प्रशासनाकडून अत्यंत सावधानतेने पाऊले उचलली जात आहे, यातच पाटण तालुक्यातील यादववाडी (ग्रामपंचायत चिखलेवाडी) गावच्या जोतिबाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.

दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.यावर्षी सोमवार, दि.26 एप्रिल आणि मंगळवार दि.27 एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती जोतिर्लिंग यात्रा कमिटी,श्री जोतिर्लिंग नवतरुण गणेश मंडळ ग्रामस्थ मंडळ यादववाडी यांनी दिली.भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पवारवाडीत लसीकरणासोबत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम


पवारवाडीत लसीकरणासोबत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम


तळमावले : कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेने ग्रामीण भागात तांडव घालणे सुरू केले आहे. पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना समूह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत पवारवाडी (कुठरे ) यांच्या वतीने गावामध्ये कोविड लसीकरण करण्यात आले याचा 125 नागरिकांनी लाभ घेतला त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.

या संसर्गजन्य आजाराला हरविण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे म्हणून ग्रामपंचायतिने गावातील सर्व सांडपाणी वाहून जाणारी गटारे यामध्ये डी.डी टी.पावडरची फवारणी करण्यात आली  नागरिकांनी नियमांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनसुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात केले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच दत्तप्रसाद कदम,उपसरपंच महेश लोहार,सदस्य अंकुश पाटील,संभाजी कदम, त्याच बरोबर गावातील ग्रामस्थ ,तरुण वर्ग, यांनी परिश्रम घेतले.

नियमित सॅनिटायझर व मास्कचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे आजारापासून बचावासाठी वैयक्तिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. -अविनाश पवार (दादा)




तळमावले : तहानलेल्या झाडांना धरणीमाता फाउंडेशनचे पाणी

तळमावले : तहानलेल्या झाडांना धरणीमाता फाउंडेशनचे पाणी

झाडांना पाणी देताना : अमृता चोरगे,जितेंद्र चोरगे, अंकुश कापसे,अक्षय मोरे, सतिष वाघ,अजिंक्य माने.


तळमावले दि. 25 (वार्ताहर) -ता.पाटण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग लताबाईंच्या सुमधुर आवाजात ऐकताना आपल्या सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. इतके सामर्थ्य या अभंगात आहे.एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही. पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून कार्यास सुरुवात केली की काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो. असाच एक प्रयत्न उन्हाळ्यात डोंगरावरच्या झाडांना पाणी घालण्याचे काम कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन करत आहे गलमेवाडी - येवती रस्त्याच्या दुतर्फा असलेली वनराई तीव्र उन्हाने करपून जाते असे असताना डोंगराचे माळ पून्हा वनराईने हिरवे करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना उन्हाची झळ बसू नये यासाठी धरणीमाता फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन भर उन्हाळ्यात पाणी घालून झाडांचे सवंर्धन सुरू केले आहे.

गलमेवााडी - येवती घाट रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असते पण तेथे पाण्याची सोय नाही अशावेळी तीव्र उन्हात झाडे सुकून जातात त्यामुळे परिसरातील सर्व डोंगर उजाड दिसतात अशावेळी असलेली येथे झाडी भर उन्हाळ्यात जगविण्यासाठी टँकरने झाडांना पाणी घालून निसर्गाचे जतन करण्याचा प्रयत्न कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन ही संस्था करत आहे.

वृक्षरोपणाचे दोन भाग असतात.एक म्हणजे वृक्ष लावणे व दुसरा म्हणजे लावलेला वृक्ष जगवणे. केवळ वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपत नाही तर लावलेले झाड व्यवस्थितरीत्या वाढणेदेखील महत्त्वाचे आहे : - अजिंक्य माने (सचिव धरणीमाता फाउंडेशन )




*सातारा जिल्ह्यातील 1933 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1933 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 25 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 39  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 85 (4324), कराड 226 (14686), खंडाळा  145(5774), खटाव 261 (7838), कोरेगांव 148 (7889),माण 176 (5323), महाबळेश्वर 47 (3120), पाटण 81 (3770), फलटण 259(11779), सातारा 346 (21505), वाई 140 (7154 ) व इतर 19 (457) असे आज अखेर  एकूण   93619  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3(95), कराड  4 (408),  खंडाळा 1 (78) ,खटाव 6 (229), कोरेगांव 3 (222), माण 2  (126), महाबळेश्वर 0 (28), पाटण 2 (112), फलटण 5 (168), सातारा 6 (692), वाई 7 (171) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2329 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

तळमावले : संतोष नानांच्या जाण्याने मैत्री पर्वातील एक तारा निखळला -डाॅ.संदीप डाकवे

तळमावले : संतोष नानांच्या जाण्याने मैत्री पर्वातील एक तारा निखळला -डाॅ.संदीप डाकवे
संतोष पवार...कालपासून लिहण्याचा प्रयत्न करतोय. खरंतर, ‘संतोष पवार यांचे निधन’ ही बातमी लिहताना...‘भावपूर्ण श्रध्दांजली’ बॅनर करताना हात थरथरले. सर्वजण त्यांना ‘संतोष नाना’ म्हणायचे. संतोष नाना, आपल्यात नाहीत ही गोष्ट आजही मन मानायला तयार नाही. हाफ शर्ट, देखणी दाढी, वेगळया खर्जातला आवाज, एखाद्यावर कितीही रागावले तरी शेवटी विनोद करत, हसून बोलण्याची सवय, रुबाबदार चालणारे व्यक्तिमत्त्व कालपासून डोळयासमोर येतोय. कुटूंबीय, नातेवाईक, मित्र परिवार यांच्यामध्ये आपल्या स्वभावाने आपले वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. एक दिलदार मित्र कसा असावा हे संतोष नाना यांच्याकडे पाहून शिकायला मिळते.
सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व संतोष नानांचे होते. लहान वयापासूनच त्याने आपल्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली. आपले कुटूंब, नातेवाईक, मित्र यांच्यासाठी संतोष नाना नेहमी पुढे असायचे. त्यांना मिळालेल्या यशाचा इतरांना मनापासून आनंद वाटायचा. मित्र किंवा मैत्री कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे संतोषनाना होय.
साधारणपणे 3 वर्षापूर्वी झालेल्या मोठ्याा अपघातामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. बरेच दिवस त्यांना बेडरेस्ट घ्यावी लागली. काही दिवस वाॅकरवर चालावे लागले तरी त्यांनी पुन्हा मोठ्याा आत्मविश्वासाने यातून बाहेर पडले. नेहमी प्रसन्न असायचे. संतोष पवार यांच्या आकस्मिक जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबावर, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या मित्रपरिवारातील चैतन्य हरपल्यासारखेच झाले आहे.
कोणत्याही संकटात दोन हात करण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. परंतू या आजारपणाच्या काळात त्यांनी दिलेली झुंज अयशस्वी ठरली आहे. माझे लग्न चांगल्या पध्दतीने व्हावे यासाठी त्यांनी ते त्यांच्या दारात आयोजित केले होते. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत अविस्मरणीय आहे. आमचे संबंध मित्रत्वातून नात्यांकडे आणि नात्यांतून मैत्रीकडे गेले आहेत. त्यांच्या अकाली जाण्यामुळे माझ्या मैत्री पर्वातील एक तारा निखळला आहे. कुटूंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांना जोडणारा दुवा आज निखळल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. संतोष नानांची उपस्थिती ही कार्यक्रमामध्ये ‘जान’ आणणारी असायची. माझ्या एकंदरित पत्रकारिता व चित्रकलेचा क्षेत्रातील यशाबद्दल ते जाम खूश असायचे. ते म्हणायचे, ‘‘दाजी, तुमचा नादच करायचा न्हाय’’. त्यांची मोठी मुलगी रिध्दीचे फक्त ठिपक्यांच्या साहय्याने मी केलेल्या चित्राची त्यांनी फ्रेम केली होती. सर्वांना ते अभिमानाने सांगायचे हे चित्र माझ्या दाजींनी तयार केले आहे. इतरांच्या आनंदात त्यांना नेहमी आनंद वाटायचा म्हणूनच की काय त्यांचे नांव ‘संतोष’ असेल असे मला वाटते.
अॅड.जनार्दन बोत्रे साहेब यांच्या तालमीत सहकाराचे धडे गिरवल्यानंतर शिवसहयाद्री पतपेढी, दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीमध्ये आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटवला होता. सार्वजनिक जीवनातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून येते. आपल्याबरोबरच इतरांची कुटूंबे उभी करण्याची त्यांनी धडपड नेहमी दिसून यायची. एक चळवळी स्वभावाचा, मोठया मनाचा माणूस आपल्यातून हरवल्याची जाणीव कायम राहील. ‘‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’’ हे वाक्य ऐकणे किंवा म्हणणे सोपे असते. परंतू ते अनुभवणे मात्र महाकठीण आहे. संतोष नानांच्या अकाली ‘एक्झिट’ मुळे एक हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची जाणीव होत आहे. संतोष नानांना विनम्र श्रध्दांजली...!

शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे

*सतारकराच्या चिंतेत भर चोवीस तासात 34 बाधितांचा मृत्यू तर 2001 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

*2001 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 24 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4239), कराड 244 (14460), खंडाळा  162 (5629), खटाव 114 (7577), कोरेगांव 117 (7741),माण 177 (5147), महाबळेश्वर 92 (3073), पाटण 110 (3689), फलटण 253 (11520), सातारा 372 (21159), वाई 249 (7014  ) व इतर 439 असे आज अखेर  एकूण   91687  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची आजची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (92), कराड  3 (404),  खंडाळा 0 (78) ,खटाव 6 (223), कोरेगांव 3 (219), माण 1 (124), महाबळेश्वर 1 (28), पाटण 1 (110), फलटण 3 (163), सातारा 12 (686) व  वाई 3 (164) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

मे आणि जून महिन्यांत मिळणार मोफत 5 किलो धान्य

  • मे आणि जून महिन्यांत मिळणार मोफत 5 किलो धान्य
  • राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ

 मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती.

आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील केंद्र सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली होती. श्री.पवार यांनी देखील या पत्राचा तातडीने विचार करत केंद्र सरकारशी चर्चा केली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1 लाख 40 हजार मेट्रिक टन तांदळाची तर 2 लाख 40 हजार मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या 7 कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहोचवू शकतो असे श्री.भुजबळ यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आज केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे देशात 80 कोटी नागरिकांना मे आणि जून महिन्यांमध्ये 5 किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे.

अन्न, सुरक्षा योजनेच्या राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना काळात जारी कराव्या लागलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी भुजबळांनी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे भुजबळांनी केंद्र सरकार आणि या  मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

तळमावले : संतोष पवार यांचे निधन

संतोष पवार यांचे निधन

तळमावले/वार्ताहर
मोळावडेवाडी, कुठरे (ता.पाटण) येथील संतोष दादू पवार यांचे शुक्रवार दि. 23 एप्रिल, 2021 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुली असा मोठा परिवार आहे. शिवसमर्थ समुहाचे प्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांचे ते भाचे होत.
त्यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 25 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 9 वाजता मोळावडेवाडी, कुठरे ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

*सातारा जिल्ह्यातील : 1742 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 1742 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 23 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1742  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 112, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 11, सदरबझार 8, माची पेठ 1, केसरकर पेठ 2,रामचा गोट 6, यादोगोपाळ पेठ 3, गोडोली 7, कोडोली 21, करंजे 8, कृष्णानगर 4, संगमनगर 3, संभाजीनगर 1, तामाजाईनगर 5, सैदापूर 4,  शाहुनगर 5, शाहुपुरी 5,  अपशिंगे 1,  शिवथर 2, क्षेत्र माहुली 2, वाढे 2, लिंब 2,  वनवासवाडी 2, सांगवी 1,अंबेदरे 1, कारंडवाडी 2, चिंचणेर 1, खेड 1, सोनगाव 4, उंब्रज 1, गडकर आळी 1, म्हसवे 2, यतेश्वर 1, कासवडे 2, बोरेगाव 1, तासगाव 1, भरतगाववाडी 1, खावली 1, जकातवाडी 1, अंगापूर 1,धनवडेवाडी 2, बोंडारवाडी 1, शेरेवाडी 1,कुसवडे 2, शेंद्रे 1,जळकेवाडी 7,   निनाम 1, खांबवडे 1, दरे तर्फ 1,  मल्हार पेठ 1, कुशी 1, तारगाव 2,भरतगाव 1, फत्यापूर 3, वर्णे 2, रामनगर 5, निगडी 1, जांबळेवाडी 1, सांगवी 4, सारोळा 1, किडगाव 1, पिंपळवाडी 1,देगाव 1, नांदगाव 1, हमदाबाद 1, अंबेवाडी 1, पाडळी 1, नागठाणे 2, अतित 2, गजवडी 2, मोळाचा ओढा 2, गडकर आळी 2, दरे खु 1, कारंडी 1,  दौलतनगर 2, किडगाव 1, कुमठे 1, आष्टे 1,  निनाम 1,  पानमळेवाडी 1, खडकी 1, कारंडी 1, दरे खु 1, भोरगाव 1, खिंडवाडी 2, प्रतापसिंहनगर 2,      

*कराड तालुक्यातील* कराड 27, शनिवार पेठ 11, गुरुवार पेठ 5, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1,  ओगलेवाडी 3, रेठरे 1, काले 3, गोळेश्वर 1, सैदापूर 2, खोडशी 2, कारवाडी 1, आगाशिवनगर 7,   विद्यानगर 1, बेलवडे हवेली 1, उंडाळे 7, बनवडी 9, चोरे 2, कोपर्डे हवेली 2, चारेगाव 1, कार्वे 3,  तांबवे 2,भारवाडी 1, उंब्रज 4, येवती 1,रेठरे बु 2, कोयना वसाहत 2, मसूर 3, धोंडेवाडी 3,हजारमाची 4, शेनोली स्टेशन 1, मुंडे 2, येरवळे 1,  कार्वे नाका 1, वाडोली निलेश्वर 1, मलकापूर 17, पार्ले 1, तळबीड 5,  मद्रुळ हवेली 1, सुपने 3, तळीये 1, वनवासमाची 1, गलमेवाडी 1, मनव 1,  हेलगाव 1, गोंडी 1, कोळेवाडी 1, शेरे 1, वहागाव 1,  पाली 1,  गोगाव 1, वाघेरी 2, कोरेगाव 2, विंग 2, धोंडेवाडी 3, काले 2,  वडगाव 1, मार्ली 1, गोवारे 1, कोळे 3,कपील 2, कोनेगाव 1, बाबरमाची 1, शेरे 1,         

*पाटण तालुक्यातील* पाटण 8, खोंजवडे 2, जानुगडेवाडी 1, तारळे 29, कळंबे 2, कडवे 1, पांधारवाडी 2, मालदन 1, राजवाडा 1,ठोमसे 5, मराठवाडी 1, नाडोळी 2, बनपुरी 7, मल्हार पेठ 3, उरुल 1, कटकेवाडी 1,  अवसर्डे 1, दुलसे वजरोशी 1, कोंढवे 1, नावडी 1, ढेबेवाडी 1, गावडेवाडी 1, खिवशी 5, भुईलवाडी 1, आसवलेवाडी 4, मार्ली 1, नवा रस्ता 1, गव्हाणवाडी 1, मारुल 1, कोयना नगर 3,  पापर्डे बु 1, चोबदारवाडी 1, मारुल हवेली 2, चाफळ 2, जाधववाडी 1, खोचरेवाडी 1, बहुले 1,  काळगाव 1, मोरगिरी 1,  
     
*फलटण तालुक्यातील* फलटण 20,  रविवार पेठ 2, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, कोळकी 4, मलटण 6, वडजल 1, सस्तेवाडी 3, सोनवडी 1, आसु 6, सोमनथळी 4, मिर्ढे 3, तिरकवाडी 1, जाधववाडी 7, तांबवे 8,  विढणी 14, चौधरवाडी 3, काळज 3, वाठार निंबाळकर 2,शिंदेवाडी 1, राजाळे 1, धुळदेव 10, कांबळेश्वर 2, अलगुडेवाडी 4, सोनगाव 1, जिंती 1, साखरवाडी 2, सुरवडी 1, निंबळक 4,खुंटे 1, तावडी 1, मिरेवाडी 1, पिप्रद 1, वाठार 1, कापशी 1, तरडगाव 1, चव्हाणवाडी 2, विठ्ठलवाडी 1, तडवळे 1, तरडगाव 2,कापडगाव 2, डोंबाळवाडी 1, घाडगेवाडी 1, मुंजवडी 1, मुळीकवाडी 1, ढवळ 2, आळापुर 1, जावली 1, राजाळे 1, फडतरवाडी 1,      
*खटाव तालुक्यातील* खटाव 27, वडूज 5, विसापूर 3, वेटणे 13, खादगुण 1, निढळ 4, वर्धनगड 1, मायणी 2, पुसेगाव 1, अंबवडे 1, सिद्धेश्वर कुरोली 1, कातरखटाव 9, औंध 5, खबालवाडी 1, पडळ 1, बुध 2, डिस्कळ 1, दारुज 4, भुरकवाडी 2, जांभ 2, सिद्धेश्वर कुरोली 1, पाडेगाव 1, विसापूर 2, कोळेवाडी 1, विठापूर 1, वारुड 2, नागाचे कुमठे 7, लोणी 2, खरशिंगे 3,निमसोड 1,  
*माण तालुक्यातील* मार्डी 4, म्हसवड 66, माण 1, नरवणे 22, शिरवली 1, वारुगड 1, कुळकाई 1, मोही 9, ढाकणी 5, ताडळे 6, इंजबाव 1, भाळवडी 1, पळशी 7,  गोंदवले 5,  किरकसाल 3,बिदाल 6, शिरवली 1, कासारवाडी 1, शेनवडी 2, पर्यंती 2, दहिवडी 33,       पिंपरी 1, कुक्कुडवाड 1, विरकरवाडी 1, लोधवडे 2, देवपूर 3, पुलकोटी 1, पंधारवाडी 4, माहिमगड 1, पांघारी 1,उकीर्डे 1, गोंदवले खु 5, किरकसाल 1, पिंगळी बु 1, वावरहिरे 2, पिंगळी खु 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 12, रहिमतपूर 2, सातारा रोड 7, अनपटवाडी 1, निगडी 2, एकंबे 3, जांभ 2, भिवडी 2, बिचुकले 8, गोलेवाडी 1, देवूर 1, कुमठे 2, अनपटवाडी 4, रणदुल्लाबाद 3, पिंपोडे बु 2, धामणसे 1, वाघोली 1, चिंमणगाव 1, किन्हई 1, तळीये 3, वाठार स्टेशन 2, अपशिंगे 1, वेळंग 1,    
*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 19, पाडेगाव 3, शिरवळ 39, अंधोरी 12, पळशी 1, अतित 3, नायगाव 1, केसुर्डी 1,मिसाळवाडी 1, विंग 2, खराडवाडी 1, तोंडळ 1,  खेड 1, देवघर 1, पळशी 2, मोरवे 3, निंबोडी 1, कराडवाडी 2, भादे 1, खेड बु 1, खराडवाडी 1,       
*वाई तालुक्यातील* वाई 27, फुलेनगर 2,   बावधन 19, भुईंज 3, चिंदवली 1, मयुरेश्वर 1,कवठे 6,  चांदक 1, मोहडेकरवाडी 2, काचलेवाडी 1, केंजळ 1, पाचवड 1, म्हातेकरवाडी 8, दरेवाडी 1, पसरणी ,कुसगाव 1, बोरगाव 12, कानुर 1,चिखली 1, लोहारे 1,   सातलेवाडी 1, वाघजाईवाडी  2, रामढोह आळी 5,  सिद्धनाथवाडी 3,गणपती आळी 4, यशवंतनगर 1, गुळुंब 2, धोम कॉलनी 1, धर्मपुरी 3, दत्तनगर 3, भोगाव 4, गंगापुरी 3, सोनगिरवाडी 1, कुडाळ 1, किकली 1, एसर 1, अभेपुरी 1, मालतापूर 1, आसरे 2, शिरगाव 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 16, पाचगणी 15, उतेकर अनवली 5, तापोळा 7, मांघर 1, तळदेव 2, गोडोवली 1, खिंगर 1, सोळशी 5,  
*जावली  तालुक्यातील* जावली 1, प्रभुवाडी 1, सोनगाव 1, मोहाट 1, मेढा 8, चिकनवाडी 1, धुंद 1, खर्शी कुडाळ 12, ओझरे 1, कुडाळ 10,  सांगवी कुडाळ 1, म्हाते बु 5, मोरावळे 2, बामणोली 3, तेटली 3, पानस 1, बिभवी 7, सर्जापुर 5, दरे बु 3, करंदोशी 1, शेटे 3, राजापुरेवाडी 1, खर्शी 9, महु 3, भोगोवली 1, अंबेघर 1,  सायागव 1, 
*इतर* 12, नांदगाव 1,   पांघारी 1, कारखेल 1, बावकलवाडी 1, बनगरवाडी 1, पावशेवाडी 11,   रांजणी 1, अलेवाडी 9, भक्तवडी 2, लोणार खडकी 7, आंबेगाव 1, नांदगिरी 1, भिमनगर 1, ध्याती 1, तांबवे 1, घोंशी 1, चौपदारवाडी 1,परखंदी 1, वाघजाईवाडी 1,  दुरुस्करवाडी 1, सायगाव 2,कोळेवाडी 1, खडकी 2, सावरी 1, पुळकोटी 1, चिखली 1, भक्ती 5, खोजेवाडी 3, पांडेवाडी 1, शिरगाव 1,विरळी 1, जायगाव 1,  अंबेरी 1, खारकरवाडी 1, बहुले 24, येराडळ 1, गोसावीचीवाडी 1, करंडोशी 1, वनवासमाची 1, एकीव 1, कळंबी 1, कारवडी 1, बोंबाळे 5, विवर 1,   वरुड 2, भोर 1, येलमारवाडी 2, गावडेवाडी 1, रांगेघर 1,    मानेवाडी 1, महु 1, सोमर्डी 5, पाटोळे खडकी 2, ताडळे 2, येराळवाडी 2, वाघेरी 1, डांबेवाडी 2, गोवारे 1, घोटेघर 1, लटकेवाडी 2, गणेशवस्ती 1,    बांबळे 1, बोपर्डी 1, सायगाव 2, गुजरवाडी 1, खातवळ 2, हवालदारवाडी 3, हिंगणी 1, वाकी वरकुटे 1, म्हासोली 1,  दिवड 5, जांभुळणी   लाडेगाव 1, म्हसाळवाडी 5, अंबेघर 1, वडगाव हवेली 1, वाघोली 3, किकसाळी 1,   खडकी 2, जखीनवाडी 2, बांगरवाडी 1, कोळे 1, बोंडरवाडी 1, रुईघर 1,दापवाडी 1, परखंदी 1, वडगाव 1, खरातवाडी 1,  वसंतगड 1, शिरवडे 2, मोरगिरी 3,  
*बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 3,  मुंबई 3, निपाणी 15, अंबरनाथ 1,विजापूर 1, कोल्हापूर 1, सांगली 2, रत्नागिरी 1, वाळवा 1, केडगाव 3,  
*34 बाधितांचा मृत्यु*
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील रहिमतपूर ता.कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, पिंपोडे ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सातारा येथील 55 वर्षीय महिला, महागाव ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 85 वर्षीय महिला, केसरकर पेठ, सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 73 वर्षीय महिला, गजवडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, मुंबई येथील 58 वर्षीय महिला, सोळशी ता. कोरेगाव येथील 31 वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील 40 वर्षीय महिला, सायगाव ता.जावली येथील 79 वर्षीय पुरुष, फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, खबालवाडी ता. खटाव येथील 47 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर ता. सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, तोंडोली ता.कडेगाव जि. सांगली येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील 52 वर्षीय महिला, पोतेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, काळे ता. कराड येथील 72 वर्षीय महिला, कर्वे नाका, कराड येथील 47 वर्षीय पुरुष, केसकर पेठ, सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, वरुड ता. खटाव येथील 76 वर्षीय पुरुष, वडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बरड ता. फलटण येथील 53 वर्षीय महिला, तांबवे लोणंद ता. खंडाळा येथील 27 वर्षीय पुरुष, बिदाल. ता माण येथील 70 वर्षीय महिला, काण्हरवाडी ता. खटाव येथील 49 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 60 वर्षीय महिला, वाई येथील 11 वर्षीय युवक अशा एकूण 34  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -501033*
*एकूण बाधित -89654*  
*घरी सोडण्यात आलेले -70600*  
*मृत्यू -2290* 
*उपचारार्थ रुग्ण-16764* 

*सातारा ते कागल महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसाठी 558 कोटी 24 लाख निधी मंजूर*खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

*सातारा ते कागल महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसाठी  558  कोटी 24 लाख निधी मंजूर*
खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
 
कराड : प्रतिनिधी
खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.
     कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍हयातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459  कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख  निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. 
    सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत निवडून आल्यानंतर खा.श्रीनिवास पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. निवडणूक निकालानंतर त्यांनी लगेचच नोव्‍हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी  पत्रव्‍यवहार करुन तर अनेकदा त्यांना प्रत्‍यक्ष भेटून सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. सातारा ते कागल अशा 132 कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वहातूकीसाठी निर्माण होत असलेली  धोकादायक परिस्थिती तसेच  या पटृयात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याबाबत त्यांनी ना.गडकरी यांचे लक्ष वेधले होते.  खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन ना.गडकरी यांनी दि. 22  सप्‍टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्यांना आपल्‍या मागणीप्रमाणे सातारा-कागल महामार्गावरील प्रमुख पाच धोकादायक व अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन त्‍याची दुरुस्‍ती व सुधारणा करण्‍याचे काम हाती घेतले असल्याचे कळविले होते. त्यानंतरही  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या  बजेट अधिवेशनातील  प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात  खा.श्रीनिवास पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत महामार्ग संदर्भातील आपल्या मागण्या केल्या होत्या. खा.पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना ना.नितीन गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दर्शवून या मागण्यांची सोडवणूक त्वरित केली जाईल असे त्यावेळी आश्वासित केले होते.
     सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देवून मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे खा.पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान जिल्‍हयातील राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्‍याबाबत केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्रालयाला कळवण्यात यावेत. त्‍याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येथील असे ठोस आश्‍वासन ना.गडकरी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना लोकसभेत केलेल्या प्रश्‍नांना उत्‍तर देताना दिले होते. त्यासाठी लवकरच जिल्‍हाधिकारी, पोलीस अधिक्षक व आर.टी.ओ. अधिका-यां सोबत बैठक घेऊन जिल्‍हयातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्‍याचे काम हाती घेणार असल्‍याचे खा.श्रीनिवास पाटील यांनी सांगितले आहे.

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची जागेवरच कोरोना टेस्ट ढेबेवाडी पोलिसांची बेधडक कारवाई

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची जागेवरच कोरोना टेस्ट ढेबेवाडी पोलिसांची बेधडक कारवाई

ढेबेवाडी / मनोज सावंत

ढेबेवाडी : परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमधे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्यावर आता धडक कारवाई सुरू केली असून रस्त्यावर सापडेल तिथे कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास दंडात्मक कारवाई करून डायरेक्ट कोविड सेंटरला रवाना, तर निगेटिव्ह सापडल्यास दंड होणार आहे आज शुक्रवार दि.23 पासून याची सुरवात केली आहे केवळ तासाभरातच 70 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यामधील 4 जणांचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाच्या या कारवाईवर सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कडक भूमिका प्रशासनाने राबवावी तरच विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसेल. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी नुकतीच ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली त्यावेळी त्यांनी परस्थितीचा आढावा घेतला आणि सूचना दिल्या.

सापडला की डायरेक्ट कोरोना टेस्ट, पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर, यामुळे ढेबेवाडी विभागातील नागरिकांनी घरीच बसणे पसंत करावे लागणार आहे.

निष्काळजीपणे वागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. असे ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि.श्री संतोष पवार यांनी सांगितले. 

या कारवाईत सपोनि.संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कपिल आगलावे,अजय माने.नवनाथ कुंभार,संदेश लादे,होमगार्ड रोहित झेंडे,तानाजी डाकवे,विशाल मोरे, संकेत तडाखे, सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.ए. डी.जाधव आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचा सहभागी  झाले होते.


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आढावा बैठक घेतली.*

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आढावा बैठक घेतली.* 

 कराड / प्रतिनिधी
 कराड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याअनुषंगाने प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे तसेच काय अपेक्षित आहे यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील,  प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पै. नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, उदय पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीतील बेडची उपलब्धता, रेमडीसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका तसेच लसीकरण मोहीम कश्या प्रकारे राबविली जात आहे या विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात १२ हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. *या सर्व हॉस्पिटल मध्ये आजच्या तारखेला ८६६ इतक्या बेडची तयारी केली गेली असून यामधील सद्या १८३ बेड उपलब्ध आहेत. बेडच्या संख्येबाबत रोजची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या. 
याचसोबत कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजन चा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच कराड मधील काही हॉस्पिटल ना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच अन्न व औषध विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून जिल्ह्यातील ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली यानुसार जिल्ह्यासाठी ७ टँकर पाठविले जात आहेत अशी माहिती देण्यात आली. ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करण्याबाबत चर्चा झाली व तसा अहवाल दयावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या. 
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रशासनासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत बेडच्या उपलब्धतेबाबत, ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत, रेमडेसीव्हर इंजेक्शन पुरवठा यासह लसीकरण मोहीम कश्या प्रकारे चालू आहे याची माहिती घेतली. सद्या बेडची उपलब्धता जरी असली तरी आणखी कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे व त्यानुसार येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या ३ ठिकाणी ११० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील. तसेच तालुक्यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित होत आहे. पण लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने अडचण भासत आहे परंतु प्रशासनाने दिवसाला १५००० जणांना लस देऊ शकतो अशी यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पुरेशी लस ज्या ज्या वेळी उपलब्ध होईल त्यावेळी लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविता येईल. सद्य कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे आपण लॉकडाऊन चा पर्याय घेत आहोत हे टाळण्यासाठी सर्वांनी मास्क चा वापर करावा, कायम हात साबणाने धुवावेत तसेच किमान अंतर राखले पाहिजे असे आवाहन सुद्धा यावेळी आ. चव्हाण यांनी केले. 
-------------------------------------

*कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने**जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी* *कार्यालय उपस्थिती**विवाह सोहळा**खाजगी प्रवासी वाहतुक**सार्वजनिक प्रवासी वाहतुक*

*कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने*
*जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी* 
 सातारा दि. 22  : कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच सातारा जिल्ह्यात दि. 1 मे 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. तथापि, या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी  खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत. 
*कार्यालय उपस्थिती*
 सर्व सहकारी कार्यालये (राज्य, केंद्र, स्थानिक प्राधिकरणाखाली) कोविड-19 साथीच्या व्यवस्थापनाशी थेट जोडल्या आपातकालीन सेवा वगळता केवळ 15 टक्के उपस्थितीमध्ये चालु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाबाबत, कार्यालयाचे कार्यालय प्रमुख यांना कार्यालयीन कामकाज पुर्ण क्षमतेने चालु ठेवण्याचे असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्यानंतर कार्यालयीन अधिकारी अधिक उपस्थितीसाठी निर्णय घेऊ शकतील. वर नमुद केलेल्या इतर सर्व कार्यालयांसाठी त्यांनी त्यांच्या एकूण उपस्थितीच्या केवळ 15 टक्के किंवा 5 व्यक्ति यापैकी जे अधिक असेल त्यानुसार कामकाज करावे.  वर नमुद केलेल्या अत्यावश्यक सेवांसाठी आवश्यक असलेल्या सर्व काया्रलयीन कामांसाठी कमीत कमी क्षमतेवर काम करावे. कोणत्याही  परिस्थितीत 50 टक्के पेक्षा जास्त व्यक्तिस परवानगी नाही. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात आवश्यक सेवा देणारे कर्मचारी देखील कमी केले पाहिजेत.  परंतु आवश्यकतेनुसार ते 100 टक्के वाढविता येईल. 

विवाह सोहळा

 स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसिलदार यांची पुर्ववरवनगीने, जास्तीत जास्त 25 व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये एका मंगल कार्यालय, सभागृहाच्या आवाराता कमाल 2 तासात विवाह सोहळा आयोजित करणे बंधनकारक राहील. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे कोणत्याही कुटुंबाने (वधु व वर पक्षाकडी) उल्लंघन केल्यास त्यांना रक्कम रु. 50 हजार दंड व्यवस्थापन यांच्याकडून प्रथमवेळी रक्कम रु.25 हजार दंड व फौजदारी कारवाई तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम  रु. एक लाख  दंड व फौजदारी कारवाई करुन जोपर्यंत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड-19 साथीचा रोग आटोक्यात आल्याचे जाहिर होत नाही, तोपर्यंत संबंधित मालमत्ता बंद करण्यात येईल. 

*खाजगी  प्रवासी वाहतुक*

 खाजगी बस सेवा वगळता,प्रवासी वाहतुक केवळ आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवेच्या किंवा वैध कारणांसाठी ड्रायव्हरसह बसण्याच्या क्षमतेच्या 50 टक्के चालू ठेवण्यास परवानगी असेल. हे आंतर-जिल्हा किंवा आंतर-शहर असण्याची अपेक्षा नाही आणि ते प्रवाशांच्या निवासस्थानापुरतेच मर्यादित असावेत. एखाद्या अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा अंत्यसंस्कारासारख्या घटनेत किंवा कुटुंबातील गंभीर आजारपणात भाग घेण्यासाठी आवश्यक असल्यास आंतर-जिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासास परवानगी असेल. याव्यतिरिक्त कोणीही विनापरवाना प्रवास करणाऱ्या व्यक्तीस रक्कम रु. दहा हजार दंड आकारण्यात येईल. 
 खाजगी बसेस बसण्याच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यास  परवानगी असेल. तथापि, बसमध्ये प्रवाशांना उभे राहण्यास परवानगी नसेल. खासगी बसेसद्वारे  आंतर-शहर किंवा आंतर-जिल्हा प्रवास खालील अटी व शर्तींस अधिन राहून चालू ठेवण्यास परवानगी असेल. 
 बस सेवा ऑपरेटरला शहरातील जास्तीत जास्त दोन थांब्यावर बस थांबविण्यास परवानगी असेल. आणि त्या वेळापत्रकांबद्दल माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास देणे बंधनकारक असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकर त्या वेळापत्रकामध्ये बदल करु शकतील. ज्या स्थानकात प्रवाशी उतरणार आहेत अशा ठिकाणांवर उतरणाऱ्या सर्व प्रवाशंना 14 दिवस गृह अलगीकरण शिक्का संबंधित ऑपरेटर यांनी मारणे बंधनकारक असेल. बसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांचे थर्मल स्कॅन करण्यात यावे आणि कोविड-19 लक्षणे असलेल्या प्रवाशांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णलयात हलवण्यात यावे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्या थांब्यावर प्रवासी उतरतात त्या ठिकाणी अधिकृत लॅबची नेमणूक करुन प्रवाशांची रॅट चाचणी करण्यचा निर्णय घेवू शकतात. तसा निर्णय घेतल्यास रॅट चाचणीची किंमत प्रवासी, सेवा प्रदात्याकडुन घेण्यात यावी. कोणत्याही ऑपरेटरने  या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास रक्कम रु. दहा हजार दंडा आकारण्यात येईल.  वारंवार अशाप्रकारे दिशानिर्देशांचे  उल्लंघन केल्यास कोविड-19 साथरोग अधिसूचना लागू असेपर्यंत संबंधित ऑपरेटरचा परवाना रद्द करण्यात येईल. स्थानकामध्ये येणाऱ्या बसेसमधील प्रवाशांच्या हातावर 14 दिवस गृह अलगीकरणाचा शिक्का मारणे अनिवार्य केले असलेतरी स्थनिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे स्थानिक परिस्थितीनुसार त्या नियमामध्ये सूट देवू शकतील. 

*सार्वजनिक प्रवासी वाहतुक*

 राज्य सरकार किंवा स्थानिक सरकारी मालकीच्या सार्वजनिक बसेस यांना बसण्याच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह प्रवास करण्यास परवानगी असेल. तथापि, बसमध्ये प्रवाशांना उभे राहण्यास परवानगी नसेल. आंतर-शहर किंवा आंतर-जिल्हा  प्रवास लांब पल्ल्याच्या रेल्वेने आणि बसेसद्वारे करण्यास खालील अटी व शर्तीस अधिन राहून  परवानगी असेल. 
 स्थानिक रेल्वे अधिकारी व महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात आलेल्या प्रवाशी, व्यक्तींची माहिती स्थानिक आपत्ती व्ययवस्थापन प्राधिकरण यांना प्रवाशांच्या तपासणीकरीता देण्यात यावी. ज्या स्थानकात प्रवाशी उतरणार आहेत अशा स्थानकांवर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांच्या हातावर 14 गृह अलगीकरण शिक्का मारण्यात यावा.  तसेच या प्रवाशाचे थर्मल स्कॅन करण्यात यावे आणि कोविड-19 लक्षणे असलेल्या प्रवाशांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात हलवण्यात यावे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्या स्थानकावर प्रवासी उतरतात त्या ठिकाणी अधिकृत लॅबची नेमणूक करुन प्रवाशांची रॅट चाचणी करण्याचा निर्णय घेवू शकतात. तसा निर्णय घेतल्यास या रॅट चाचणीची किंमत प्रवासी , सेवा प्रदात्याकउून घेण्यात येईल. स्थानकामध्ये येणाऱ्या बसेसमधील प्रवाशांच्या हातावर 14 दिवस गृह अलगीकरण शिक्का मारणे अनिवार्य केले असलेलतरी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे स्थानिक परिस्थितीनुसार त्या नियमामध्ये सूट देवू शकतील. या आदेशामध्ये नमुद केलेल्या व्यतिरिक्त  यापूर्वी जारी करण्यात आलेल्या ओदशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहतील. 
 याआदेशाची अंमलबजावणी दि. 22 एप्रिल 2021 चे रात्री 8.00 वाजलेपासून ते दिनांक 1 मे 2021 चे सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू राहील. 
 या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ  केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 205 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडानीय , कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे. 
 

*सातारा जिल्ह्यातील 1815संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1815संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 22 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1815 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 94,  मंगळवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सदाशिवपेठ 1,  चिमणपुरा पेठ 2, बसप्पापेठ 1,  सदरबझार 7, करंजे 3, शाहुपुरी 5, शाहुनगर 7, गोडोली 11, देगाव फाटा 1, कोडोली 6,  खुशी 17, संगम माहुली 1, क्षेत्र माहुली 1, कळंबे 2, जकातवाडी 2, कारंडवाडी 1, कळसंबे 1, निगडी 1,क्षेत्र माहुली 2, उपळे 1, डबेवाडी 1, लिंब 1, नागठाणे 2, रायगाव 1, सोनवडी 1, आरे 1, सैदापूर 1, तासगाव 3, मार्डी 1, अंबेदरे 1, चिंचणेर वंदन 1, कारी 2, संभाजीनगर 1, रामाचा गोट 2, कोंढवे 1, खेड 1, दहिवड 1, वेचले 1, तामाजाईनगर 2,  तुकाईवाडी 2,  खेड 1, नागडे 1,  सोनगांव 1, संगमनगर 1, जवळवाडी 1, मिरेवाडी 1, जकातवाडी 1, समर्थगांव 2, काशिळ 1, सासपडे 1, महागाव 1, निगडी 1, त्रिपुटी 1, आसनगाव त 1, पांढरवाडी 5 चिंचणेर लिंब 1, जैतापूर 1, मिर्ढे 1, पाडेगाव 1, रोहट 1, सोनवडी 1, अंगापूर 1, सातेवाडी 1, जकातवाडी 1, भारमार्ली 1,  अंबवडे 1,  

*कराड तालुक्यातील* कराड 29, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3,  शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 6, बनवडी कॉलनी 1, कोळे 2, काले 2, हजारमाची 3, कार्वे 3, शिरगाव 1, कासार शिरंबे 8, कपील 2, वारुंजी 2, मलकापूर 17, सैदापूर 4, बनवडी 1, हेळगाव 1, शहापुर 2, कोयना वसाहत 2, शेनवडी 1, तळीये 2, आगाशिवनगर 7, चरेगाव 1, साजुर 1, सुपने 3, रिसवड 1, घोगाव 1, ओंड 1, उंब्रज 1, कचरेवाडी 1, खराडे 1, नारायणवाडी 3, मुंडे 2,  केसे 1, रेठरे बु 3, रेठरे खु. 1, तासवडे 1, कोळे 1, कोळेवाडी  3,  काले 3, घारेवाडी 1, ओगलेवाडी 3, वाडोळी 1, पार्ले 1, तळबीड 1, येलगांव 1, नांदलापुर 3, नांदगांव 7, चोरे 1, पाडळी 1, कोनेगांव 1,  जखीणवाडी 1, वाठार 1, कांबीरवाडी 4, तारुख 3, बामणवाडी 2, सिंहगडवाडी 2, येणके 3, पाल 1,  गोरजवाडी 1, पार्ले 1, 

*पाटण तालुक्यातील* पाटण 8, काटेवाडी 2, तारळे 5, कळंबे 1, कालगाव 2, मोरेवाडी 1, येरड 3, रिसवड 1, चाफळ 2, मुलगाव 1, आवर्डे 1, गव्हाण 1,  ढेबेवाडी 2, गलमेवाडी 1, ढाकेवाडी 2, हेलगाव 1, खोंजवडे 1, मानेगाव 1,कामरगांव 1, रामल्ला 2, अरबवाडी 1,  कोयनानगर 1,  रुवळे 1, कुसवडे 1, केलोळी 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 46, लक्ष्मीनगर 11, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2,  रविवार पेठ 4, मलटण 13, कोळकी 7, गणेशनगर 1, चव्हाणवाडी 2, तरडगाव 11, घाडगेवाडी 2, पाडेगाव 14, काळज 2, फरांदवाडी 14,चौधरवाडी 2, राजाळे 3, खुंटे 34 शिंदेवाडी 1, तांबवे 14, आसवली 3, शेनवडी 1, बिबी 2,जिंती 1,  खामगाव 1, निंबळक 7,  वाठार निंबाळकर 5, सोमनथळी 3, सालपे 1, हिंगणगाव 8, साखरवाडी 5, जाधववाडी 6, मिर्ढे 1, वंनदेव शेरी 1, नेवसे वस्ती 1, अलगुडेवाडी 1, विढणी 7, वाढळे 5, मुरुम 1, कापशी 3,  अरडगांव 1, गिरवी 4, गुणवरे 1, निंभोरे 2, जावली 1, मुळीकवाडी 1, दुधेबावी 1, शिंदेवाडी 1,राजुरी 1,  बिजवडी 1, ठाकुर्की 1, पिंपरद 1, सांगवी 1, सुरवडी 1, कांबळेश्वर 2, धुळदेव 2,मुजवडी 1, आदर्की 1, विचुर्णी 1, सांगवी 1, बरड 3, आंदरुड 3, गुणवरे 2, वाजेगाव  3, राजुरी 2, गिरवी 2,   
*खटाव तालुक्यातील* वडूज 11, खटाव 5, विसापूर 4, निढळ 11, काटेवाडी 1, रणशिंगवाडी 2, पुसेगाव 4, वेटने 1,खादगुण 1, भांडेवाडी 1, कलेढोण 2, पांगर खेल 1, वेटने 3, बुध 6, राजापुर 9, खबालवाडी 18, राजापुरी 3, लिमसोड 1, औंध 6, कातरखटाव 4, मोराळे 3, वाडी 1,  पाडेगांव 1, पारगांव 1, निमसोड 19, अंबवडे 1, मायणी 19,  चितळी 2, धोंडेवाडी 2, डांबेवाडी 1, तडवळे 1,  काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, शेळकेवाडी 1, कदमवाडी 2, वडगाव 1, राहटणी 1, भुरकवाडी 7, वरुड 3, दारुज 1, जाखनगाव 2, लोणी 1, सातेवाडी 1, कुरोली 1, जायगाव 1, वाकळवाडी 1,  पुसेसावळी 2, भोसरे 3,कळंबी 1, येळीव 1, डिस्कळ 1,     
*माण तालुक्यातील* पानवन 2, कालवडे 2, बोडके 1, बिदाल 8, वडगाव 2, राणंद 5, शिरपालवन 1, परखंदी 1, ढाकणी 1, राणंद 5, नवलेवाडी 1, उकिर्डे 2, म्हसवड 25, पर्यंती 3, शिरवली 1, मोराळे 1, मार्डी 1,पळसवडे 1,  दहिवडी 15, मोही 2, पिंगळी 3,  नरवणे 7, पांगरी 1,हिंगणी 1, गोंदवले 1, राजवडी 1,  कुक्कुडवाड 2, पळकोटी 1, वेळाई 1, तादळे 1, झाशी 2, सोकासन 1, मार्डी 1,   गोंदवले खु 1, पळशी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 30, रणदुल्लाबाद 4, रहिमतपूर 34, सांगवी 1, कण्हेर खेड 1, सातारा रोड 4, नांदगिरी 1,साप 3, कण्हेरखेड 6, पिंपरी 3, नहरवाडी 4, शेंदुरजणे 9, धामणेर 4, नागझरी 1, नाईकाचीवाडी 1, एकंबे 5, एकसळ 1, बोरजाईवाडी 1, सासुर्वे 2, निगडी 1,  बिचुकले 9, अंबवडे 3, वाठार 15, वेळंग 4, अपशिंगे 4,   बोरगाव 1, सोनके 1, भोसे 1, दुधी 1, सुलतानवाडी 1, कटापुर 1, पळशी 2, दुधानवाडी 1, पोपांडे खुर्द 1, गुजरवाडी 4, देवून 7, एकसळ 2, शिरढोण 1, निमसोड 2, मार्ढे 1,  भक्तवडी 1, नागझरी 1, पुसेसावळी 1, आर्वी 3,  गोरेगाव 1,   कुमठे 1, आसरे 1, आसगाव 1, बुध 1, किन्हई त 1, पिंपोडे बु 3, पंदारवाडी 1, नांदवळ 2, तडवळे 1, नायगाव 1, आसनगाव 1, सायगाव 2,      
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 20, अंधोरी 3, पाडेगाव 3, बोरी 10, शिरवळ 32, वाघोशी 2, खंडाळ 4, शिंदेवाडी 1, बाळुपाटलाचीवाडी 6, सुखेड 1, खेड 1, केसुर्डी 7, नायगाव1, पळशी 7, भोळी 1, पांडे 5, वडगांव 2, गुठळे 1, सांगवी 1, केसुरडी 2, वाघोशी 3, 
*वाई तालुक्यातील* वाई 30, रविवार पेठ 3, गणपती आळी 1, धर्मपुरी 1, मुंगसेवाडी 1, बावधन 7, भुईंज 7, वेळे 5, धोम कॉलनी 2, बोपेगाव 9, वाशिवली 1, सह्याद्रीनगर 3, गंगापुरी 4, कळंबे सर्जापुर 2,  मेणवली 2, पसरणी 7, केंजळ 1, बोरगाव 2, सोनगिरवाडी 3, यशवंतनगर 4, सिद्धनाथवाडी 5, कवठे 5, मांढरदेव 1, धावडी 1, अनपटवाडी 1,  कानुर 1, अभेपुरी 1, सुलतानपुर 1, शेलारवाडी 1, बावधन 2, व्याजवाडी 2, अलेवाडी 2, केंजळ 2, शेंदुर्जणे 2, उडतरे 1, पाचवड 2, कुडाळ 1, चांदक 1, सुरुर 1, चिंदवली 2, माळदेववाडी 2, जांभ 1, केडगाव 1, विरमाडे 1, कुंभारवाडी 1, म्हातेकरवाडी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 18, सोळशी 15, गुरेघर 2,  पाचगणी 12,माचुतर 3,भिलार 3, गोडोवली 6 टेकवली 9, मेटगुटाड 3, पार 1 , खिंगर 2, कासवंड 1, 
*जावली तालुक्यातील* जावली 2, खर्शी कुडाळ 2, कुडाळ 4,सांगवी 4, पिंपरी 5, एकीव 1, बामणोली 1, मोरघर 1, केळघर 7, मेढा 1,  निपाणी 2,  
*इतर* 7, शेरनवडी 2, पळसावडे 1, जांभ 1, विरमाडे 1,  कालंगवाडी 1, दुदरस्करवाडी 1, कुंभारवाडी 2, गुजरवाडी 2, धोंडेवाडी 2, शिंगगाव 1, करंडोशी 2, मारुल 1, पिंपळवाडी 3, पंधारवाडी 1, गोंडी 1, ध्याती 5, खिंनघर 2, कामेरी 1, ,   नानेगाव 1, म्हसवे 2, विवर 1, आखडे 3, भिवडी 1, अढळ 1, येळीव 2, खुटबाव 1, वरुड 4, निमसोड 1, पवारवाडी 1, राहटणी 3, कावडे 1, बदालापूर 1,खराडवाडी 1,भक्ती 3, ऐनकुळ 8, पांगर 1, खडकी 4, तडवळे 5, बनगरवाडी 5, बनपुरी 4, बांगरवाडी 3, बिबवी 2, बोंडरवाडी 2, डांबेवाडी 2, मामुर्डी 3,  खातवळ 1, खोजवाडी 1, कालगाव 1, ढवळी 1,  कारखेळ 1,  सोमर्डी 2, कारंडी 1, शंभुखेड 2, डांगरेघर 1, धिवड 3, इंजबाव 2, मसाळवाडी 3, पाटोळेखडकी 1, काळचौंडी 1, धावडी 1, कुसगांव 1, पुलकोटी 3, केडांबे 3,  अमृतवाडी 1, गोव्हडीगर 1, किडगांव 3, भक्तवडी 1, भादे 1, धावशी 2, कराडवाडी 1, बेलमाची 1, जांब 1,  नांदगांव 3, भोगांव 1, तुळसण 1, वरकुटे म्हसवड 1, बेलवडे बु. 2, मुंडेवाडी 40, कापडगाव 6, नांदल 7, सोनवडी खुर्द 3, सोनवडी बु 1, निंबोडी 1, लोणार खडकी 1, अहिरे 1, 
   
*बाहेरील जिल्ह्यातील* मुंबई 4, बीड 1, सांगली 2, बारामती 2, पुणे 1, वेस्ट बंगाल 1, येडेमच्छीं द्र 1, रेठरे 3 (वाळवा), कुंडल (पलुस) 4, तोंडोली (केडगांव) 1,  जाधववाडी (खानापुर) 1,  वीये (रायबाग)1, 

*28बाधितांचा मृत्यु*
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे धनगरवाडी निगडी ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगाव येथील 48 वर्षीय महिला, तुपेगाव येटगाव ता. कडेगाव जि. सांगली येथील 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुष, सावली गावडी ता. जावली येथील 80 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पुणे येथील 75 वर्षीय महिला, बावधन ता. वाई येथील 41 वर्षीय महिला, अंधोरी ता. खंडाळा येथील 52 वर्षीय महिला, चोरांबे मामुर्डी ता. जावली येथील 75 वर्षीय महिला, गंगापुरी ता. वाई येथील 76 वर्षीय पुरुष, वडवली ता. वाई येथील 46 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 87 वर्षीय पुरुष, सालवा ता. खंडाळा येथील 38 व 35 वर्षीय महिला, चिमणपुरा पेठ ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, कोळे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 46 वर्षीय महिला, मरळी ता. जावली येथील 89 वर्षीय पुरुष, कराड येथील 53 वर्षीय महिला, नरवणे ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, गारुडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय महिला, खबालवाडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष, पडळ ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष  अशा एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -496111*
*एकूण बाधित -87958*  
*घरी सोडण्यात आलेले -68926*  
*मृत्यू -2256* 
*उपचारार्थ रुग्ण-16776* 

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...