पवारवाडीत लसीकरणासोबत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
तळमावले : कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेने ग्रामीण भागात तांडव घालणे सुरू केले आहे. पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना समूह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत पवारवाडी (कुठरे ) यांच्या वतीने गावामध्ये कोविड लसीकरण करण्यात आले याचा 125 नागरिकांनी लाभ घेतला त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.
या संसर्गजन्य आजाराला हरविण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे म्हणून ग्रामपंचायतिने गावातील सर्व सांडपाणी वाहून जाणारी गटारे यामध्ये डी.डी टी.पावडरची फवारणी करण्यात आली नागरिकांनी नियमांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनसुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात केले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच दत्तप्रसाद कदम,उपसरपंच महेश लोहार,सदस्य अंकुश पाटील,संभाजी कदम, त्याच बरोबर गावातील ग्रामस्थ ,तरुण वर्ग, यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा